पिंपरी – स्वारगेट ते पिंपरी अशी पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत जाण्याची शक्यता दाट आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रोचे काम चिंचवडपर्यंत होणार असल्याने पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. मेट्रो निगडीपर्यंत जावी, यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होत होते. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन देखील मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी अनुकूल असल्याचे दिसते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 21 July 2018
पिंपरी-निगडी मेट्रोचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड एम्पायर इस्टेट पूल ते निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतचा पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे; तसेच नाशिक फाटा ते चाकणचा डीपीआरही तयार झाला आहे. महिन्याअखेरीस तो पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. एम्पायर पूल ते भक्ती-शक्ती चौक या सुमारे 4 किलोमीटर अंतरचा मेट्रो मार्गिकेचा डीपीआर खासगी कंपनीकडून तयार करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक फाटा ते चाकण या 19.50 किलोमीटर अंतराच्या मार्गाचा डीपीआरही तयार झाला आहे.
नाशिकफाटा येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू
पिंपरी – मेट्रोच्या कामाला शहरात सध्या जोरदार वेग आला आहे. शहरातील नाशिक फाटा येथे मेट्रोचे स्थानक बनवण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच दापोडी येथे सेगमेंट बसवण्यासाठी ऑटोमेटिक लॉंचिंगचे काम ही सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी किमान एक किलोमीटर पर्यंतचे स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरिंगचे काम सुरू होईल. या कामाचे टेंडरही ओपन करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ‘ई-भूमिपूजन’
पिंपरी - क्रांतिवीर चापेकर स्मारकाचा दुसरा टप्पा, वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्प आणि मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ या तीन प्रकल्पांचे ‘ई-भूमिपूजन’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड, केशवनगर येथील मोरया क्रीडांगण येथे होईल.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प दृष्टिपथात - आढळराव पाटील
शिक्रापूर - पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नुकतीच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कामासाठी राज्य सरकारने नुकतेच ४० कोटी या कंपनीकडे वर्ग केले आहेत. प्रकल्प प्रारंभाचा कालावधी हा सर्वे व मंत्रिमंडळ मंजुरीवर असला तरी प्रकल्प प्रारंभ खऱ्या अर्थाने दृष्टिपथात आला आहे, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मिसेस इंडिया स्पर्धेत भोसरीतील कोमल साळुंखे यांना महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचा किताब
पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील शाहु शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया – शी इज इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय पातळीवर आठव्या क्रमांकाचा किताब पटकाविला.
Senior division court to come up on Moshi plot
PIMPRI CHINCHWAD: Around 55 courts, including the senior division, labour, industrial, consumer, and cooperative courts, would will be constructed in two months on a 17-acre plot along Spine Road in Sector 14, Moshi.
कौटुंबिक न्यायालयात नवा व्हिडीओ अॅप!
स्काइपचा वापर करून परदेशातून घटस्फोट घेण्यात आल्याची उदाहरणे आहेत.
फौजदारी कारवाईस मंजुरी
पिंपरी - शहरातील रस्ते खोदाईसाठी दरवर्षी जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विनापरवाना किंवा परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, अनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. याबाबतचे धोरण शुक्रवारी (ता. २०) महापालिका सर्वसाधारण सभेने मंजूर केले.
कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्या- डॉ. एन. एस. उमराणी
वाल्हेकरवाडी - विद्यार्थ्यांनी केवळ पदवीसाठी शिक्षण घेऊ नये तर त्याने कौशल्य आधारित शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन.एस.उमराणी यांनी आकुर्डीतील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयात जी. एस. टी. शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन करतांना केले.
पिंपरी महापालिकेत सातशे पदांसाठी भरती
अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदांमुळे अधिकारी कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण
आयुक्तांपुढे प्रस्ताव : आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा, अग्नीशमनसह अन्य विभागात पदे मंजूर
आयुक्तांपुढे प्रस्ताव : आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा, अग्नीशमनसह अन्य विभागात पदे मंजूर
वृक्ष प्राधिकरण समिती रद्दच करण्याची मागणी
पिंपरी : महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. यंदा 60 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. परंतु, उद्यान विभागाने अद्यापर्यंत केवळ 20 हजार वृक्षांचीच लागवड केली आहे. मात्र, त्या बाबतच्या सविस्तर माहितीचा आग्रह सदस्यांनी धरल्यानंतर अधिकार्यांची धांदल उडाली. त्यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे सदस्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. त्याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत (दि. 23) देण्याच्या सक्त सूचना समितीने दिल्या आहेत. अहवाल मिळाल्यानंतर सदस्य प्रत्यक्ष झाडांची पाहणी करणार आहेत. अधिकारी नगरसेवकांना माहिती देणार नसतील तर वृक्ष प्राधिकरण समितीच रद्द करा. प्रशासनाला जसे वाटतील तसे निर्णय तुम्ही घ्या, असेही नगरसेवकांनी अधिकार्यांना सुनावले.
