Wednesday, 4 April 2018

Most tech colleges slip, but DIAT, SPPU & Symbiosis rise in ranks

PUNE: The India Rankings 2018 for higher education revealed a significant drop in the rankings of most engineering colleges in the city. While the College of Engineering, Pune (CoEP) dropped from the 24th position to 45th in the ‘engineering’ college category, Bharati Vidyapeeth College of Engineering went down from 66 last year to 83 this year. 

‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डिस्पोजल’ कार्यपद्धती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार अधिक गतिमान होण्यासाठी ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. या कार्यपद्धतीची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. मुदतीमध्ये कामे पूर्ण न केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

पिंपरी महापालिकेत शिक्षक भरतीत घोटाळा

पारदर्शक कारभाराचा डंका वाजवित पिंपरी-चिंचवड महापालिकत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कारभारात शिक्षण विभागात 16 शिक्षकांना महापालिकेत  वर्ग करण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. महापालिकेतील भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याने भाजपच्या दोनही आमदारांना अंधारात ठेऊन हा ‘डाव’ साधला असल्याची जोरादार चर्चा महापालिका वर्तुळात आहे. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी मात्र; आयुक्तांच्या परवानगीनेच हे शिक्षक वर्ग केल्याचा दावा करतानाच लाखो रुपयांच्या ‘डिल’बाबत आपणाला काही माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत. 

स्मार्ट सिटी'च्या निधी बाबत काय म्हणाले आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी चिंचवड महापालिकेला स्मार्टसिटीसाठी २७ कोटींचा निधी मिळालायं.. केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेला हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेला मिळालाय.. पिंपरीचा स्मार्टसिटीत समावेश झाल्यापासून निधी मिळण्याची प्रतिक्षा महापालिकेला होती.. आता या निधीमुळे पुढील कामांचा मार्ग मोकळा झालायं... स्मार्ट सिटी अभियानातून नवी मुंबई बाहेर पडल्यान या अभियानात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला..

पालिकेतर्फे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबिर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी- खेळाडूंसाठी उन्हाळी सुटीनिमित्त हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 15 एप्रिल ते 14 मे या कालावधीत करण्यात आले आहे. शिबिर 12, 14 व 18 वर्षांखालील मुले व मुली असे सहा गटांसाठी आहे. त्यांचा शहरातील पालिका व खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी- खेळाडूंना लाभ घ्यावा, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

प्लॅस्टिक बंदीसाठी पालिकेची कडक मोहीम

प्लॅस्टिक बंदीसाठी पालिकेने कडक मोहीम हाती घेतली आहे . प्रथम प्लास्टिक वापरलेले आढळल्यास 5000 रु दुसऱ्यावेळी 10000रु व तिसऱ्या वेळेस आढळल्यास थेट पोलिस कारवाई अशी कठोर कारवाईची मोहीम राबविणार असल्याचे पालिका आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांनी सांगून प्लास्टिक बंदी कडकपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजीनगर ते हडपसर मेट्रोमार्गाचा ‘डीपीआर’

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शिवाजीनगर कोर्ट ते चैतन्य कॉलनी, हडपसर या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 'पीएमआरडीए'ने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनला (डीएमआरसी) पत्र पाठवून डीपीआरबरोबरच या मार्गासाठी किती खर्च येईल याची माहिती देण्याची विनंती केली आहे. 'पीएमआरडीए'कडून शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग करण्यात येणार असून त्याचाच एक भाग शिवाजीनगर कोर्ट ते हडपसर हा असणार आहे.

शहरबात पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण वाऱ्यावर

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची ज्या उद्देशाने स्थापना करण्यात आली, त्या हेतूला पूर्णपणे हरताळ फासण्यात आला आहे. आता प्राधिकरण व्यापारी वृत्तीने वागत असून तेथे बाराही महिने दलालांचा बाजार भरत आहे. मोठी लोकवस्ती असलेल्या प्राधिकरणाला सर्वानीच वाऱ्यावर सोडले आहे. मोठय़ा प्रमाणात ठेवी आणि हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या प्राधिकरणाचा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) किंवा महापालिकेत समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

औषधांच्या किमतीत पाच टक्‍क्‍यांनी वाढ

पुणे - तुम्हाला नियमित लागणाऱ्या औषधांवरील खर्चात या महिन्यापासून ३.४ टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. या वाढलेल्या ‘एमआरपी’वर वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावून खर्चाचा हा आकडा सुमारे पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. म्हणजे तुमच्या मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांवर दरमहा होणारा तीन हजारांचा खर्च आता ३ हजार १५० रुपयांपर्यंत जाईल, अशी माहिती पुढे आली आहे.

