Saturday, 26 April 2014

Shrikar Pardeshi's email hacked

Former PCMC commissioner and State Inspector General of Registration (IGR) Shrikar Pardeshi's email account was recently hacked by unidentified persons.

Police chief asks parents to verify drivers’ details



PUNE: Police Commissioner Satish Mathur has called upon parents to verify the details of the drivers with whom their children travel to and from school.

प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत ...

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळलेली बंडाळी प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत फसफसून वर आली आहे. शेकापच्या लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांनी आज परपस्पर अर्ज दाखल करत राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केले आहे. तर अधिकृत उमेदवारांना सूचक-अनुमोदकच न मिळाल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व सभागृहनेत्यांना दिवसभर कसरत करावी लागली. दरम्यान, सहा पदांसाठी 13 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.  

पिंपरी चिंचवड आभियांत्रिकी कॉलेजला आयएसओ ९००१-२००८

निगडी प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड इंजिनियरिंग कॉलेजला "टीयुव्ही नॉर्ड" या जर्मन कंपनीने आयएसओ ९००१-२००८ हे गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

PF ची शिल्लक आता लगेच कळणार

कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून प्रॉव्हिडंट फंडासाठी (पीएफ) किती रकमेची कपात करण्यात आली आणि किती रक्कम खात्यात जमा झाली, याची खातरजमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता वर्षभर वाट पाहावी लागणार नाही.

पिंपरीमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली बंडाळी पिंपरी महापालिकेच्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत उफाळून आली असून, हा पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.

चोवीस कर्मचार्‍यांना नोटीस

पिंपरी : आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन राबवलेल्या महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला दांडी मारणार्‍या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील २४ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामध्ये १४ बीट निरीक्षक, एक आरोग्य निरीक्षक, दोन लिपिक, ७ आरोग्य मुकादम यांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांची वेगळी चूल

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुकीनिमित्ताने दिसून येऊ लागले आहेत. पक्षनेत्यांनी इच्छुकांना अर्ज देण्याचे आवाहन केले, त्यास जुमानले नाही. शहराध्यक्ष, पक्षनेत्यांशी चर्चा न करता काहींचे परस्पर अर्ज दाखल झाले. ६ जागांसाठी १३ अर्ज आले आहेत. २८ एप्रिलला होणार्‍या या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले आहेत.

पथारीवाल्यांचा विरोध; अधिकारी हतबल

पिंपरी : अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई करण्यास येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाबरोबर छोटे व्यवसायिक हुज्जत घालतात. हातगाडी, पथारीवाल्यांचे नेतृत्व करणारे पुढारी संघर्षाची भूिमका घेतात. त्यामुळे कारवाई करता येत नाही. अशी हतबलता महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

लोढा यांच्या तडीपारीचा प्रस्ताव रद्द

पिंपरी : चिंचवड येथील स्वरूपा अनिल लोढा यांच्या तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्यात लोढा यांच्यावर गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्याकडून तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध तडीपार करणे इतपत सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

शवागृहातील शीतपेटी कुचकामी

पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या शवागृहातील शीतपेटी तांत्रिक बिघाडामुळे निरूपयोगी ठरू लागली आहे. सुविधा असूनही कामी येत नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

वसंत व्याख्यानमालेचे निगडीत उद्घाटन

यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेचे उद्‌घाटन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.