एमपीसी न्यूज – ग्राहक व शेतकरी यांना जोडणार्या शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन स्थानिक नगरसेवक शीतल शिंदे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार किफायतशीर किमतीमध्ये ताजा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या आठवडे बाजारातून उपलब्ध करण्यात येणार असणार असल्याचे आयोजक व नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 29 October 2018
MPCB to check air quality for 2 weeks on Diwali
PUNE: The Maharashtra Pollution Control Board (MPCB) has iss ..
शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादीच जबाबदार
शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केले नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी फज्जा उडविला. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. यावर उपाययोजना म्हणून भाजपने आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी आरक्षणासाठी यशस्वी पाठपुरावा करून मंजुरी मिळविली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असा टोला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना लगावला.
उद्योगनगरीत बसथांब्यांची दुरवस्था; प्रवाशांचे हाल
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये रोज लाखो चाकरमानी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बससेवेचा वापर करतात; मात्र सद्यस्थितीत अनेक बसेसची दुरवस्था तर झाली आहेच, पण बसथांब्यांनाही अवकळा आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून हे बसथांबे त्यांच्यासाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरत आहेत.
शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पिंपरीत सामनाच्या अंकाची होळी
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सामनाच्या अंकाची होळी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एकनाथ पवारच शहरवासीयांचे खरे ‘नाथ’ : लक्ष्मण जगताप
प्रेम आणि सहाय्य करणा-याचा अनाथांना शोध असतो. अशी व्यक्ती त्यांच्यासाठी ‘नाथ’ असते. शहरातील अशा अनेक गरजू व्यक्तींना एकनाथ पवार यांनी सातत्याने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी एकनाथ पवार त्यांचे ‘नाथ’च आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच भाजपाने त्यांना संधी दिली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरून त्यांना महापालिकेत पक्षनेता म्हणून मानाचे आणि तितकेच जबाबदारीचेही पद दिले. हे पद केवळ महापालिकेपुरता मर्यादित नाही. त्यामुळे एकनाथ पवार शहराचेही नेते आणि ‘नाथ’ आहेत, असे मत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा
एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानात दुपारी तीन वाजता हे महासंमेलन होणार आहे.
अधिकारी, कर्मचा-यांनो ठेकेदारांकडून ‘गिफ्ट’ स्वीकारु नका; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू (‘गिफ्ट’), देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थाकडून कुटुंबियाला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. गिफ्ट स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाईची कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
‘पालिका कर्मचाऱ्यांनी खासदारांची पत्रके वाटली असल्यास त्यांचे निलंबन करणार’
एमपीसी न्यूज – राजकीय दबाव जुगारुन भोसरीतील अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई केली. कारवाईच्या नोटीस सोबत खासदारांचे पत्रक पालिकेच्या कर्मचा-यांकडून वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र ही पत्रके बाहेरच्या व्यक्तींनी वाटली असण्याची शक्यता आहे. अधिकारी, कर्मचा-याने ही पत्रके वाटली असतील तर ती चुकीचीच बाब आहे. त्याची चौकशी करुन संबंधित कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल.
रिंग रोड बधितांच्या लढ्यास ५०० दिवस पूर्ण
पिंपरी चिंचवड : घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने बाधितांनी गेल्या वर्षी १४ जून २०१७ रोजी प्रस्तावित एचसीएमटीआर ३० मीटर रिंग रोड विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. या लढ्यास ५०० दिवस पूर्ण झाल्यामुळे आज रोजी पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकर वाडी, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील ३५०० पेक्षा जास्त घरे ही प्रस्तावित २८ कि मी रिंग रेल्वे रोड प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. हजारो नागरिक रहिवाशी त्यामुळे रस्त्यावर येणार आहेत.
CCTVs to come up on bus-only lanes to prevent entry of private vehicles
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will install closed-circuit television (CCTV) cameras on Pune-Mumbai highway to prevent entry of private vehicles on the bus rapid transit system (BRTS) lanes.
