Wednesday, 30 January 2013

गरीबांसाठी टाइप प्लॅन घरे प्रत्यक्षात !

गरीबांसाठी टाइप प्लॅन घरे प्रत्यक्षात !: शहराच्या हद्दीपासून दहा किलोमीटर अंतरावर राहणा-या गरीबांना आता त्यांच्या स्वप्नातील घर कोणत्याही सरकारी क्लिष्ट प्रक्रियेविना बांधता येणार आहेत. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी त्यासाठी ‘टाइप प्लॅन’ घरांची नवी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

चाकण फोकसमध्ये!

चाकण फोकसमध्ये!: मूलभूत सोयींचा वेगाने विकास, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नियोजित प्रकल्प, पुण्याचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आणि टाउनशिपचे शहर यामुळे चाकण हा भाग ‘रिअल इस्टेट हब’ म्हणून नावलौकिक मिळवत आहे.

बनावट प्रश्नपत्रिका : सांगवीत २ जणांना अटक

बनावट प्रश्नपत्रिका : सांगवीत २ जणांना अटक: बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांच्या आठ बनावट प्रश्नपत्रिका तयार करून त्या सोळा हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या दोन विद्यार्थ्यांना दरोडा प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली.

विद्यापीठाचा तळवडेत कॅम्पस

विद्यापीठाचा तळवडेत कॅम्पस: पुणे। दि. २९ (प्रतिनिधी)

पुणे विद्यापीठाचा नगर, नाशिक पाठोपाठ आता एक स्वतंत्र कँपस लवकरच पिंपरी चिंचवड परिसरात साकारलेला दिसू शकेल. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५0 एकर जागा विद्यापीठासाठी आरक्षित केली आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही हिरवा कंदील दिला आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथे ही जागा असून विद्यापीठाला २00६ मध्येच या जागेचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु त्यांनंतर सातत्याने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले. व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मात्र या जागेविषयीचा ठराव मांडण्यात आला आणि ही जागा मिळवण्यासाठी विद्यापीठाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी भूमिका सदस्यांनी घेतली.

पुणे विद्यापीठातील भविष्यकालीन योजनांचा वेध घेता सद्यस्थितीत विद्यापीठाकडे असणारी ४00 एकर जागाही विद्यापीठाला कमी पडणार आहे. त्यामुळे ही जागा नव्याने घेण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Land acquisition talks on for new UoP campus in Pimpri

Land acquisition talks on for new UoP campus in Pimpri - Indian Express:

Land acquisition talks on for new UoP campus in Pimpri
Indian Express
University of Pune (UoP) may soon open a new campus in Pimpri-Chinchwad if its proposal of acquiring land is successful. "Around 50 acres have been offered to the varsity by Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). This will be an extension of ...

and more »

Time period for JNNURM projects extended by 2 years

Time period for JNNURM projects extended by 2 years - Times of India:

Time period for JNNURM projects extended by 2 years
Times of India
Additional municipal commissioner of the Pimpri Chinchwad Municipal Corporation Prakash Kadam said that according to the ministry, new urban infrastructure projects in states/Union territories would be approved till March 31, 2014. The government has ...

and more »

Police taking action against rash drivers

http://www.youtube.com/watch?v=2xHZnUODBgA: http://www.youtube.com/watch?v=2xHZnUODBgA


Police taking action against rash drivers
police taking action against drivers violating speed limit on Pune Mumbai eway city's first marathi news portal

सीएनजी किटच्या अनुदानासाठी रिक्षा पंचायतीचा 'रिक्षा मोर्चा'

सीएनजी किटच्या अनुदानासाठी रिक्षा पंचायतीचा 'रिक्षा मोर्चा'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Suggestions sought for framing cultural policy for Pimpri-Chinchwad

Suggestions sought for framing cultural policy for Pimpri-Chinchwad: A separate committee of artists, a centrally-located auditorium, a well-equipped cultural centre and an acting and arts college were some of the demands put up by artists and cultural organizations.

बलात्कारापूर्वी महिलेला पाजली होती दारू

बलात्कारापूर्वी महिलेला पाजली होती दारू: पिंपरी। दि. 28 (प्रतिनिधी)

भोसरीत रविवारी उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात अपहरण करून शाळेच्या टेरेसवर नेल्यानंतर संबंधित महिलेला आरोपींनी दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने दोन वेळा बलात्कार करण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. रमेश ब्रिजमोहन कोटार आणि राजुप्रसाद जगमोहन कोटार (दोघेही रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. एका 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पांजरपोळ परिसरातील एका बांधकाम साइटवर आरोपी रखवालदार म्हणून काम करायचे. पीडित महिलेचा पतीही तेथेच रखवालदार आहे. तो रात्रपाळीत कामावर गेला असता दोघे रखवालदार त्याच्या घरी आले व महिलेचे अपहरण करून तिला शाळेच्या टेरेसवर नेले. दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.

