Following the inspiring example of its Pune counterpart, the Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has also cracked the whip on those who litter, spit, urinate, defecate in public places.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 22 November 2018
समांतर पूल एप्रिलमध्ये खुला
पिंपरी - हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम वेगाने सुरू असून, येत्या एप्रिलमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना दोन पूल उपलब्ध होतील.
संधींचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडला पसंती
पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने शहराचे सर्वेक्षण करून नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडकडे अनेक जण ‘संधीचे शहर’ म्हणून पाहात असल्याचे आढळून आले आहे; तसेच ‘स्मार्ट व स्वच्छ शहर’ म्हणून बहुतांश नागरिकांनी पसंती दिली आहे.
’ठग’ पदाधिकार्यामुळे पारदर्शक कारभाराशी तुटली ’नाळ’
भाजप पक्षश्रेष्ठी, अधिकार्यांची डोकेदुखी वाढली : कंत्राट, टक्केवारीसाठी महापालिकेत थयथयाट
पिंपरी-चिंचवड : महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता मिळताच ’कधी नाही मिळालं आणि गटकन गिळालं’ अशा पद्धतीने भाजपच्या काही पदाधिकार्यांचा कारभार सुरू आहे. सगळी कंत्राटे आपल्याच खिशात घालण्यासाठी एका पदाधिकार्याने महापालिकेत सत्ताबाह्य केंद्र तयार केले आहे. त्यामुळे अधिकार्यांसह भाजप नेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या ’ठग’ पदाधिकार्याचे उपद्रवमूल्य वाढतच चालल्याने भाजपच्या पारदर्शक कारभाराचे धिंदवडे निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एककल्ली कारभार, विरोधकांकडून सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप याला कंटाळलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेची सुत्रे भाजपच्या हाती सोपविली.
Pimpri Chinchwad municipal corporation to provide one lakh incentive for marrying disabled
A resolution in this regard was passed by the standing committee of the standing body on November 17. The incentive is only for the marriage between a disabled person and an able person. As of now, the civic body has made Rs 10 lakh budgetary allocation for the same. More funds would be allocated based on the response, informed PCMC officials.
ई-बस किफायतीच!
1,225 रुपयांत धावते 225 किलोमीटर अंतर
चाचणीदरम्यानचा निष्कर्ष : इतर इंधनांच्या तुलनेत अत्यल्प खर्च
चाचणीदरम्यानचा निष्कर्ष : इतर इंधनांच्या तुलनेत अत्यल्प खर्च
Pimpri Chinchwad municipal corporation plans Unnati, a student grading scheme for municipal schools
The Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has decided to implement ‘Unnati Scheme’ to improve the learning level of students studying in municipal corporation schools.
पिंपरीत मेट्रोच्या बहुतांश खांबांचे काम पूर्णत्वाकडे
पिंपरीमध्ये चारशे छपन्न खांबांपैकी एकशे त्र्याऐंशी खांबाचे काम पूर्ण झाले आहे.
बांधकाम नियमितीकरणास नागरिकांचा अल्प प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे दीड वर्षात केवळ 65 अर्ज दाखल
राज्य सरकारने 18 फेब्रुवारी 2019 पर्यंत दिली मुदतवाढ
जम्मू ते कन्याकुमारी सायकल यात्रा
पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा प्रवास करून २१ डिसेंबरला विचार यात्रा कन्याकुमारीला पोचणार आहे.
पुण्याच्या चोहोबाजूंना मेट्रोचे जाळे!
आणखी सहा मार्गांवर मेट्रोचा “पीएमआरडीए’ला प्रस्ताव
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर केलेल्या “सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ (सीएमपी) शहरात सुमारे 195 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे दोन आणि “पीएमआरडीए’चा एक अशा तीन मार्गांव्यतिरिक्त नव्याने सहा मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पुढील काळात शहरात मेट्रोचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.
स्वच्छतेचे झाले; पण विद्रूपीकरणाचे काय ?
पेठा, उपनगरांमध्ये सार्वजनिक मालमत्ताचे बेसुमार विद्रूपीकरण
जाहीरातदारांची माहिती असतानाही पालिकेची कारवाईस टाळाटाळ
जाहीरातदारांची माहिती असतानाही पालिकेची कारवाईस टाळाटाळ
सफाई कामगार सुट्टीच्या मेहनतानापासून वंचित
पिंपरी – शहर स्वच्छतेसाठी राबणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सफाई कामगार सुट्टीच्या अतिरिक्त मेहनतान्यापासून वंचित आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली करोडो रुपयांचा चुराडा करणाऱ्या श्रीमंत महापालिकेकडून सफाई कामगारांना ओव्हरटाईम देण्यात चालढकल होत असल्याने सफाई कामगार संताप व्यक्त करत आहेत.
शहर परिवर्तन’ची व्याप्ती रूंदावली
पिंपरी- शहर परिवर्तन कार्यालयाच्या वतीने शहरात केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. 100 कोटी रकमेपर्यंतची कामे करण्याची अट शिथील करण्यात आली आहे. अगदी एक कोटी रकमेची कामे देखील करण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
शहरबात पिंपरी : उद्योगनगरीत सांस्कृतिक अधोगती
प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. त्यासाठी पाच महिने नाटय़गृह बंद ठेवले.
रस्त्यासाठी जागा देण्यास एमआयडीसीची मान्यता
रावेत, किवळे, मामुर्डी, शिंदेवस्ती येथील नागरिकांना थेट प्राधिकरणात येता येणार
पिंपरीचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मध्यस्थीने सुटला प्रश्न
पिंपरीचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मध्यस्थीने सुटला प्रश्न
PCNTDA to demolish illegal structures in year-long drive
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad New Township Developm ..