कायदेशीर लढा आणखी तीव्र करणार!
चिंचवड – एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोडमधून साडे तीन हजार नागरिकांची घरे वाचवण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनास 400 दिवस पूर्ण झाले आहेत. अद्यापही या विषयावर कायम स्वरूपी तोडगा निघालेला नाही. घरे वाचवण्यासाठी भविष्यात कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडे नगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे-गुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करत आहेत. संघर्षास 400 दिवस पूर्ण झाल्यामुळे कासारवाडी येथे घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरीच्या औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा अखेर सुरळीत
|
निगडीमध्ये चक्काजाम, मोशीत निदर्शने
पिंपरी – संपूर्ण देशभरात आजपासून मालवाहतूकदारांनी देशव्यापी बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरातही उमटले असून असोसिएशन ट्रान्सपोर्ट ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने निगडीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या वतीने मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
गृहप्रकल्प दफ्तरी दाखल
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशी बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प राबविण्याचा वादग्रस्त प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी दफ्तरी दाखल केला. विषय मंजूर करण्यावरून सत्तारूढ भाजपमध्येच अंतर्गत मतभेद असल्यामुळे ही नामुष्की ओढवली.
RTO suspends licences of 10 car showrooms
The licences of 10 vehicle distributors in the city have been suspended by the Regional Transport Office (RTO) because they gave buyers possession of vehicles that were not registered with the RTO either temporarily or permanently. Their licences were suspended for a week after the distributors failed to give a reasonable response to the showcause notice issued them by the RTO in May.
जीव वाचविणाऱ्यांची दखलच नाही
पुणे - बाणेर येथे या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या अपघातात नीलय पाटील गंभीर जखमी झाला होता. त्याची शुद्ध हरपत होती, तेवढ्यात देवेंद्र पाठक या नागरिकाने त्यास रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचविले. अपघातातील जखमींना मदत करण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, मात्र देवेंद्र यांच्याप्रमाणे काही जण पुढेही येतात. अशा पुढे येणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रोत्साहन मिळावे, जखमींचे प्राण वाचविण्यासाठी मदतीचे हजारो हात पुढे यावेत म्हणून राज्य सरकारने मदत करणाऱ्यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्याचा अध्यादेश २०१४ मध्ये काढला. त्यास आता चार वर्षे उलटली, पण मदत करणाऱ्यांचा एकही प्रस्ताव चार वर्षांत पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे गेलेला नाही, हे दुर्दैव !
एकाच वेळी पाच पेक्षा अधिक संदेश पाठवण्यास बंदी घालणार
व्हॉट्स ऍपचा निर्णय
नवी दिल्ली – मुले पळवणाऱ्या टोळीच्या संबंधात अफवा पसरवणारे संदेश भारतात एकाचवेळी अनेक ठिकाणी पाठवण्यात आल्याचा प्रकार घडल्याने अशा अफवा पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स ऍपने एकाच वेळी पाच पेक्षा अधिक संदेश पाठवण्यावर निर्बंध घालायचे ठरवले आहे.
नवी दिल्ली – मुले पळवणाऱ्या टोळीच्या संबंधात अफवा पसरवणारे संदेश भारतात एकाचवेळी अनेक ठिकाणी पाठवण्यात आल्याचा प्रकार घडल्याने अशा अफवा पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स ऍपने एकाच वेळी पाच पेक्षा अधिक संदेश पाठवण्यावर निर्बंध घालायचे ठरवले आहे.
डिलिव्हरी बॉइजना विमा कवच
डिलिव्हरी बॉइज या संघटेनेचे संस्थापक शशिकांत माने, संघटनेचे अध्यक्ष दीपक भांगे यांच्या निर्णयामुळे प्रत्येक कामगारांना १० लाख रुपये विमा उतरविण्याचा निर्णय चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात घेण्यात आला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, विशाल बुरट आदी उपस्थित होते.
प्रशासनाचे कर्मचारी महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष?
पिंपरी – महापालिकेच्या ई- प्रभाग कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची राजकीय दबावामुळे चुकीच्या पध्दतीने बदली करण्यात आली. त्याबाबत तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यांनी दुर्लक्ष केले, तर उलट राजकीय मंडळींकडून पत्नी शितल चतुर्वेदी व माझ्यावर खोटे आरोप करून मानसिक त्रास दिला जात आहे, असा आरोप रोहित चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत केला.
Subscribe to:
Posts (Atom)