Wednesday, 5 September 2018

Pune: Traffic woes continue as private vehicles take over BRTS lane

On the twelfth consecutive day of its launch, the dedicated lane of Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS), the dedicated lanes were again virtually taken over by private vehicles. Traffic wardens from Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) allege that the traffic police department wasn’t providing enough help for the smooth functioning of the BRTS system.

सार्वजनिक वाहतुकीसाठी एक देश, एक कार्ड

नोटाबंदी, जीएसटी असे मोठे निर्णय घेण्याचा धडाका सरकारकडून सुरू असून आता सार्वजनिक वाहतूकीसाठी एक देश एक कर या जीएसटीच्या एक देश, एक कर या तत्त्वाप्रमाणे आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी देशात एक देश-एक कार्ड ही नवी संकल्पना लवकरच राबविली जाणार आहे, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली आहे. ते फ्युचर मोबिलिटी समीट -२०१८ या कार्यक्रमात बोलते होते.

[Video] पिंपरी पालिकेतील दहशत पसरविणारा अधिकारी कोण?

पिंपरी पालिकेतील दहशत पसरविणारा अधिकारी कोण? एका इंजिनिअरला ठेवले दोन वर्षे नजरकैदेत! 

रावेतला ‘बीआरटी’मध्ये अपघात, एक जागीच ठार

भरधाव वेगात बीआरटी मार्गातून आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

पीएमपीची सेवा ब्रेकडाऊन

कंत्राटी चालक-वाहकांवर आगारातील अधिकाऱ्यांचा दबाव
पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी पीएमपीएमएल सध्या ब्रेकडाऊनच्या गंभीर समस्येने ग्रासली आहे. शनिवारी (दि. 1) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील नेहरूनगर रस्त्यावर एकामागे एक दोन बस बेकडाऊन झाल्या. तर गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरच बीआरटीच्या मार्गात बस ब्रेकडाऊन झाल्याने एकामागे एक अशा सहा बस थांबल्याने पीएमपीचा कारभार सर्व शहरवासियांनी बघितला. सततच्या ब्रेकडाऊनच्या समस्येकडे पीएमपी प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे पीएमपी बसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.

विकासाचा वाढता वेग, मात्र उद्योगांना घरघर

आयुक्त हर्डीकर म्हणाले, कष्टकरी कामगारांच्या मेहनतीतून हे शहर उभे राहिले आहे.

शहरबात : महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवेची ‘ऐशीतैशी’

पिंपरी महापालिकेची विविध रुग्णालये तसेच दवाखान्यांमध्ये अपेक्षित आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, ही जुनी तक्रार आहे.

नाशिक फाट्याजवळील २४ वृक्षांचे पुनर्रोपण

पुणे - नाशिक फाट्याजवळ मेट्रो मार्गात येणाऱ्या २४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात महामेट्रोला नुकतेच यश आले आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून महामेट्रोने आतापर्यंत ४३० वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे. 

निगडीतील भेळ चौक, मोशीतील स्पाइन रस्ता येथे गोविंदांचा थरथराट

गोविंदा आला रे आला’ची ललकारी…डीजेचा धतडततड धतडततड दणदणाट…ढोल ताशांचा गजर आणि एकावर एक उंच मानवी मनोरे रचण्याची सुरू असलेली स्पर्धा…अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जिजाई महिला प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडीतील भेळ चौकात तसेच भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांच्या वतीने मोशी, स्पाईन रोड येथे आयोजित दहीहंडी महोत्सव सोमवारी (दि. ३) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

हिंजवडीत चक्राकार वाहतुकीला संमिश्र प्रतिसाद

सकाळी बंद पडलेल्या जड वाहनांमुळे कोंडी; सायंकाळी वाहतूक सुरळीत

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हिंजवडीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या चक्राकार वाहतुकीला मंगळवारी (४ सप्टेंबर) संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सायंकाळी हा बदल करण्यात आला होता. मंगळवारी सकाळी या मार्गावर एक बस आणि सिमेंट घेऊन जाणारा ट्रक बंद पडल्याने काहीकाळ कोंडी झाली. तसेच, वाहतूक बदलाची कल्पना नसल्याने वाहनचालकांचा काहीकाळ गोंधळ उडाला; मात्र सायंकाळी कोणतीही अडचणर न येता हिंजवडीमधून वाहने मुख्य रस्त्यावर आली.

स्वाईन फ्ल्यूवरील मोफत लस घेण्याचे आवाहन

पिंपरी – शहरातील स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात ही लस उपलब्ध असून रुग्णांना त्वरीत घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

“आयटीयन्स’ची वाहतूक कोंडी सुटणार का?