शहरातील नद्यांना समृद्ध करण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने ‘मुठाई महोत्सव’
पिंपरी (Pclive7.com):- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून आणि परिसरातून वाहणा-या नद्या मरणासन्न झाल्या आहेत. त्यांना पुन्हा उर्जितावस्था मिळावी. पुन्हा नद्यांचे वैभव खुलावे यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील १९ नदीप्रेमी संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्था नद्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढून त्यांना पुन्हा समृद्ध करण्यासाठी भारतीय नदी दिवसानिमित्त ‘मुठाई महोत्सव’ साजरा करणार असल्याची माहिती शैलजा देशपांडे, प्रदीप वाल्हेकर, नरेंद्र चुघ, राजीव भावसार, सचिन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महेश लांडगेंच्या वाढदिवसानिमित्त चिखलीतील गोशाळेत चारा वाटप
पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथील चंद्रभागा गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्यावतीने चारा वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
उड्डाणपुलामुळे फुटणार कोंडी
साई चौकातील प्रशस्त उड्डाणपुलाची रावेतकडून (डांगे चौक) औंधकडे जाणारी एक बाजू डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाहनचालकांसाठी खुली होणार आहे. या पुलाची एकूण लांबी ७१० मीटर एवढी असून, रुंदी ८ मीटर आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या पुलासाठी २७ कोटी २० लाख रुपये इतका खर्च झाला असून, येथील हायटेन्शन केबलमुळे कामाला विलंब झाला आहे. डांगे चौकाकडून औंधकडे जाण्यासाठी कस्पटे वस्तीमार्गे विशालनगरवरून औंधकडे जावे लागत होते. पुलाची एक बाजू खुली झाल्याने वाहनचालकांना थेट औंधच्या दिशेने जाता येणार आहे; तसेच पिंपळेसौदागर-हिंजवडी हा दुतर्फा रस्ता साई चौकात 'फ्री-वे' होणार असल्याने शिवार चौकापासून साई चौकापर्यंतची कोंडी फुटेल, अशी माहिती स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.
शहरातील जैवविविधतेचा महापालिका करणार सर्व्हे
सल्लागार समितीची केली स्थापना
पिंपरी-चिंचवड : शहरातील जैवविविधतेचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार जानेवारी 2019 पर्यंत शहरातील जैवविविधतेसाठी ’पॉलीसी’ आणि ’ऍक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. या कामासाठी मुंबईतील टेरेकॉन इकोटेक या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली. जैवविविधता समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नुकतीच बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, समितीच्या सदस्या कमल घोलप, अर्चना बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे, महापालिकेचे उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, चंद्रकांत कोंडे, दिग्वीजय पवार बैठकीला उपस्थित होते.
कचरा जाळणे बंद, पण...
पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात होता. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच सोमवारी (ता. १९) कचरा जाळणे बंद झाले, त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
कचरा प्रक्रिया प्रकल्प तुम्हीही उभारा
पिंपरी - रोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प स्वतः उभारावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला बहुतांश सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही प्रकल्प उभारला, तुम्हीही उभारा’, असे आवाहन अन्य सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.
शहरातील १२० करबुडवे गायब
पिंपरी - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायदा लागू केला असला, तरी त्याआधी अस्तित्वात असणाऱ्या सेवाकर बुडवणारे शहरातील सुमारे १२० जण गायब झाले आहेत. त्यांनी सुमारे ४१ कोटी रुपयांचा कर बुडविला असला, तरी येत्या काही दिवसांत ही रक्कम दंडासहित वसूल करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागातील सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.
मागणीपेक्षा रक्ताचा पुरवठा कमी
पिंपरी - शहरात रक्ताच्या पिशव्यांची मागणी वाढत असताना, तुलनेने पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) ४५५५ पिशव्यांचा तुटवडा जाणवला होता. यंदा मात्र पहिल्या सहामाहीतच तब्बल तीन हजार पिशव्या कमी पडल्या आहेत. रक्तदान शिबिरांना मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले आहे.
वाहतूक नियमभंग करणे पडणार बाराच्या भावात
3 महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याचे आदेश
पुणे – गाडी चालवताना मोबाइल वापरणे, दारू पिऊन वाहन चालवण्याबरोबरच सिग्नल तोडणेही आता महाग पडणार असून संबंधित वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. राज्यशासनाने यासंदर्भाचे परिपत्रक काढले असून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“प्राणी क्लेष प्रतिबंधक’वर शहरातील दोघांची वर्णी
पिंपरी – राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याकरिता स्थापन केलेल्या या समितीवर शहरातील दोघांची तर देहूगावातील एकाची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपळे गुरवमध्ये आदिवासी महोत्सव
23 ते 25 नोव्हेंबर असे तीन दिवस विविध कार्यक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आदिवासी खाद्य व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात शुक्रवार (दि.23) ते रविवार (दि.25) या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात आदिवासी खाद्यपदार्थासह वस्तू विक्रीचे एकूण 30 स्टॉल असणार आहेत, अशी माहिती जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालिकेच्या विधी समिती कार्यालयात झालेल्या परिषदेस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी उपस्थित होते. मुंढे यांनी सांगितले की, पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर या महोत्सवात आदिवासी महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. महोत्सवात आदिवासी खाद्यपदार्थाची रेलचेल असणार आहे. तसेच, आदिवासी वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉल असणार आहेत. महोत्सव सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत खुले असणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पाचला होणार आहे. या निमित्त शोभा यात्रा काढली जाणार आहे. दररोज सायंकाळी पाचनंतर होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी नृत्य, ढोल, लेझीमसह विविध वादन आणि शाहिरी जलसा होणार आहे. शहरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंढे यांनी केला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)