Monday, 20 August 2018

'Cops at chowks, not chowkies' is Pimpri-Chinchwad police chief's mantra

The new police commissioner of Pimpri Chinchwad region has immediate plans to reverse the local policing system of residents being forced to come to police, by posting policemen at all possible nooks and corners of the city. At its nascent stage, RK Padmanabhan, the police commissioner, has plans to reduce traffic woes, initiate preventive action against criminal elements, and take strict action against policemen who are hand in gloves with local criminals.
pune,cops,chowks

PCMC top cop set to tackle wrong side driving menace

R K Padmanabhan, the first police commissioner of Pimpri Chi ..

After police commissionerate, Pimpri residents revive district status demand

At a time the state government has addressed the long-pending demand of a separate police commissionerate for Pimpri-Chinchwad, another old demand for a district status has been revived.
Residents say the industrial city should have its own collectorate. (Express photo)

पोलिस ठाण्यांमध्ये आता जादा कृती पथके

पिंपरी - एखादी घटना घडल्यास त्या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक अल्पवेळेत पोचावी, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये जादा कृती पथके तयार करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी दिले आहेत. एका पथकात किमान आठ जण असणार आहेत. मनुष्यबळानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये हे पथक तयार केले आहे.

रावेतला स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी

वाल्हेकरवाडी - रावेत परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीही वाढत आहे. रावेत परिसरात गुन्हा घडला अथवा काही कारणास्तव पोलिस स्टेशनला काम पडले तर नागरिकांना देहूरोडला जावे लागते. रावेत परिसरात एकही पोलिस चौकी नाही त्यामुळे परिसरात पोलिस चौकी पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. 

शांतता आणि सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांचे केले कौतुक

रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडतर्फे अभिनव उपक्रम
पिंपरी : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देऊन सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर पोलीस प्रशासन देशांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था चोख राखत आहे. त्यामुळे सैनिकांचे कौतुक करत असताना देशांतर्गत सुव्यवस्था राखणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, आपले कर्तव्य आहे. हाच धागा पकडत रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडने ‘शुक्रिया ए वतन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कर्मचार्‍यांचा सन्मान केला. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील ए.सी.एस. कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रणव लेले, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डॉ. डी. वाय. पाटील ए.सी.एस.चे अध्यक्ष पुनीत माने, दिग्विजय हांडे, सिद्धांत अगरवाल, उमर इनामदार, तेजस समर्थ, तुषार समर्थ, गोपाल सावंत, विकास काकारपार्थी, ओमंग कुमार थामन, नीरज कुमार, स्वप्नील कोल्हे, प्रितेश पोरेड्डी, सई सोहनी, यशराज खंडागळे, निश्‍चय वर्मा, गुंजन चौधरी, विप्लव आदी उपस्थित होते.

Pune: Diesel colour confuses customers

The All India Petrol Dealers’ Association (AIPDA) on Saturday sought to quell rising instances of customers mistaking a variety of white-coloured diesel for kerosene.

वर्गणीसाठी मंडळाची नोंदणी बंधनकारक धर्मादाय आयुक्‍तालयाचे गणेश मंडळांना आवाहन

सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रत्येकजण गणरायाच्या स्वागताच्या तयारीला लागला आहे. ज्या प्रमाणे घरामध्ये गणरायाचे स्वागत केले जाते तसेच सार्वजनीक गणेश मंडळांकडूनही गणरायाचे स्वागत केले जाते. गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागतासाठी आणि दहा दिवसांच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा केली जाते. मात्र, मंडळाला वर्गणी गोळा करायची असेल तर अगोदर धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून ऑनलाइन पद्धत्त सुरू करण्यात आली असून, गणेश मंडळांना २७ ऑगस्टपासून नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर आयुक्तालयाची वर्गणीसाठी परवानगी दिली जाणार आहे.

‘सारथी’ हेल्पलाइनवर साडेपाच लाख कॉलद्वारे नागरिकांच्या शंकाचे निरसन

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या हेल्पलाइनवरून नागरिकांना मार्गदर्शन
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची संपूर्ण माहिती सोप्या शब्दांत उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ‘सारथी’ (स्टॅम्प अ‍ॅन्ड रजिस्ट्रेशन असिस्टन्स थ्रू हेल्पलाइन इन्फर्मेशन) हेल्पलाइन सुरू करण्यात आली. मागील तीन वर्षात या हेल्पलाइनवर तब्बल साडेपाच लाख कॉल आले असून या नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीत मोकाट कुत्री, डुकरे झाली उदंड

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत मोकाट कुत्री व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून नागरिकांवरील हल्ल्याचा घटना वाढत आहेत; तर डुकरांमुळे कचरा कुंडीशेजारी घाण पसरून परिसरात अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, नागरिक हैराण झाले आहेत.