‘स्थायी’चे 8 सदस्य आज बाहेर

‘स्थायी’चे 8 सदस्य आज बाहेर: पिंपरी । दि. 28 (प्रतिनिधी)

स्थायी समितीच्या 16 पैकी 8 सदस्यांना चिठ्ठय़ांद्वारे निवृत्त केले जाणार आहे. नेमके कोणाला बाहेर पडावे लागणार, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे, तर विद्यमान सदस्यांमधील प्रत्येकाला चिठ्ठीत आपले नाव यायला नको, असे वाटू लागले आहे. मंगळवारी दुपारी 3 ला होणा:या बैठकीत चिठ्ठय़ा काढल्यानंतर 8 जणांना बाहेर पडावे लागणार आहे.

आर्थिक मंजुरीचे अधिकार असलेल्या स्थायी समितीत अधिकाधिक कालावधीसाठी काम करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु प्रक्रियेला सामोरे जाऊन नशिबावर हवाला ठेवण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही.

महापालिका निवडणुकीनंतर स्थायी समिती स्थापन होते. पक्षीय बलाबलानुसार सदस्य संख्या निश्चित करून सदस्यांची निवड केली जाते. पहिले वर्ष संपुष्टात येताच चिठ्ठय़ा काढून 8 सदस्य निवृत्त केले जातात. ज्या पक्षाचे सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडतील, त्या पक्षाचे नवीन सदस्य निवडले जातात. ही प्रक्रिया स्थायी समितीचे पहिले वर्ष संपुष्टात येताच होते.

10 लाखांची बँक हमी जप्त

10 लाखांची बँक हमी जप्त: पिंपरी । दि. 28 (प्रतिनिधी)

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील निगडी ओटा स्कीम भागातील इमारती उभारताना महापालिकेने पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा ठपका ठेवून हा प्रकल्प संरक्षण खात्याच्या प्रतिबंधित क्षेत्रत येत आहे. ही बाब लपवून ठेवली ही गंभीर बाब असल्याचे नमूद करून महापालिकेची 10 लाखांची बँक हमी जप्त केली आहे. तसेच प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवावे, अशी नोटीस महापालिकेला बजावण्यात आली आहे. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत महापालिकेने 630 कोटींचा झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प उभारणी करताना कायदे, नियम धाब्यावर बसवले. संरक्षण खाते, तसेच पर्यावरण विभागाची पूर्वपरवानगी घेतली नाही. ही बाब शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली. त्यानंतर घाई गडबड करून विविध अटी शर्तीचे पालन करून पर्यावरण रक्षणाची दक्षता घेतली जाईल, अशी हमी देऊन महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळवली. परंतु त्यानंतरही महापालिकेने अटी, शर्तीचे पालन केले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एच. डी. गंधे यांनी प्रकल्प पाहणी केली असता, नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी खुलासा असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. डी. मोहेकर यांनी काढला. महापालिकेला पर्यावरण संरक्षणाबद्दल गांभीर्य नाही, असा ठपका ठेवून महापालिकेची 10 लाखांची बँक हमी जप्त करण्याचे आदेश बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. जप्त केलेली रक्कम ‘डिमांड ड्राफ्ट’ने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवून द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

2 मराठी अभिनेत्यांसह तिघे जखमी

2 मराठी अभिनेत्यांसह तिघे जखमी: पिंपरी। दि. 28 (प्रतिनिधी)

मुंबईहून-पुण्याकडे जाणारी भरधाव मोटार दुभाजक तोडून विरुद्ध लेनवरून रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडली. सोमवारी रात्री साडेनऊला कामशेत बोगद्याजवळ झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. यात चरित्र अभिनेते अभय राणो, विनोदी अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम, चालक उमेश शिंदे यांचा समावेश आहे. सकाळी झालेल्या अपघाताच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर हा अपघात झाला.

राणो व कदम हे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोकणस्थ’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निघाले होते. हे तिघे इंडिकाने पुण्याकडे जात असताना रात्री कामशेत बोगद्याजवळ आले. किलोमीटर 72.8क्क् जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजक तोडून लेनवरून कोलांटउडय़ा घेत खड्डय़ात गेली. वैद्यकीय पथकाने त्यांना गाडीतून बाहेर काढले. जखमींना निगडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या जीवितास कोणताही धोका नाही.

PCMC invites bids for clearing water hyacinth

PCMC invites bids for clearing water hyacinth: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Monday finally floated tenders inviting bids from contractors to clear water hyacinth which has now spread across a major portion of the Pavana river basin.