Monday, 17 March 2014

Music bands help Pimpri Chinchwad Municipal Corporation recover Rs 11cr tax dues

Pimpri Chinchwad corporators may find it humiliating to use brass bands to recover property tax, but the municipal administration finds the exercise highly rewarding.

पिंपरीतील अतिक्रमण कारवाईसाठी प्रशिक्षण

स्टिकर्स, बॅनर्स आणि अनधिकृत फलक यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येऊ नये म्हणून अतिक्रमणविरोधी विभागाला सातत्याने कारवाई करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या सायकल रॅलीमधून पर्यावरण वाचविण्याचा संदेश

सायकल रॅलीमधून दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
इंधनाच्या दराचा उडणारा भडका आणि त्यामुळे निर्माण झालेला इंधन बचतीचा प्रश्न हा आज गंभीर होत आहे. या सर्व संकटांचा विचार करता नागरिकांनी सायकलींचा वापर वाढविल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. सायकल वापरा, प्रदूषण टाळा, वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा असे पोस्टर लावून पिंपरीतील पर्यावरणप्रेमींनी आज शहरातील प्रमुख मार्गावरून सायकल रॅली काढली. पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

५ टक्केच कंपन्यांचे नियमानुसार 'CSR'


... केलेल्या पाहणीत या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. संस्थेने रांजणगाव, तळेगाव, चाकण, पिंपरी चिंचवडहिंजवडी, पिरंगुट, हडपसर आणि शिरवळ येथील १०३ कंपन्यांचा अभ्यास केला. यामधील ३० टक्के कंपन्या 'सीएसआर'मध्ये काम करत असल्याचे आढळून आले.

'उद्योगनगरी'चे उमेदवार रिंगणात असतील, तर 'आप'ला विजयच भापकर

''त्यांच्या'पेक्षा मावळ, रायगडकरांसाठी वर्षानुवर्षे लढलोय'
मावळ लोकसभेसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार उद्योगनगरीतूनच रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. सर्व उद्योगनगरीचे उमेदवार रिंगणात असतील, तर आपला विजय निश्चित आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी केला आहे. उद्योगनगरीतील 'त्या' उमेदवारांपेक्षा आपण इथल्या प्रश्नांबरोबर मावळ, लोणावळा, कर्जत आणि उरण येथील शेतक-यांसाठी वर्षानुवर्षे लढा दिला आहे, असेही त्यांनी म्हटले.

वीजपुरवठ्यासाठी इमारतीमध्ये जागा हवीच

वेगाने वाढणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या इमारतींमध्ये वीजपुरवठा यंत्रणेला जागा उपलब्ध होत नसल्याने नव्या ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात महावितरणला अडचणी येत आहेत.

‘सत्यमेव जयते’ने घेतली ‘स्वच्छ’च्या कामाची दखल - आमिर खानचा सलाम

‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात आमिर खान याच्यासमवेत सरूबाई वाघमारे आणि लक्ष्मी नारायण यांनी स्वच्छ संस्थेच्या कामाची माहिती दिली.

प्रचारफेर्‍या, बैठका,अन कोपरासभा

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सुटीचे औचित्य साधून उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. दुचाकी फेरी, गुप्त बैठका, कोपरा सभा मेळावा घेऊन विविध पक्षांनी तसेच अपक्षांनी आपली भूमिका समजावून सांगितली. पहिल्या टप्प्यात मतदारभेटीवर भर दिला. 

सुटीच्या दिवशीही पाणीपट्टी भरणा

पिंपरी : पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय व करसंकलन कार्यालयांत सुटीच्या दिवशीही भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रविवारपासून (दि. १७) याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे कार्यकारी अभियंता शरद जाधव यांनी सांगितले.

पवनेतील जलपर्णी हटविण्याची मागणी

किवळे : रावेत, किवळे परिसरात पवना नदीच्या पात्रात जलपर्णी वाढू लागली असून, सध्या प्रमाण कमी असतानाच महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.