Monday, 21 May 2018

After Varanasi flyover collapse: PMC, PCMC says Flyovers, overbridges safe, nothing to worry about

AFTER 15 people died when a flyover collapsed in Varanasi on Tuesday, local residents and activists in Pune have expressed concerns about how safe and sturdy the many flyovers and road overbridges in Pune and Pimpri-Chinchwad are. Officials of the Pune Municipal Corporation (PMC) and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), however, said there was nothing to worry about, as they were keeping an eye on the maintenance of these structures.

क्रीडांगणावरुन वाहतेय सांडपाणी

पिंपरी – चिखली, कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल समस्यांनी ग्रासले आहे. मैदानावर शेजारील रहिवासी वस्तीमधील गटारीचे पाणी येत असून मैदानावर दलदल निर्माण झाली आहे. मागील एक महिन्यांपासून खेळाडूंना चिखलातच सराव करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करुनही महापालिकेने अद्याप उपाययोजना केलेली नसल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

गतिरोधकांवर पट्ट्यांची मागणी

पिंपरी – आकुर्डी-चिंचवड मार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आले आहेत. मात्र प्रशासनाला या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यासाठी वेळ नसल्याने हे गतिरोधक अपघाताला आमंत्रण देत आहेत.

स्वयंसेवी संस्थेकडून पाहिजे तेथे ‘ई-टॉयलेट’

शहरात सर्वत्र शौचालय नसल्याने नागरिकांची विशेषता महिलांची कुंचबणा होते. ही अडचण दूर करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मदतीस आली आहे. पालिका जेथे जेथे जागा उपलब्ध करून देईल, त्या-त्या ठिकाणी संस्था मोफत ‘ई-टॉयलेट’ बांधून देणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे. 

पवना नदीपात्रात भराव

पिंपरी - पिंपळे गुरव येथील जवळकरनगरसह कासारवाडी परिसरात पवना नदीपात्रात सर्रास भराव टाकण्याचे आणि राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत पुढे आले.

पिंपरीत ई-वेस्ट संकलन

शहरातील वाढत्या ई-कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा उपक्रम

पिंपरी-चिंचवडमधील ई-कचऱ्याचे वाढते प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी ई-वेस्ट संकलन करण्यात येत आहे.

शहरात होतेय ज्ञानेश्‍वरी पारायण अन्‌ कुरआन पठण

पिंपरी - हिंदूंचा अधिकमास आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण आणि मशिदींमध्ये कुरआन पठण होत आहे. 

अबोल भिंती झाल्या बोलक्‍या

नवी सांगवी - रंग उडलेल्या, खराब झालेल्या भिंती, आपल्याला सामाजिक संदेश देऊ लागल्या तर? नव्हे, तर पिंपळे सौदागर येथील जिंजर सोसायटीतील अनघा पाटील या बावीस वर्षीय तरुणीने ‘स्मार्ट सोसायटी’ या उपक्रमातून ‘बोलक्‍या भिंती’ ही संकल्पना राबविली आहे. त्यातून सोसायटीच्या सौंदर्यात भर पडतानाच निरामय आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचे संदेश दिले जात आहेत. 

आयटीआयच्या विद्यार्थ्यांची भरारी

पिंपरी - आयआयटी, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची संधी हमखास मिळते. मात्र, आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) व्यावसायिक प्रशिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनाही नोकरीसाठी परदेशगमनाची संधी मिळू लागली आहे. गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमधील आयटीआयमध्ये शिकलेल्या ४१ विद्यार्थ्यांनी नोकरीनिमित्त परदेशात भरारी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, तसेच आखाती देशांत चांगल्या वेतनाच्या नोकऱ्या ते करत आहेत.

सांगवी परिसर खड्डेमय

पिंपरी – वेगवेगळ्या कारणास्तव सांगवी व पिंपळे-गुरव परिसरात ठिकठिकाणी खोदकामामुळे संपूर्ण परिसर खड्डेमय झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने खड्ड्यात पाणी झाले. खोदकामामुळे संपूर्ण परिसर धुळीने माखून निघत आहे.