“त्या’ जमिनी मालकी हक्काच्या करा
पिंपरी – प्राधिकरणाने संपादित केलेल्या अनेक जागा सर्वसामान्यांनी एजंट लोकांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेल्या आहेत. अशा तीन गुंठेपर्यंतच्या जागा संबंधित नागरिकांच्या मालकी हक्काचे करून द्यावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.
हिंजवडी पाठोपाठ वाकड येथील वाहतुकीत बदल
पिंपरी – हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडवल्यानंतर या बदलाचा ताण वाकड परिसरात येत असल्याने वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर वाकड येथील वाहतुकीत देखील बदल केला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी 26 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांच्या लेखी सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या.
कर सवलतीत शहरी-ग्रामीण भेदभाव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत आता “रेटींग’ नुसार सामान्य करात सवलत दिली आहे. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील सोसायटींमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. या “रेटींग’ मिळवणाऱ्या शहरी भागातील सोसायटींना सामान्य करात किमान 25 टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोसायटीने त्याच दर्जाचे काम केल्यास त्यांना केवळ 10 टक्केच सवलत मिळणार आहे.
मेट्रोच्या संथगतीचा महापालिकेला फटका
पिंपरी- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी विद्युत पोल काढून टाकण्यासाठी आठ महिने विलंब झाला आहे. त्यापोटी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. मात्र, अद्यापही मेट्रोचे काम सुरूच असल्याने या रकमेतच सर्व विद्युत पोल काढावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराला भाववाढ देण्याची नामुष्की महामेट्रोवर ओढावली आहे.
संकष्टीनिमित्त मोरया गोसावी मंदीरात गणेशभक्तांची गर्दी
पिंपरी –संकष्ट चतुर्थीनिमित्त चिंचवडगावातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी भाविकांच्या पहाटेपासूनच मंदीरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
बहिणाबाई प्राणी संग्रहालयात मानधनावर भरती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात मानधन तत्त्वावर तीन पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी पशूवैद्यक अधिकारी पदावरी नियुक्तीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या मासिक मानधनावर होणाऱ्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.
दिवाळीच्या तोंडावर वल्लभनगर आगार ओसाड
पिंपरी – अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी आली असली तरी पिंपरी-चिंचवड येथील राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे वल्लभनगर येथील आगार ओस पडले आहे. सततची इंधन दर वाढ व कर्मचाऱ्यांचा वाढता खर्च यामुळे आगाराच्या महसूलाची आवक पेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यातच पुरेसे प्रवासी नसल्याने दहा गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी ?
पिंपरी – एका बाजुला पोलीस आयुक्त, “”पोलिसांना मित्र समजा, इथून पुढे तुम्ही पोलिसांकडे नाही तर पोलीस तुमच्याकडे येतील”, असे खसा खरडून सांगत आहेत. मात्र त्यांचेच पोलीस अधिकारी फिर्यादींचा अवमान करणे, त्यांना ताटकळत बसवणे असे प्रकार करत आहेत. त्यावर कडी करत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.
प्रशासनाच्या विरोधात फेरीवाल्यांचा पालिकेवर मोर्चा
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अधिपासुन व स्थापनेपासून फेरीवाला अस्तित्वात आहे, फेरीवाला कायदा झाला आहे, ही समाधानाची बाब असली तरी शहरात व्यवसाय करणारे हातगाडी, टपरी, स्टॉल धारकांना जोपर्यंत कायद्यानुसार लाभ मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत विविध मागन्यांसाठी फेरीवाल्यानी आज शुक्रवारी (दि. 26) महापालिका भवनावर मोर्चा काढला.
Pune: Senate members want SPPU to get active on social media
From social media outreach to starting its mobile application, members of the Senate have put forward several suggestions before the Savitribai Phule Pune University (SPPU) in a bid to make it more tech-savvy and reachable to students.
Subscribe to:
Posts (Atom)