पिंपरी – एकेकाळी अशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका असा नावलौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्याअंतर्गत शहरात मेट्रोचे काम सुरु असून, यामुळे बीआरटी कॉरिडॉरमधील मेट्रोची घुसखोरी महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा खेळखंडोबा झाला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 14 May 2018
रस्ते खोदाईचे गौडबंगाल
पिंपरी-चिंचवड वर्तमान – सूरज व्यास
शहरातील प्रत्येक काना-कोपऱ्यात सध्या रस्ते खोदाई सुरु आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने शहराच्या प्रत्येक रस्ता खोदण्यात आला आहे. रस्ते खोदाईसाठी दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षात करण्यात आलेले खोदकाम यात बरीच तफावत आढळते. हीच तफावत भ्रष्टाचाराला पोसत असते. याबाबत दैनिक”प्रभात’ने विस्तृत वृत्त प्रकाशित केल्यानंतर यावर चर्चा सुरु झाली आणि सत्ताधाऱ्यांना स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले. परंतु जोपर्यंत या प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव असेल तोपर्यंत भ्रष्टाचाराला वाव हा राहणारच.
पिंपरी महापालिकेचा स्वीडनसोबत करार
पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिकेने ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेतला असून याकामी स्वीडन शहरासमवेत सामंजस्य करार केला आहे. या करारावर उभय पक्षांत स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या अंतर्गत “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त ऊर्जेचा वापर “कुलिंग’साठी केला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणारा हा देशातील पहिलाच अभिनव प्रकल्प आहे.
आयुक्तांचा “जोर का झटका’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 223 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय विभागप्रमुखपदी असलेले आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याजागी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच झटका बसला आहे. याशिवाय वैद्यकीय विभागप्रमुख पदाची धुरा बदलून त्यांनी “जोर का झटका’ दिला आहे.
वाहतूक समस्येने आयटी कंपन्यांचा तोटा वाढणार
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांची पावसाळ्यात दाणादाण उडते. यंदादेखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक समस्येमुळे आयटी कंपन्यांना सहन कराव्या लागणाऱ्या तोट्यात २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
गरज पुणे-नाशिक लोहमार्गाची
पुणे-नाशिक हा लोहमार्ग झाला, तर शेतमाल, उद्योग, कंपन्यांतील माल व इतर माल, प्रवासी, कामगार, नागरिक, पर्यटक यांना लाभदायक ठरणार आहे. म्हणून लोहमार्गासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विमानतळ, एसईझेड गेले. म्हणून उत्तर पुणे जिल्ह्याला खरी गरज आहे ती पुणे-नाशिक लोहमार्गाची.
सोमवारी एम्पायर इस्टेट पुलाचे पालकमंत्री गिरीष बापटांच्या हस्ते लोकार्पण
महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाचे काम पुर्ण झाले असून उद्या (सोमवारी दि.14) सायंकाळी 5.30 वाजता काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस रस्त्यावरील पवना नदी, पूणे – मुंबई लोहमार्ग व महामार्ग यांना आेलांडून आॅटोक्लस्टर येथे उतणारा समांतर 1600 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण व उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
Personnel struggle for basic facilities at ‘isolated’ Bhosari police station
The police station does not have a proper facility for its 122 staff to have lunch or dinner. A small canteen has come up outside the premises of the police station. “It’s so hot in the tin-shed canteen that you cannot even sit for two minutes,” said a police officer.
पिंपरी चिंचवड शहरातील जलनिःस्सारणाची 82 टक्के कामे पूर्ण
पिंपरी चिंचवड शहरातील जलनिःस्सारणाची 82 टक्के कामे पुर्ण झाली असून उर्वरीत कामे सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
पर्यावरण संतुलनाकडे सोसायट्यांची पाठ
पिंपरी - शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांसाठी आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना जाहीर केली. त्यास मोजक्या सोसायट्यांकडून प्रतिसाद मिळत असून बहुतांश सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे.