हॉटेल्स, उद्योगांचा ओला कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय

कचर्‍यापासून होते इंधन, वीज, खतनिर्मिती अन्य बरेच काही
महापालिकेतर्फे ऑटो क्लस्टरमध्ये प्रदर्शन सुरू

नागरिकांनी जाणून घेतले घनकचरा व्यवस्थापन

पिंपरी – कचऱ्यापासून वीज, खत निर्मिती, सांडपाण्याचा पुर्नवापर, कचरा विघटनाच्या विविध पध्दती, त्यासाठी उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान हे सारे काही एका छताखाली सामावलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचा रविवारी (दि. 19) समारोप झाला. रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून शहरवासियांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी

पिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात होत असून, स्वाइन फ्लूबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. त्यांच्या सोयीसाठी औषधे (टॅमिफ्लू), लस व इतर साधनसामग्री तातडीने खरेदी करणे गरजेचे असल्याने ते खरेदी करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

पिंपरीमध्ये सापडले ‘स्वाईन फ्लू’चे 17 रुग्ण

मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला प्रस्ताव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडे विविध विभागाकडील जुने, निरुपयोगी असे दीड कोटी रुपयांचे भंगार आहे. भंगार निरुपयोगी झाले असून फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिका या भंगाराचा लिलाव करणार आहे. महापालिकेच्या नेहरुनगर व इतर ठिकाणच्या गोडाऊन येथे विनावापराचे व फेरवापर होणार नाही असे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. या भंगाराचा लिलाव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. यासाठी हा ठराव विधी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

महापालिका करणार दीड कोटींच्या भंगाराचा लिलाव

मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला प्रस्ताव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडे विविध विभागाकडील जुने, निरुपयोगी असे दीड कोटी रुपयांचे भंगार आहे. भंगार निरुपयोगी झाले असून फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिका या भंगाराचा लिलाव करणार आहे. महापालिकेच्या नेहरुनगर व इतर ठिकाणच्या गोडाऊन येथे विनावापराचे व फेरवापर होणार नाही असे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. या भंगाराचा लिलाव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. यासाठी हा ठराव विधी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

चाकण, राजगुरूनगर नगरपरिषदेची हद्दवाढ लालफितीत अडकली

सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका
चाकण : चाकण शहराच्या आणि जवळच्या ग्रामपंचायतींच्या विकासाला चालना मिळावी यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली हद्दवाढ प्रशासकीय स्तरावर लालफितीत अडकून पडली आहे. जवळच्या ग्रामपंचायतींचा संमिश्र प्रतिसाद आणि प्रशासकीय स्तरावर होत असलेला विलंब यामुळे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राज्य शासनाचा नगरविकास विभाग याबाबत आता काय भूमिका घेणार यावरच जवळच्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व अवलंबून असणार आहे. चाकण शहराच्या आणि जवळच्या ग्रामपंचायतींच्या विकासाला चालना मिळावी यासाठी हद्द्वाढी संदर्भात उपविभागीय अधिकारी खेड, तहसीलदार खेड, चाकण नगरपरिषद यांच्याकडे चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे. चाकणजवळचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी पूरक स्थिती त्यामधून समोर आली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता. १९) मंचर शहरात सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांना वाहन कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. अत्यंत मंद गतीने वाहतूक सुरू होती. 

नव्या पुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण

पिंपरी - पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी बोपोडीजवळील हॅरिस पुलानजीक उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या पुलाचे ६० टक्‍के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४० टक्‍के कामाला सुरवात झाली आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा ताण हलका होणार आहे.

पिंपरी- वाहतूक नियम धाब्यावर

पिंपरी-चिंचवडमधील चौका-चौकांत दुचाकीस्वार तसेच तीनआसनी रिक्षाचालक वाहतूक नियम तोडत असतात. खराळवाडीतून पिंपरी चौकात दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येतात. इंदिरा गांधी उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक असतानाही दुचाकीस्वार नियम तोडतात. चिंचवड स्टेशन चौकातही दुचाकी स्वार मनमानी करतात. नागरिकांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागते. पिंपरीतील डाल्को कॉर्नरवरून एच. ए. भुयारी मार्गाकडे विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार जातात. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.  (अरुण गायकवाड : सकाळ छायाचित्रसेवा)

सक्षम पीएमपी हाच उपाय

पुणे - शहरातील सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तब्बल ११ प्रकल्पांची घोषणा झाली असली, तरी त्यातील एकही प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत पीएमपी सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्याकडे होणारे दुर्लक्ष रस्त्यावरील वाहनांची कोंडी वाढवत आहे. 

दहा कोटींचा रस्ता सहा महिन्यांत खड्डयात

हिंजवडी – माण रस्ता ः आयटीनगरीचा प्रवास ठेचकाळत
वाकड – मागील काही महिन्यापूर्वीच सुमारे दहा कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेला हिंजवडी – माण रस्ता एकाच पावसाळ्यात खड्डयात गेला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आयटीनगरी म्हणून जगविख्यात असलेल्या हिंजवडीचा प्रवास ठेचकाळत सुरू आहे. दहा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे प्रवास सुखकर होईल हा नागरिकांचा समज पहिल्याच पावसाने धुळीत मिळवला आणि रस्त्याची चाळण झाली.