Wednesday, 16 August 2017

भोसरीचे वैभव वाढविणारे सहल केंद्र

भोसरी व इंद्रायणीनगर परिसरात असलेली पंधरा छोटी-मोठी उद्याने भोसरीचे सौंदर्य वाढवत आहेत. आळंदी रस्त्यावर सखूबाई गवळी उद्यान, दिघी रस्त्यावर गंगोत्री पार्क, इंद्रायणीनगरातील नाना-नानी पार्क, मिनी मार्केटजवळील उद्यान, संत तुकारामनगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, नेहरूनगरातील गुलाबपुष्प उद्यान आदी उद्यानांबरोबरच इतरही उद्याने भोसरीचे वैभव वाढवत आहेत. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी सर्व्हे क्रमांक एकमधील आरक्षण क्रमांक ४३३ वर महापालिकेने सुमारे सव्वीस एकर जागेत भव्य उद्यान आहे. हे उद्यान भोसरीतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. उद्यानाशेजारीच जलतरण तलावही आहे. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

दीड लाखाचे अवैध विदेशी मद्य जप्त

पुणे - महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरावर मद्यविक्री करण्यास बंदी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून काळेवाडी हद्दीत सुमारे दीड लाख रुपयाचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

पिंपरीत आरटीईचे प्रवेश वाढताहेत

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी पालकांना अनेक ‘दिव्य’ पार करावे लागत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असतानाच, आरटीईतून इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र वर्षागणिक वाढत आहे. उद्योगनगरीत गेल्या पाच वर्षात सात हजार २०५ विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा हक्क बजावल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते.

लाखोंची उधळपट्टी!

'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची परंपरा आयोजकांनी याही वर्षी कायम ठेवली आहे. उंचच्या उंच हंडी, स्पीकरच्या भिंती, लाखोंची बक्षिसे, सिनेतारकांची हजेरी आणि ...

ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशन व ऍड. मुकुंद आनंदा ओव्हाळ यांच्या सहकार्याने मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्‌घाटन पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मे. धुमकेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Hinjewadi crematorium set to cost gram panchayat Rs 28 lakh

A month after Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) demarcated a plot of 6,000 square feet for a new crematorium for village Gawarewadi in phase-3 of the Rajiv Gandhi Infotech Park at Hinjewadi, the village Gram Panchayat has also ...

PCMC mayor's OBC certificate deemed valid

Pimpri Chinchwad: The Pune district caste scrutiny committee has found the other backward class (OBC) caste certificate of Pimpri Chinchwad mayor Nitin Kalje valid. Speaking to TOI, Kalje said, "The scrutiny committee has validated my caste certificate.

पिंपरीचे महापौर कुणबी मराठाच; पुणे जिल्हा जात समितीचा निकाल

पिंपरी : इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव जागेवर कुणबी
म्हणून निवडणूक लढवून विजयी झालेले पिंपरी- चिंचवडचे भाजपचे महापौर नितीन
काळजे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पुुणे जिल्हा जात पडताळणी समितीने
ग्राह्य धरले आहे. त्यामुळे ते डेंजर झोनमधून बाहेर पडले आहेत.कुणबी
मराठा म्हणून ओबीसी जागेवरून निवडून आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील
इतर 16 नगरसेवकांना अगोदरच "क्‍लीन चीट' मिळाली असल्याने शहरातील सर्वच
नगरसेवकांवरील कुणबी दाखल्याची टांगती तलवार आता दूर झाली आहे.