रिंगरोड कागदावरच

पुणे - विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण झाले खरे, परंतु पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिंगरोडच्या भूसंपादनापासून निधी उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय होण्यास तयार नाही. त्यामुळे सर्वेक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा रिंगरोड कागदावरच राहतो की काय, अशा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सहाव्या दिवशीही 24 तास धूर

पिंपरी - एक अग्निशामक बंब, दोन टॅंकर, दोन जेटिंग मशिन याद्वारे सहा दिवसांपासून २४ तास पाण्याचा मारा सुरू आहे. दोन जेसीबी यंत्रांद्वारे कचऱ्यावर माती टाकली जात आहे. तरीही खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा वल्लभनगर येथील कचरा डेपो धुमसतच आहे. या धुरामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. 

विदेशी कंपन्यांची तळेगावलाच पसंती

पिंपरी - विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी तळेगावला पसंती दिल्याने या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या भागाला सोन्याचे दिवस येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तळेगाव टप्पा दोनमध्ये चार विदेशी कंपन्यांना उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी 90.73 हेक्‍टर जमीन दिली आहे. त्यापैकी दोन कंपन्यांना मार्चमध्ये "ऑफर लेटर' देण्यात आल्याची माहिती "एमआयडी'चे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी "सकाळ'ला दिली. 

ई-कचऱ्यावर सुचविले ७५६ नागरिकांनी उपाय

पुणे  - वाढत्या ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या योजना, उपाय करता येतील याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्याच्या मुदतीचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड आयटी’कडून या सूचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ७५६ नागरिकांनी त्यांचा प्रतिसाद संकेतस्थळावर नोंदविला आहे. 

बीआरटी बसथांब्यामध्ये अडकला टेम्पो

चौफेर न्यूज –   एचए कंपनी समोरील बीआरटी बस थांब्यावर टेम्पोची उंची जास्त असल्याने    छताला टेम्पो अडकला. हा प्रकार   मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. यामुळे बीआरटी मार्गावर वाहतूक बंद झाल्याने मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

काळेवाडीत सत्संग भवनचे उद्‌घाटन

चौफेर न्यूज – काळेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सत्संग भवनाचे उद्‌घाटन संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रमुख  ताराचंद करमचंदानी यांच्या  हस्ते संपन्न झाले.

औद्योगिक परिसरात कचरा पेटवून दिल्यामुळे हवा प्रदूषण

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड औद्योेगिक परिसरातील पेठ क्रमांक 10 येथील अग्नीशमन केंद्राच्या  राखीव जागेवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने  अनधिकृतपणे चालू केलेल्या कचरा वर्गीकरण केंद्रामध्ये महापालिकेचे आरोग्य कर्मचारी व ठेकेदार निवासी भागातील कचरा येथे गोळा करून आणतात. वर्गीकरण केल्यानंतर उरलेला कचरा पेटवून दिला जातो. यामुळे परिसरात हवा प्रदूषित होत आहे.

शहरातील बंद असलेली खेळाची मैदाने तातडीने पुन्हा सुरू करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनेक खेळाडू बॅडमिंटन खेळासाठी बॅडमिंटन हॉलची मागणी करत असून उपलब्ध हॉल कमी पडत असल्याने खेळाडूंची अडचण होत आहे. महापालिकेच्या स्व:मालकीचे असलेले थेरगाव येथील बॅडमिंटन हॉल व पिंपरीतील ‘काशिबाई शिंदे’ बॅडमिंटन हॉल सद्ध स्थितीत बंद अवस्थेत असून, गोडावून म्हणून त्याचा वापर होत असल्याचे समजते. शहरातील खेळाडूंच्या असलेल्या मागणीचा विचार  करता त्यांच्या सोयीकरता सदर हॉल सुरू करणे गरजेचे असल्याचे समजते. सध्या शाळा व महाविद्यालयांचा सुट्ट्यांचा कालावधी सुरू होत असल्याने प्रकर्षाने याची उणीव जाणवणार आहे. तरी, हे सर्व बॅडमिंटन हॉल खेळाडूंना खेळासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत. अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनास दिली आहे.   

पिंपरी पासपोर्ट केंद्रातून एक वर्षात ३० हजार २५१ नागरिकांना मिळाले पासपोर्ट

पिंपरी (Pclive7.com):- गेल्या वर्षी २ एप्रिल २०१७ रोजी पिंपरी येथे केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत असून या पासपोर्ट कार्यालयातून एक वर्षात ३० हजार २५१ नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत.

फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे द्या!

जुनी सांगवी (पुणे) : सध्या विविध फळांचा हंगाम सुरू असुन शहरी भागात विविध प्रांतातील फळे पहावयास व चाखावयास मिळतात. सध्या आंबा, सिताफळ यांचा हंगाम असुन आपण घरी आणलेल्या फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे संकलित कराव्यात असे आवाहन येथील कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठान व ओम साई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.