Maharashtra: 3139 MHADA flats up for grabs in Pune, Pimpri-Chinchwad

Mumbai: People falling under the category of Economically Weaker Sections (EWS) will now get Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) houses for as less as Rs 9.5 lakh. At least 3139 flats along with 29 land parcels will be up for grabs in Pune and Pimpri/Chinchwad.

maharashtra, MHADA, EWS, Pune, Pimpri-Chinchwad, Economically Weaker Sections

‘एम्पायर इस्टेट’ पुलाकडे नागरिकांची पाठ

महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे काम आठ वर्षांनी  मार्गी लागले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, पुलाचे उद्घाटन होऊन आठवडा लोटला तरी पुलावरून वाहनांची वर्दळ दिसत नाही. रॅम्प न झाल्याने नागरिकांना मोठा वळसा घेऊन पुणे-मुंबईच्या दिशेने जावे लागत असल्याने पुलाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. 

बोपखेलकरांसाठी तो दिवस ठरला काळा

बोपखेलकरांसाठी तीन वर्षांपूर्वी आलेली सकाळ आजही डोळ्यांसमोरून जात नाही. कारणही तसेच आहे. बोपखेलकरांचा हक्काचा रस्ता बंद केल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांचे होत असलेले हाल पाहून रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी नागरिक जनता दरबारात सहभागी झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तीन वर्षांपूर्वीचा गुरुवार 21 मे 2015 हा दिवस बोपखेलकरांसाठी काळा दिवस ठरला. त्या हिसंक घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली.  मात्र, ना जिल्हा प्रशासन हलले, ना महापालिका प्रशासन हलले. त्यामुळे आजही बोपखेलकरांना रस्त्यासाठी 18 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो.

Digital payments take a hit each time customers shop

PUNE: Data collated by the Reserve Bank of India (RBI) shows that usage of cards on point of sale terminals, better known as swipe machines, has reduced progressively since March 2017.

Soon eateries to display calorie count of food

Aiming to combat rising obesity and disease, state FDA is set to make it mandatory for restaurants to print this information

वृक्षतोड प्रकरणी ‘मे ब्लू स्काय मीडिया’ आणि ‘धिरेंद्र ग्रुप’वर कारवाईची मागणी; ब्लू स्काय मीडीयाने आरोप फेटाळले

पिंपरी (Pclive7.com):- ‘मे ब्लू स्काय मीडिया’ आणि ‘धिरेंद्र ग्रुप’ या जाहिरात कंपनीने शहरातील अनेक ठिकाणी जाहिरातीचे फलक लावले आहेत. तसेच फलक उभे करताना झाडांचा अडथळा येत असल्याने मे ब्लु मीडिया या कंपनीने भक्ती -शक्ती येथील ३ वृक्षांची तोड केली आहे. तसेच पिंपरीतील मोरवाडी चौकातील आहिल्यादेवी पुतळ्याच्या पाठीमागे धिरेंद्र ग्रुप या कंपनीने जाहिरात फलक लावण्यासाठी ४ मोठ्या वृक्षांची तोड केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन वरील दोन्ही कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे सतीश कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

विधानसभा मतदार यादी अद्ययावतीकरण सुरु

पिंपरी – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 205-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या एक सप्टेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

“त्यांच्या’ उपसूचना स्विकारल्याच असत्या!

पिंपरी – विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या दत्ता साने यांनी पहिल्याच दिवशी भाजपवर कचऱ्याच्या प्रश्‍नावरुन हल्लाबोल केला. तसेच वर्षभरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. यावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेवक या नात्याने साने यांनी सभागृहात नागरिकांच्या हिताच्या सुचना केल्या असत्या, तरी त्या स्विकारल्या असत्या, असे प्रत्युत्तर दिले.