Sunday, 31 December 2017

Industries told to chime in on smart city plan

Pimpri Chinchwad: The civic body has asked corporate offices and industries to give their presentations on various facilities to be incorporated in the smart city project.
They have been asked to give inputs on kiosks, surveillance, smart water and sewerage management, Wi-Fi access, parking, lighting and environment, transport bus information system, command and control centre, smart city cellphone app, and optical cabling (city network backbone).

Pune: BJP witnessed historic victory; Metro, PMRDA gained steam

IT WAS a historic year for the BJP in Pune and Pimpri-Chinchwad, where the party came to power in both civic bodies after defeating the NCP.

PCMC panel takes aim at illegal hoardings

Pimpri Chinchwad: The civic standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation has reiterated the need for a policy dealing with illegal hoardings and encroachments on footpaths and cycle tracks in the twin township.
Corporators have repeatedly asked the civic administration to remove illegal hoardings and also impose fines on officials who fail to take action in this regard.

PMPML to act against private vehicles using BRTS lanes

PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) chief Tukaram Mundhe has warned of action against private vehicles entering dedicated lanes for buses.
Mundhe said on Saturday private vehicles entering Bus Rapid Transit System (BRTS) lanes would face stringent action, including confiscation. The seized vehicles would be auctioned as per the provisions in the motor vehicle rules.

Maha-Metro starts transplantation of trees in Pimpri area

With the Pune Metro Rail project progressing at a fast pace, the Maha Metro Rail Corporation Limited has undertaken transplantation of trees affected by the project in Primpri-Chinchwad area.

A tree that was uprooted from Kasarwadi area was transplanted in Vallabhnagar on Thursday.

नागरी सुविधा केंद्रात “असुविधां’चा सामना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोईसाठी जागोजागी नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरु करण्यात आले आहे. मात्र, शहरातील सर्वच महा ई सेवा केंद्रातील आधार मशीन बंद असल्याने नागरीकांचा लोंढा महापालिकेतील नागरी सुविधा केंद्राकडे येत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीक आधारच्या कामकाजासाठी रांगा लावून सुविधा केंद्राच्या बाहेर बसत आहेत. मात्र येथील असुविधांमुळे नागरिकांच्या मनस्तापात भर पडत आहे.

भाजी विक्रेत्यांकडून फुटपाथ, रस्ता हायजॅक!

वाकड – काळेवाडी फाटा ते पिंपरी रस्त्यावर रहाटणी चौकात अनधिकृत फळ भाजी विक्रेते, हाथगाडी, किरकोळ विक्रेत्यांकडून फुटपाथ आणि रस्ते अक्षरश: हायजॅक होत असल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे वाहतूक कोंडीमुळे अतोनात हाल होत असून नागरिकांना येथून चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील भाजी मंडईचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आयुक्‍तांचे डॉक्‍टरांना “इंजेक्‍शन’!

पिंपरी – महापालिका रुग्णालयातील अंतर्गत वादाचा परिणाम रुग्ण सेवेवर होवून पालिकेची बदनामी होवू लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिक्षक आणि प्रस्तावित महाविद्यालयाचे कामकाज पाहणाऱ्या डॉक्‍टरांना एकत्रित बोलावून दोघांना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी खडेबोल सुनावले आहेत. तसेच यापुढे वाद केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

कल्याणकारी योजनांसाठी 24 हजार अर्ज

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी 1 एप्रिल ते 28 डिसेंबर 2017 पर्यंत पालिकेकडे 23 हजार 931 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

RERA brings promises of reforms and transparency, but sales continue to stutter

प्राधिकरणातील समस्यांसाठी नागरिक व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र

निगडी प्राधिकरण भागात होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी आयुक्तांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण भागात अवजड वाहनांची वाहतूक वाढत आहे. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी निगडी प्राधिकरण भागातील नागरिकांनी सोशल मीडियाचा उत्तम वापर करत एनपीआरएफ (निगडी प्राधिकरण रहिवासी फोरम) नावाचा व्हाट्स अप ग्रुप बनविला आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर प्राधिकरण परिसरातील समस्या मांडल्या.

Pimpri : प्राधिकरणातील समस्यांसाठी नागरिक व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र

[Video] किवळे रोडवर महापालिकेच्या नवीन पाईप कापून चोरी


पिंपरी चिंचवड महापालिकेने पवना प्रकल्पातील पाणी उचलण्यासाठी नवीन पाईप आणून किवळे रोडवर महापालिकेने ठेवले आहेत परंतु त्याच नवीन पाईप कापून चोरी करत असल्याचे समोर आले आहे

दुर्मिळ पक्ष्यांसाठी अधिवास विकसित करा

पिंपरी – पवना, मुळा नद्यांच्या सुंदर नैसर्गिक मध्यावर वसलेल्या आणि पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनी सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवास विकसित करण्यात यावा, अशी मागणी शिवशक्ती व्यायाम मंडळाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

ग्रंथालयांना अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांना पुस्तक रुपाने मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रंथालयांनी अर्ज करावेत, असे आवाहन सावरकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.

विलीन झालेल्या बॅंकांचे चेकबुक होणार बाद

नव्या आयएफएससी कोडसह मिळणार नवे चेकबुक
नवी दिल्ली – स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन झालेल्या सहयोगी बॅंकांचे चेकबुक 31 डिसेंबर 2017 पर्यंत बदलणार आहेत. जुने चेकबुक 31 डिसेंबरनंतर चालणार नाहीत. विलीनीकरणानंतर या बॅंकांचा आयएफएससी कोड बदलला आहे. त्यामुळे नव्या आयएफसी कोडसह नवीन चेकबुक घेणे ग्राहकांना बंधनकारक आहे.

कोट्यावधींचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप शहराध्यक्षांचा कांगावा – संजोग वाघेरे

महिला सक्षमीकरणाच्या व्यासपीठाला खोडा घालण्याचा डाव
 चौफेर न्यूज –  एकीकडे कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करायचा आणि दुसरीकडे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेत 35-40 लाख बचत करण्याचा आव आणायचा प्रकार भाजप शहराध्यक्षांनी केला आहे.पुर्वी पवनाथडी जत्रा स्वतःच्या कार्यक्षेत्रात घेण्यासाठी आटापिटा करीत होते.मात्र आता भाजप मध्ये गेल्यानंतर महिला सक्षमीकरणात येणाऱ्या खर्चात बचत होत असल्याचा साक्षात्कार झाला आहे, असा आरोप पिंपरी- चिंचवडचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. याबाबत वाघेरे यांनी निवेदन जाहीर केले आहे.

ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक – रमेश सरदेसाई

चौफेर न्यूज – प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. भोसरी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान देताना ते बोलत होते. 

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरिता तळीरामांवर कारवाईकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापासूनच “ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’ ची मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी घेतले कमांडो प्रशिक्षण

पिंपरी – इनर व्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईड व कमांड स्पेशल फोर्स औंध यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कमांडो प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात झाला. शिबिरात एकूण 180 विद्यार्थी सहभागी झाले, त्यामध्ये 120 मुलींचा सहभाग होता.

महापालिकेच्या स्वच्छतागृहात मद्यपींचा अड्डा

पिंपरी – कासारवाडी नदीपात्रालगतच स्मशानभूमीला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छतागृहात गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पडीक पडलेल्या स्वच्छतागृहात मद्यपींचा अड्डा भरत आहे. परिसरातही हॉटेल, गॅरेज तसेच दुकाने असल्याने या परिसरात सायंकाळच्यावेळी फिरणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.