पिंपरी शहरात निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा
उन्हाळ्यामुळे शिबिरांचे प्रमाण घटले, पॉझिटिव्ह रक्तघटकांसाठीही धावाधाव
पिंपरी - शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय पॉझिटिव्ह रक्तगटात ए, बी, ओ आणि एबी यांचे रक्तघटक मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. तसेच दात्यांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येणे अपेक्षित आहे.
पिंपरी - शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय पॉझिटिव्ह रक्तगटात ए, बी, ओ आणि एबी यांचे रक्तघटक मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. तसेच दात्यांनी रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येणे अपेक्षित आहे.
निगडीतील आयटीआयचा कायापालट
पिंपरी - चाकण येथील फोक्सवॅगन कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून निगडी-दुर्गानगर येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआयचे) कायापालट करण्यात येत आहे. दोन कोटींचा निधी कंपनीने त्यासाठी दिला आहे.
काळेवाडी पोलिस चौकी अडकली समस्येच्या गर्तेत
पिंपरी (पुणे) : काळेवाडी पोलिस चौकीत मुबलक जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टेलिफोन, स्वच्छतागृहसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चौकी समस्येच्या गर्तेत आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत.
दिव्यांगांसाठी आता पाच टक्के तरतूद
पिंपरी – महापालिका आणि नगरपालिकांच्या अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी आता पाच टक्के तरतूद केली जाणार आहे. यापूर्वी ही तरतूद तीन टक्के एवढी होती. ही रक्कम संबंधित वर्षातच खर्च करण्याची अट राज्य सरकारने घातली आहे. तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
सशुल्क पार्किंग धोरणाला स्थायीचा “हिरवा कंदील’
पिंपरी – पुणे महापालिकेपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील सशुल्क पार्किंग धोरण ठरविले आहे. वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या सशुल्क पार्किंग (पे ऍण्ड पार्क) धोरणास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आता हे धोरण महासभेच्या मान्यतेकरिता सादर केलेल जाणार आहे.
डिझेल घोटाळ्यातील कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या डिझेल घोटाळ्यात दोषी ठरलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पुन्हा महापालिका सेवेत घेण्यात आले आहे. अपहार केलेल्या रक्कमेपैकी 15 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले असून आणखी 41 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत.
पिंपरी पालिकेचा कचरा वाहतूक विभागच बेवारस
पिंपरी – नेहरूनगर येथील आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणारा कचरा वाहतूक विभागात सोई सुविधांचा अभाव आहे. याठिकाणी घंटागाड्या तसेच महापालिकेचे कोट्यावधींचे आरोग्य विभागाचे साहित्य पडून असताना येथील सुरक्षा व्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. तीन प्रभागांचा कचरा उचलण्याचे नियोजन येथून होत असताना येथे प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.
शहरातील कामगारांचे प्रश्न तडजोडीने सोडवू - गिरीश बापट
पिंपरी (पुणे) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामगार प्रलंबित प्रश्नाबाबत न्यायालयात गेले आहेत. मात्र, त्यासंदर्भात पुढील महिन्यात बैठक घेऊन तडजोडीने कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी थेरगाव येथे दिले.
[Video] शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी आला सव्वाकोटी खर्च !
पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट फिरणारी कुत्रे पकडण्यासाठी आला सव्वाकोटी खर्च आला असून कुत्रा पकडणे व त्याचे लशीकरण करणे या कामाचा त्यामध्ये समावेश असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात येते
“सांग ना गं आई”…: पिंपरी चिंचवडच्या कलाकारांची मातृदिनानिमित्त विशेष कलाकृती
जागतिक ‘मातृदिना’च्या निमीत्ताने पिंपरी-चिंचवड मधील कलाकारांनी खास आई साठी समर्पित म्हणून एक विशेष गीत केले आहे. “सांग ना गं आई” असे या गीताचे नाव असुन पिंपरी-चिंचवड मधील रेझोनन्स स्टुडिअो आणि आयड्रीमज फिल्मक्राफ्ट यांनी या गीताची निर्मिती केली आहे. अनावरण सोहळा चिंचवड येथे पार पडला.
Subscribe to:
Posts (Atom)