Monday, 10 September 2012

टाटा मोटर्स कलासागरच्या कलामहोत्सवाची संगीतमय सांगता

टाटा मोटर्स कलासागरच्या कलामहोत्सवाची संगीतमय सांगता
पुणे, 9 सप्टेंबर
टाटा मोटर्स कलासागरच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कलामहोत्सवाची संगीतमय सांगता करण्यात आली. नाट्य, साहित्य, कला आणि संगीताची भरगच्च मेजवानी असलेल्या कलामहोत्सवाला रसिकांची भरभरून दाद मिळाली.

Low response to PMPML complaint redressal programme

Low response to PMPML complaint redressal programme: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited received just 34 complaints on its first "Pravasi Din'' programme organized for redressal of grievances of the passengers.

गणेशोत्सवातून सामाजिक प्रश्नांचा वेध

गणेशोत्सवातून सामाजिक प्रश्नांचा वेध
पिंपरी, 6 ऑगस्ट
समाजात घडणा-या घडामो़डींचे पडसाद जसे नाटक सिनेमासारख्या गोष्टींवर त्वरित उमटतात. तसेच ते सार्वजनिक उत्सवांमधून सादर केल्या जाणा-या कार्यक्रमांमधून दिसून येतात. अशा घडामोडीतून समाजावर होणा-या चांगल्या वाईट परिणामांची कल्पना देऊन जनजागृती करण्याची संधी मिळते ती सार्वजनिक गणेशोत्सवांमधून. परंतु अशी जनजागृती मनोरंजनाच्या माध्यमातून झाली तर ती जनमानसाला अधिक भिडते. यंदाच्या गणेशोत्सवात अशा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याची, देखावे सादर करण्याची संधी पिंपरी-चिंचवड मधील सार्वजनिक गणेश मंडळांकडून घेतली जात आहे हे गणेशोत्सवाच्या तयारीतून दिसून येत आहे.

'डीपी'च्या योग्य अंमलबजावणीने पिंपरी-चिंचवडचेही सिंगापूर

'डीपी'च्या योग्य अंमलबजावणीने पिंपरी-चिंचवडचेही सिंगापूर: 'डीपी'च्या योग्य अंमलबजावणीने पिंपरी-चिंचवडचेही सिंगापूरशहर विकास आराखडा (डीपी) म्हणजे नगरीचा चेहरा. भविष्यातील लोकसंख्यावाढ गृहीत धरून पंचवीस-तीस वर्षांचे नियोजन त्यातून होते. हे नियोजन व उद्योगनगरीचा चेहरा जनतेला पुरेसा ज्ञात नव्हता. हे काम फक्त पुढाऱ्यांचे आहे; हा आपला प्रांतच नाही, इतके लोक फटकून असतात. त्यामुळे आराखडा, त्यातील आरक्षणे कोणती, ताब्यात किती, विकसित-अविकसित किती, बदलली किती, त्यांच्या सद्यःस्थितीचा लेखाजोखा आजवर गुलदस्तात होता. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रथमच ही सर्व माहिती पालिकेच्या वेबसाइटवर (www.pcmcindia.gov.in) जनतेसाठी खुली केली आहे. त्यातून कटू सत्य समोर आले. विकास आराखड्याची कासवगती लोकांसमोर आली. किमान यापुढे प्रत्येक नगरसेवकाला आपल्या वॉर्डमधील आरक्षणांची जाण असावी. करदात्या नागरिकांनीसुद्धा त्यात लक्ष घातले पाहिजे. "डीपी'चे अर्थकारण, राजकारण, समाजकारण समजून घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पारदर्शक कारभार व विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढावा, हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नगरसेवकांवर जनतेचाही अंकुश राहू शकतो. ही माफक अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 

उपमुख्यमंत्र्यांनी पुसली कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने

उपमुख्यमंत्र्यांनी पुसली कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने: पुणे।दि. ८ (प्रतिनिधी)

पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव ही देशविदेशातील गणेशभक्तांसाठी उत्साह व आनंदाची पर्वणी असल्याने उत्सवकाळात १0 दिवस लाऊडस्पीकरला मध्यरात्रीपर्यंत परवानगी मिळावी, अशी शहरातील गणेश मंडळांनी केलेली मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुडकावून लावली. सण-उत्सवांत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असलेल्या शासकीय अध्यादेशात कुठलाही बदल करण्यास त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवात फक्त पाच दिवसच परवानगी देण्याची तयारी दाखवून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली.

गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी आज शांतता समिती व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तिला महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, अँड. वंदना चव्हाण, आमदार गिरीश बापट, मोहन जोशी, बापू पठारे, माधुरी मिसाळ, अँड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, महापालिका आयुक्त महेश पाठक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, जिल्हाधिकारी विकास देशमुख, सहपोलीस आयुक्त संजीव सिंघल यांच्यासह नगरसेवक व प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याचे वैभव असलेला गणेशोत्सव उत्साह व जल्लोषात साजरा करण्यासाठी राज्य सरकारने सण-उत्सवांसाठी राखीव असलेल्या १५ दिवसांच्या परवानगीतील १0 दिवस द्यावेत, अशी गणेश मंडळांची मागणी आहे. शासकीय आदेशात बदल करून पुण्यासाठी संपूर्ण १0 दिवस उत्सव साजरा करण्यासाठी द्यावेत, अशी समस्त पुणेकरांची मागणी आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या याबाबतच्या भावना अधिक तीव्र आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रमात त्या व्यक्त केल्या. गुजरातमध्ये नवरात्र उत्सवात पूर्ण ९ दिवस परवानगी दिली जाते, तर पुण्यात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्यावर्षी उत्सवाच्या परवानगीचे शिल्लक असलेले चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणीही आमदार मिसाळ यांनी बैठकीत लावून धरली. कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री गणेशोत्सवाची भेट देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी या मागणीबाबत चर्चाही शक्य नाही असे सांगितले.

पवार म्हणाले, सण, उत्सवाच्या परवानगीसाठी राज्यसरकारकडे १५ दिवसांचे अधिकार आहेत. गणेशोत्सवाला त्यातील दोन दिवस दिले असून जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारातील महाराष्ट्र दिनाचा १ दिवस देण्यात आला आहे. त्यापेक्षा जास्त दिवस वाढवून देता येणार नाही. सवाई गंधर्व महोत्सवाला एक दिवस द्यावा लागतो.

शिवजयंती, ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस अशी सणांची जंत्रीच उपमुख्यमंत्र्यांनी वाचून दाखविली. या सण, उत्सवांच्या परवानगीचे दिवस गणेशोत्सवाला देण्यास त्यांनी असर्मथता दर्शविली. मिरवणुकीतील दोन गणेशमंडळाचे अंतर कमी करण्यासाठी पोलीस व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, अशी सूचना करत मूळ प्रश्नाला त्यांनी बगल दिली.

112 civic staff members transferred

112 civic staff members transferred: The civic administration of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has conducted third major internal reshuffle in which nine office superintendents and 103 peons have been transferred.

Just 217 schools in district have transport panels

Just 217 schools in district have transport panels: This was revealed at a review meeting held by school transport officials at the RTO on Friday.Of these schools, 143 are in Pune city, 72 are in Pimpri-Chinchwad and two are in Baramati.

Politicos, activists join hands to fight Pimpri-Chinchwad Municipal Corporation's demolition drive

Politicos, activists join hands to fight Pimpri-Chinchwad Municipal Corporation's demolition drive: Pune: Social organizations and all major political parties, except the ruling NCP, have formed a 'Ghar Bachao Kruti Samiti' to fight for their demand to regularize unauthorized constructions in Pimpri-Chinchwad.

सीसी टीव्हीसंदर्भात उद्या मुंबईत बैठक

सीसी टीव्हीसंदर्भात उद्या मुंबईत बैठकपुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसी टीव्ही बसविण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना काढल्या असून, या संदर्भातील बैठक सोमवारी (ता. 9) मुंबईत बोलाविण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. 

शिवकुमार शर्मा यांना आशा भोसले पुरस्कार

शिवकुमार शर्मा यांना आशा भोसले पुरस्कार: पिंपरी - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान व सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने दिला जाणारा "आशा भोसले पुरस्कार' प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला आहे.
शिवकुमार शर्मा यांना आशा भोसले पुरस्कार

जागेअभावी रखडला 'अर्बन हट' प्रकल्प

जागेअभावी रखडला 'अर्बन हट' प्रकल्प: पिंपरी -&nbsp महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी दिल्ली व नवी मुंबईच्या धर्तीवर शहरात महापालिकेच्या वतीने "अर्बन हट' प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

राज्यमंत्री सतेज पाटील यांची हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट

राज्यमंत्री सतेज पाटील यांची हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट: पिंपरी -&nbsp हाफकिन जैव-औषध निर्माण महामंडळाने (हाफकिन इन्स्टिट्यूट) आगामी 15 वर्षांचा आराखडा तयार करावा, असे आदेश गृह आणि अन्न-औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पिंपरी येथे दिले.

दादांचा प्रस्ताव 'आबां'कडे पडून

दादांचा प्रस्ताव 'आबां'कडे पडूनपुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या तीस कोटी रुपयांच्या योजनेस अद्याप आर. आर. पाटील यांच्या गृह खात्याने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे पुण्यातील साखळी बॉंबस्फोटांनंतर राज्य सरकारने केलेल्या घोषणा हवेतच राहिल्या आहेत. 

BRT buses to have doors on right hand side.

BRT buses to have doors on right hand side.: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has reiterated that the bus rapid transit system (BRTS) buses that will ply in Pimpri Chinchwad will have doors opening on the right side.

३० लाखांचा गुटखा चाकणजवळ जप्त

३० लाखांचा गुटखा चाकणजवळ जप्त: चाकणनजीक खेड तालुक्यातील कुरूळी येथील एका विक्रेत्याकडे गुटख्याचा तीस लाख रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनद्रव्य (एफडीए) विभागाने कारवाई करून जप्त केला.