पिंपरी पोलीस आयुक्‍त उतरले रस्त्यावर : पुणे ते हिंजवडी आयटी पार्क मार्ग “वन वे’
पिंपरी – हिंजवडी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात घेता स्वतः पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडीच्या रस्त्यावर उतरुन त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. हिंजवडी वाहतूक पोलिसांनी सोमवारपासून (दि. 3) प्रायोगिक तत्त्वावर पुणे ते हिंजवडी आयटी पार्क हा मार्ग “वन वे’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा “श्रीगणेशा’ देखील यावेळी करण्यात आला. त्याला “आयटीयन्स’नी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंतचा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करा

हिंजवडीत होणारी दररोजची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंत फ्री वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वाकड  उड्डाणपुलाच्या  हद्दीपासून हिंजवडी ‘फेज थ्री’पर्यंतचा 5 कि.मी. अंतराचा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पालिकेकडे हस्तांतरित करावा,  तसेच, नियोजित उड्डाणपुलासाठी राज्य शासनाने अर्थसहाय करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. 

सक्षमपणे पाठपुरावा नसल्याने पवना बंद जलवाहिनी योजना प्रलंबित

पवना धरणातून थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत बंद जलवाहिनी योजना कार्यान्वित करण्यासाठी पालिका प्रशासन सक्षमपणे पाठपुरावा करीत नाही. या अंतर्गत शिवणे व गहुंजे येथे बंधारा बांधण्याचे कामही प्रलंबित आहे, असा आरोप पाटबंधारे विभागाने केला आहे. 

बाहेरचा कचरा टाकला जातोय महापालिका हद्दीत

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हिंजवडी व परिसरातील कचरा महापालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टाकताना भाजपाचे नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे यांनी रविवारी (दि.2) रंगेहाथ पकडल्याने खळबळ माजली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसरातील कचरा कुंड्या रात्रीच्या वेळी कचर्‍याने पूर्ण भरल्याचे लक्षात आल्यानंतर हा कचरा कोण टाकत आहे याबाबत शिंदे यांनी गस्त सुरू केली होती. त्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहेे.

बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील खड्ड्यांचा दिवसा पाहणी दौरा करावा – नाना काटे

पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-बेंगलोर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोल्हापूर वरून मुंबईला जाताना राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवसा प्रवास करुन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी महामार्गावरील असे अनेक खड्डे पहावेत असे वक्तव्य पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.

शिक्षक दिनाचा सत्ताधारी भाजपला पडला विसर – विरोधी पक्षनेते दत्ता साने

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिक्षण विभागातील अधिका-यांना सलग दुस-यावर्षी शिक्षक दिनाचा विसर पडला आहे. उद्या शिक्षक दिन असून पालिकेने कोणतेही नियोजन केले नाही. शाळांना शिक्षकदिन साजरा करण्याबाबत कोणत्याही सूचना केल्या नाहीत. उद्या ५ सप्टेंबर शिक्षक दिन असल्याबाबत शिक्षणाधिकारी अनभिज्ञ आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला असल्याचा, आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.

#शिक्षकदिन : आदर्श पुरस्कार मिळणार कधी?

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शिक्षक विभागाने अद्याप आदर्श शिक्षक व आदर्श शाळांची यादी जाहीर केली नाही. सलग दोन वर्षांपासून प्रशासनाच्या अनियोजनबद्ध कारभारामुळे शिक्षकदिनी पुरस्कार मिळत नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. 

#शिक्षकदिन : पवित्र प्रणालीतून १९३ शिक्षक

पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये अडीचशे शिक्षकांची कमतरता असून, त्यापैकी १९३ शिक्षक सेवक राज्य सरकारच्या पवित्र प्रणालीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे वीस टक्के शिक्षक कमी असल्याने शिक्षणावर परिणाम होत असून उर्दू, हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मान्यतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. 

कॉलेजात मिळणार शिकाऊ वाहन चालक परवाना

महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबरोबरच गाडी घेण्याचा विद्यार्थ्यांचा हट्ट असतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच शिकाऊ चालक परवाना (लर्निंग लायसन्स) मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करण्यासाठी समुपदेशन व शिकाऊ चालक परवाने देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी, असे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढले आहे.

प्रत्येक फ्लेक्सवर ‘पिंपरी विधानसभेत परिवर्तन नक्की बरं का

पिंपरी: नगरसेवक शैलेश मोरे यांनी 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून लढविली होती. केवळ काही मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कालांतराने आझम पानसरे यांनी भाजप प्रवेश केला. त्याप्रमाणे शैलेश मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. पिंपरी विधानसभेमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार झाले, शिवसेनेचे आमदार आहेत. तरीही पिंपरी विधानसभा मतदार संघात विकासकामांची बोंब आहे. कुठल्याही कामाचे नियोजन नाही. एम्पायर इस्टेटमधील रॅम्पचा विषय आहे. या विषयाला स्थानिक आमदारांनी लक्ष दिले नाही. असे बरेच प्रलंबित प्रश्‍न आहेत. ते मार्गी का लागत नाही, याचे उत्तर नागरिकांना कोण देणार? चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाच्या मानाने पिंपरी विधानभा मतदार संघ दुर्लक्षित आहे.