MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 7 May 2020
‘फार्मासिस्ट आपल्या ई-संपर्कात’, डॉ. डी. वाय पाटील फार्मसीतर्फे औषध साक्षरता व समुपदेशन अभियान
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, डॉ. डीवाय पाटील इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयाने, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे यांच्या मार्गदर्शनामध्ये औषध साक्षरता जनजागृती व समुपदेशना साठी ‘फार्मासिस्ट आपल्या ई-संपर्कात’ हे अभियान सुरू केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक, […]
दुकाने चालू करण्यासाठीच्या परवानगीचा अर्ज महापालिका संकेतस्थळावर उपलब्ध
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने काही दुकाने चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर आजपासून अर्जाचा नमुना उपलब्ध झाला असून ऑनलाईन अर्ज भरुन व्यावसायिकांनी आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मेलवर पाठवयाचा आहे. अर्ज केल्यानंतर महापालिकेची टीम प्रत्यक्षस्थळाची पाहणी करणार आहे. […]
कंन्टेमेंट झोन : झोपडपट्टीमधील नागरिकांच्या कोरोना टेस्टमध्ये वाढ करा, भाजप आमदारांच्या प्रशासनाला सूचना
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कंन्टेमेंट झोन, झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची वाढ लक्षात घेता. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. त्याचपध्दतीने असा नावीण्यपुर्ण उपक्रम राबवून कोरोनाच्या टेस्ट मोठ्या संख्येने करावी, अशी सूचना भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनला केली आहे. तसेच अशा 30% परप्रांतीय कामगारांची […]
मोशी, मोहननगर येथील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, दिवसभरात नवीन 12 रुग्ण; ‘हा’ परिसर सील
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, मोहननगर येथील तिघांचे आणि पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार सुरु असलेल्या एक महिलेचे अशा चार जणांचे आज (बुधवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, आज सकाळीच मोशी, पिंपळेगुरव, चिंचवड आणि पुण्यातील एक अशा आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 12 नवीन रुग्णांची भर पडली आहे. मोशी, मोहननगर, […]
खासगी डॉक्टरांना सरकारची नोटीस ; कोरोना लढ्यात सहभागी व्हा नाहीतर…
मुंबई |कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे आरोग्य विभागावर आलेला एकंदर ताण पाहता आता सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांनाही एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवरव सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपलं योगदान द्यावं असं ही नोटीस सांगते.
अन्नामृत फाउंडेशन आणि नाना काटे मित्र परिवार भागवतयं दररोज शेकडो भुकेल्यांची भूक..!
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या धर्तीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरजू कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी अन्नामृत फाउंडेशन आणि नाना काटे मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या महिनाभरापासून दररोज चारशे ते पाचशे लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
नितीन भोसले सोशल वेल्फअरकडून पोलिसांना मास्क, सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोजचे वाटप
पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विरूध्दच्या या लढाईत अनेक संस्थांनी सामाजिक भान ठेवत प्रेरणादायी कार्य केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नितीन भोसले सोशल वेल्फेअरकडून पोलीस बांधवांना मास्क,सॅनिटायझर आणि हॅन्डग्लोजचे वाटप नुकतेच करण्यात आले.
मद्यप्रेमींनो ऐकलंत का ? तुम्हाला काय आहे सवलत वाचा...
पुणे : व्यक्तीला दारू खरेदी करणे, ते जवळ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, ते स्वतः:च्या घरात पिणे असो की घरात ठेवायचे झाल्यास त्याला उत्पादन शुल्क विभागाकडून सशुल्क परवाना घेणे कायद्यानेच बंधनकारक आहे. 1 दिवसापासून ते आजीवन पर्यंत हा परवाना मिळतो. मात्र राज्याचे उत्पादन विभाग आणि दारू विक्रेत्यांच्या उदासीनतेमुळे राज्य सरकारला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.
'दारू विक्रेत्यांनो, 'या' नियमांचे पालन करा नाहीतर...'; जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय इशारा!
पुणे : सूचनांचे पालन न करणाऱ्या आणि गर्दीवर नियंत्रण राहत नसल्याचे निदर्शनास आल्यास मद्य विक्री करणाऱ्या त्या दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा अर्ज भरण्याबाबत पुणे विद्यापीठाने केली महत्त्वाची घोषणा!
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षांचे अर्ज भरण्यास स्थगिती दिली आहे. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी ही माहिती दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकास हवाच !
कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने जगभरात धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउन, सोशल डिस्टन्ससारख्या उपायांनी त्याला आळा घालता येत आहे. मात्र, दाट झोपडपट्टीच्या भागात याला मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव तिथे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भविष्यात अशा आजारांना रोखण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासाला महत्वाचे स्थान दिले आहे.
बांधकाम प्रकल्पांना तीन महिने मुदतवाढ; 'महारेरा’चा निर्णय
‘महारेरा’चा निर्णय; ग्राहकांना द्यायच्या भरपाईत सूट देण्याची मागणी
पुणे - कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थीवर मात करण्यासाठी १५ मार्च नंतरच्या प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय महारोराने घेतला आहे. परंतु हा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे हरियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने ही नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी. तसेच या दरम्यानच्या कालावधीत ग्राहकांना द्यावयाच्या भरपाई बाबत सूट देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बांधकाम क्षेत्राकडून केली जात आहे.
पुणे - कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थीवर मात करण्यासाठी १५ मार्च नंतरच्या प्रकल्पांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय महारोराने घेतला आहे. परंतु हा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे हरियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने ही नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी. तसेच या दरम्यानच्या कालावधीत ग्राहकांना द्यावयाच्या भरपाई बाबत सूट देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बांधकाम क्षेत्राकडून केली जात आहे.
Subscribe to:
Posts (Atom)