Saturday, 19 April 2014

Flyover to come up at Sangvi phata

Joint city engineer Rajan Patil said, "The civic body is developing a 14-km Sangvi-Kiwale Road which starts from Mukai chowk in Kiwale to Rajiv Gandhi bridge on Mula river in Sangvi as a BRTS route.

उन्हाच्या तडाख्यातही फुलझाडे तरारणार

पिंपरी : कासारवाडी, नाशिक फाटा चौकातील उद्योगपती भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाणपुलाच्या हिरवळ टिकविण्यासाठी कुपनलिका खोदण्यात आलीे. त्या पाण्यातून सुशोभीकरण्यासाठी लावलेली रोपे व हिरवळ टिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुलाचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटल्यानंतर महापालिका प्रशासनास जाग आली आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा ‘लालफिती’च्या कारभाराचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे. 

अजित पवारांना दमदाटी भोवणार

‘सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावाचा पाणीपुरवठा तोडून टाकेन..’, बारामती लोकसभा मतदारसंघातील मुर्टी-मासाळवाडी गावातील मतदारांना दिलेली ही धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भोवण्याची चिन्हे आहेत.

मतदान ६0.१६ टक्के

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान शांततेत झाले. या मतदारसंघात ६0.१६ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली. एकूण १९ लाख ५२ हजार २0८ मतदारांपैकी ११ लाख ७४ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ४६ हजार ९८९ इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या ५ लाख २७ हजार ४७५ इतकी आहे. मतदान यंत्रातील बिघाडाव्यतिरिक्त या मतदारसंघात बोगस मतदान व अन्य तक्रारी आल्या नाहीत. 

क्रांतीवीर दामोदर हरि चापेकर

आज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन ! इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने, प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणार्‍या या क्रांतिकारकाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख प्रपंच !
दामोदर हरि चापेकर यांचे घराणे मूळचे कोकणातील वेळणेश्वरचे; मात्र त्यांचे पूर्वज पुण्याजवळील चिंचवडला येऊन स्थायिक झाले. तेथेच 25 जून 1869 रोजी दामोदरपंतांचा जन्म झाला. लहानपणापासूनच दामोदरपंत, त्यांचे दोन्ही बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव यांचा ओढा हिंदुस्थानला परदास्यातून मुक्त करण्याकडे होता. क्रांतीकार्याची आवश्यकता म्हणून ते प्रतीदिन बाराशे सूर्यनमस्कार घालीत, तसेच एका तासात अकरा मैल पळण्याचाही वेग त्यांनी प्राप्त केला होता !

मिस्ड कॉल द्या... ‘HIV’ची माहिती घ्या

‘एचआयव्ही’ म्हणजे काय...? एचआयव्हीची लक्षणे नेमकी काय...? हा आजार कसा रोखता येईल... यासारख्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत? मग संवाद हेल्पलाइनने सुरू केलेल्या मोबाइल क्रमाकांवर ‘मिस्ड कॉल’ द्या... आणि सर्व माहिती मोफत मिळवा..

डॉ. श्रीकर परदेशी यांचा ‘ई-मेल’ हॅक झाल्याचे उघड

राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाचे महासंचालक डॉ. श्रीकर परदेशी यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

खर्चात नार्वेकर आघाडीवर

पिंपरी : निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या र्मयादेत उमेदवाराने खर्च करणे अपेक्षित असते. ‘मावळ’मधील उमेदवारांनी खर्चाला हात सैल केल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांनी सर्वाधिक २६ लाख ९३ हजार ४९१ रुपये खर्च केला, तर अपक्ष उमेदवार वैशाली बोर्डे यांनी सर्वांत कमी १३, ७७0 रुपये खर्च केला. 

महापालिका कर्मचारी सुटीवर

पिंपरी : मतदान होताच गुड फ्रायडे, नंतर लगेच आलेली रविवारची सुटी याची सलगता लक्षात घेऊन सुटीचे नियोजन केलेले महापालिकेचे काही कर्मचारी गुरुवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपताच बाहेरगावी निघून गेले. कालपर्यंत थोडीफार दिसून येणारी वर्दळही संपुष्टात आली. वाहनतळ रिकामे होते. शिवाय महापालिका इमारतीत सुरक्षारक्षकांशिवाय कोणीच दिसून आले नाही.