पिंपरीची घरकुल योजना बेकायदा

पिंपरीची घरकुल योजना बेकायदा: पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या घरकुल योजनेच्या विविध प्रकारच्या परवान्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे हा प्रकल्प बेकायदेशी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत प्राधिकरणाला कळवूनही दखल घेतली जात नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

अपरिचित वाद्यांचा घुमणार नाद

अपरिचित वाद्यांचा घुमणार नाद: गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर वाढविण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवडमधील ढोल-ताशा पथके यंदा विशेष आग्रही आहेत. त्यामुळे अनेक अपरिचित वाद्यांचा नाद यंदा मिरवणुकीत घुमणार आहे.

सलमानी जमातीच्या तक्रारींचे निरसन करणार

सलमानी जमातीच्या तक्रारींचे निरसन करणार: पिंपरी-चिंचवड सलमानी जमातीने केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निरसन करण्याचे आश्वासन वीज वितरण कंपनीने संस्थेला दिले आहे.
वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या विरोधात मोर्चाचा इशारा सलमानी जमातीने दिला होता. मात्र, कंपनीने त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

आंदोलनातून मुख्यमंत्र्यांचा अपमान

आंदोलनातून मुख्यमंत्र्यांचा अपमान: शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्यावर पिंपरी-चिंचवड काँग्रेसने आयोजित केलेले आंदोलन म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अपमान होय. हे आंदोलन काँग्रेसचे नव्हतेच, असा दावा याच पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केला.

मतदानातून लोकांची मते जाणणार

मतदानातून लोकांची मते जाणणार: शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्यावर मतदानाच्या माध्यमातून लोकांचे मते जाणून घेण्यात येतील, त्यानंतर पिंपरी-चिंचवड बंदबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दिली.

वायसीएमच्या सुरक्षारक्षकाला मारहाण

वायसीएमच्या सुरक्षारक्षकाला मारहाण: पेशंटला भेटण्यास आलेल्यांना अडविल्यामुळे राग येऊन नातेवाईकांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

भाऊसाहेब भोईर म्हणतात..काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा अपमान!

भाऊसाहेब भोईर म्हणतात..:
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा अपमान!
पिंपरी / प्रतिनिधी
अनधिकृत बांधकामप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन ‘वरातीमागून घोडे’ नाचवण्याचा व पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार असून यासंदर्भात आपल्याला विश्वासात न घेता हे आंदोलन झाले असल्याने ते काँग्रेसचे नव्हतेच, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनीच पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार असून ते अकार्यक्षम ठरतील, असे वातावरण आपणच तयार करत आहोत. कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा अपमान झाल्याची टिप्पणी भोईर यांनी केली.
Read more...

पं. शिवकुमार शर्मांना आशा भोसले पुरस्कार

पं. शिवकुमार शर्मांना आशा भोसले पुरस्कार: पिंपरी। दि. ७ ( प्रतिनिधी)

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा ‘आशा भोसले’ पुरस्कार जगप्रसिद्ध संतूरवादक आणि ख्यातनाम संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पुरस्काराची घोषणा झाली.

नाट्यपरिषद शाखा, पिंपरी-चिंचवड, कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धीविनायक ग्रुपचा हा पुरस्कार परिषदेचे शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी जाहीर केला. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील राजेशकुमार सांकला, डॉ. रवींद्र घांगुर्डे, विजय जोशी आणि डॉ. वंदना घांगुर्डे यांच्या निवड समितीने पं. शिवकुमार यांची पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच चिंचवड येथे होणार असल्याचे भोईर यांनी कळविले आहे. देशपातळीवर संगीतक्षेत्रात अजोड कामगिरी करणार्‍यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. पहिला पुरस्कार २00२ मध्ये ‘आनंदघन’ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वीकारला होता. नंतर खय्याम, रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, प्यारेलाल, कल्याणजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक आणि शंकर महादेवन या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जम्मू येथे १३ जानेवारी १९३८ रोजी जन्म झालेल्या शिवकुमार यांना वयाच्या ५ व्या वर्षी वडिलांनी गायन व तबला वादन शिकवण्यास सुरुवात केली. जम्मू-काश्मिरमधील संतूर हे लोकवाद्य वाजविण्यास त्यांनी १३ व्या वर्षी प्रारंभ केला. त्यावर प्रभुत्व मिळवीत त्यांनी संतूरला विश्‍वकिर्ती मिळवून दिली.

१९५५ मध्ये मुंबईत पहिला जाहीर वादनाचा कार्यक्रम केला. व्ही. शांताराम यांचा ‘झनक झनक पायल बाजे’ या संगीत नृत्यमय चित्रपटात त्यांनी एका दृष्यासाठी पार्श्‍वसंगीत दिले. त्याची स्वतंत्र ध्वनी तबकडी १९६0 मध्ये प्रसिद्ध झाली. विख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासमवेत १९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा दज्रेदार अल्बम त्यांनी दिला. ‘सिलसिला, चांदणी, डर, लम्हे, फासले आदी चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत गाजले.

YCMH a sentinel surveillance centre

YCMH a sentinel surveillance centre: YCM Hospital in Pimpri will soon be accredited as one of the country’s sentinel surveillance centres that will follow a standard protocol to test serum samples.