Monday, 5 February 2018

पिंपरीत साकारतोय रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो

पिंपरी (जि. पुणे) - सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेल्या ‘सोफिया’ रोबो गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात चर्चेत असला, तरी पिंपरी-चिंचवडमधील अनिल जैन यांनी ‘रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो’ तयार केला आहे. रिअलिस्टिक प्रकारातील भारतातील पहिला ‘रोबो’ असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्याच्या माध्यमातून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या दिशेने पाऊल उचलले आहे. या रोबोचे नामकरण ‘वीर’ असे करण्यात आले आहे. 

PCMC refuses rethink about Empire Estate flyover ramps

PIMPRI CHINCHWAD: Municipal commissioner Shravan Hardikar has turned down a request to rethink the construction of ramps for the long-pending Empire Estate flyover in Chinchwad.

Leaders of BJP oppose plan to hike water tax

PIMPRI CHINCHWAD: In a severe embarrassment to the ruling BJP, a member of the civic body's standing committee and party corporators have sent a letter to municipal commissioner Shravan Hardikar opposing the proposed increase in water tax till all the areas received equitable and adequate supply.

स्थायी सदस्यांचे भवितव्य बुधवारी ठरणार

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार असून, त्याजागी नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी येत्या बुधवारी (ता. ७ फेब्रुवारी) सोडत आयोजित केली असून, नव्या आठ सदस्यांची नावे २० फेब्रुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निश्‍चित केली जाणार आहेत, तर नव्या सदस्यांसह १६ सदस्यांमधून विभागीय आयुक्तांच्या संमतीने ७ मार्च रोजी नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

जोतिबा उद्यानाची दुरवस्था

पिंपरी - काळेवाडी येथील जोतिबा उद्यानात चालणारे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉलचे सामने, प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळे, दुर्गुले व मद्यपींचा वावर आणि रोडरोमिओंचा हैदोस यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. 
याबाबत अनेकदा निर्दशनास आणूनही पोलिस व महापालिका प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे. अनेक वर्षांनंतर तयार केलेल्या काळेवाडीतील या एकमेव उद्यानाचा फायदा स्थानिक रहिवाशांना होतच नाही. उद्यानात चालणाऱ्या अश्‍लील चाळ्यांमुळे परिसरातील नागरिक आपल्या पाल्यांना उद्यानात पाठवत नाहीत. स्वच्छतागृहाची साफसफाई नसते, फरशा तुटल्या आहेत. झाडे मोडली आहेत. खेळणी तुटली आहे. दिवे-धबधबा बंद, खेळण्यांचा वापर मोठी मुलेच करत आहेत. त्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

गोपीनाथ मुंडे हे लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्‍तिमत्व – पंकजा

सांगवी – पीडित, वंचित वर्गाचा विकास करण्यासाठी काम करायचे आहे. उत्कृष्ठ लोकनेता होणे, हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. गोपीनाथ मुंडे हे एक लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्‍तिमत्व होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारांवर मी अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

भाजप विरोधात राष्ट्रवादी नगरसेविकेचे आंदोलन

पिंपरी – महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर कचरा फेको आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी आज अनोखे आंदोलन करत सत्ताधारी भाजपचा निषेध केला.

श्रेयवादाचा “उद्योग’

राज्यातील नामवंत एमआयडीसी म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने पिंपरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम घेतला. या एकाच कार्यक्रमाची विभागणी करुन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते दोनवेळा उद्‌घाटन केले. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. त्यामुळे उद्योगजगताला उभारी देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला राजकीय गालबोट लागले. शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वितंडवाद असाच सुरु राहिल्यास त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेन इन’ला बसण्याची शक्‍यता आहे.

...आवरा या रोडरोमिओंना

पिंपरी - फेब्रुवारी जवळ आला की महाविद्यालयात फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोझ डे, व्हॅलेंटाइन डे, साडी डे असे विविध डे साजरे करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून पडली आहे. या विविध डेच्या निमित्ताने बाहेरील विद्यार्थीही चोरी-छुपे महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करतात. अशा विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. याशिवाय रोडरोमिओंकडून दररोज होणारा त्रास वेगळाच असतो. 

पोलिसांमुळेच जनसामान्यांचे जीवन सुकर- पोलीस उपा. गणेश शिंदे

वाल्हेकरवाडी(पुणे) : जुन्या काळापासून पोलीस अस्तित्वात आहेत. कोणत्याही क्षेत्रात पोलिसांची कामगिरी ही महत्वाची असते, पोलिसांमुळेच सामान्यांचे जीवन सुखर होते असे प्रतिपादन पुणे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सकाळ यिन संवाद मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. सकाळ यिन व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे राजेश्री शाहू इंजिनिअरिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के जैन, संचालक प्रा. रवी सावंत,डॉ. अजय पायथाने,डॉ अमेय चौधरी, सकाळ यिन शहर समन्वयक स्नेहल खानोलकर आदी उपस्थित होते. 

वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण

पिंपरी – वाहतूक पोलिसाने एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर “व्हायरल’ झाला आहे. वाकड येथील भूमकर चौकात शनिवार (दि. 3) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला होता. एका पादचाऱ्याने ही मारहाण मोबाईल कॅमेरात कैद केली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

महापालिकेकडून महिलांना कुंगफूचे धडे

पिंपरी – महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न सर्वत्र ऐरणीवर आला आहे. शाळा, कॉलेज आणि घराबाहेर पडल्यानंतर अनेकदा महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महिला, मुलींना घराबाहेर पडल्यानंतर स्वतःची सुरक्षा करता यावी, त्या आत्मनिर्भर, सक्षम आणि स्वावलंबी व्हाव्यात, याकरिता महापालिका हद्दीतील महिला, मुलींना पुणे जिल्हा स्पोटर्स कराटे असोसिएशनच्या सहकार्याने कराटेचे प्रशिक्षण देण्यास महिला व बालकल्याण समितीने मान्यता दिली.

विद्यार्थ्यांनी साकारले भविष्यातील हॉटेल्स विश्‍व

– हॉटेल मॅनेजमेंटचं आगळं वेगळं प्रदर्शन : एनआयबीआरतर्फे आयोजन
निगडी – येथील नोव्हेल संस्थेच्या एनआयबीआर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आगळं वेगळं प्रदर्शन भरले आहे. विविध नाविन्यपूर्ण युक्तींचा वापर करुन विद्यार्थ्यांनी भविष्यात हॉटेल विश्‍व कसे असेल याचे उत्तमरित्या सादरीकरण केले आहे.