PIMPRI CHINCHWAD: The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will appoint a private agency for managing door-to-door trash segregation, encouraging decentralized processing and transportation of waste to the Moshi garbage ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 8 September 2017
चिंचवडगावातील मंगलमूर्तीवाडा परिसरात १५ ते २० वाहनांची तोडफोड
चिंचवडगावातील मंगलमूर्तीवाडा परिसरात १५ ते २० वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना आज रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. प्राथमिक अंदाजावरून दोन टोळक्यातील भांडणातुन ही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. या मध्ये शांत आणि भक्तिमय परिसरातील असलेल्या ठिकाणी हि घटना घडली. या घटनेमध्ये कार, टेम्पो, रिक्षा, अशा वाहनांची लाकडी दांडके, दगड याच्या साहाय्याने तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
खासदार बारणेंकडून लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्याची रेल्वेमंत्र्याकडे मागणी
पुणे-मुंबई लोहमार्गावर हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली. हा अपघाताचा धोका पाहता लोणावळा व खंडाळा भागातील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करावेत. तेसच, आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
हिंजवडीसाठी जानेवारीत पर्यायी रस्ता?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) म्हाळुंगे येथील प्रस्तावित नगररचना योजनेसाठी (टीपी स्कीम) जमीन मोजणी सुरू झाली असून, पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत हिंजवडीला जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. म्हाळुंगेतील ९५ टक्के जमीन मालकांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली असून, उर्वरित ग्रामस्थांच्या शंका लवकरच दूर करण्यात येतील, असे पीएमआरडीएने स्पष्ट केले.
७०० ठिकाणी कचऱ्याचे ढीग
पिंपरी-चिंचवड शहरात राडारोडा आणि कचरा साचतो, अशी जवळपास ७०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी पालिकेच्या तीन विभागांच्या वतीने संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. याचे श्रेय घेत सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटण्यास ...
कचरा टाकणा-याला पालिकेने ठोठवला दहा हजारांचा दंड
पिंपरी-चिंचवड महापालिकेने राडारोडा मोकळ्या जागेत टाकणा-या एकाला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तळवडे येथील रस्त्याच्या बाजुला कचरा फेकत असताना ही कारवाई पालिका पथकाने केली.
स्वच्छ भारत अंतर्गंत शहरात स्वच्छता राखण्याबाबत महापालिकेच्या फरारी पथकांमार्फत कारवाई करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पिंपरी महापालिकेने उघड्यावर शौचास जाणा-यांवर गुड मॉर्निंग पथकामार्फत कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर मोकळ्या भागात भंगार, राडारोडा टाकणा-या नागरिकांवरही कारवाई सुरू झाली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मूदतवाढ
महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी येत्या २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
निमंत्रण द्या ‘डिजिटल’द्वारे
युवा उद्योजक चिन्मय कवी यांचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी तब्बल १७ लाख ३५ हजार रुपये खर्च करते. एकीकडे नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला जातो. तर त्यांची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिका अद्याप जुन्याच निमंत्रण पत्रिका छपाईची पद्धत वापरते. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ई-व्हॉट्सअप आणि मोबाइलच्या माध्यमातून आमंत्रण देण्याची प्रथा सुरू करून केंद्राचे डिजिटलचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करण्याचा प्रस्ताव युवा उद्योजक चिन्मय कवी याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.
अमर साबळे यांच्याविषयी संताप
आंबेडकरवादी संघटनांकडून आंदोलनाद्वारे निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी - राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आंबेडकरवादी संघटनांबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, एमआयएम व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने साबळे यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली.
भाजप नेत्याची कर्जमाफीसाठी ‘फिल्डिंग’
पिंपरी-चिंचवडमधील प्रकार; राजकीय दबावामुळे बँकही हतबल
पिंपरी - राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमाफीची योजना जाहीर केली. गरीब पीडित लोकांना कर्जमाफी देण्यात काही वावगे असायचे कारण नाही, पण एखाद्या श्रीमंत व्यक्तीने चैनीसाठी अधाशासारखे कर्ज घ्यायचे आणि ते फेडायचे सोडून कर्जमाफीसाठी दबाव आणायचा, याला तुम्ही काय म्हणाल? राग आला ना, होय हे संतापजनकच आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधारला मिळणार का गती?
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नितीन गडकरी यांना नदी सुधार आणि गंगा नदीसुधार हेही खात्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या जवळच्या पवना, मुळा आणि इंद्रायणीनदीस गती मिळेल, अशी आशा महापालिकेतील ...
आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी 25 ऐवजी 50 रुपये; दुरुस्ती नव्हे दुकानदारी
नवीन आधार कार्ड काढण्यासाठी व दुरुस्तीसाठी ७ ते १० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. मात्र महापलिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांकडून आधारकार्डच्या दुरुस्तीसाठी 25 ऐवजी 50 रुपये घेतले जातात. त्यामुळे या अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. नागरिकांकडून जास्त पैसे आकारुन दुकांनदारिच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.
“रिंग रोड’प्रश्नी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना!
पिंपरी – महापालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावित “रिंग रोड’ प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणार होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अद्याप वेळ दिला नाही, त्यांनी वेळ दिल्यावर “रिंग रोड’प्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेवून जावू, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विकास कामांसाठी 48 लाखांच्या खर्चाला मंजुरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 48 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Subscribe to:
Posts (Atom)