Monday, 5 May 2014

Pimpri Chinchwad Municipal Corporation begins pre-monsoon works

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed civic officials and employees to complete pre-monsoon nullah cleaning work before June 5.

PCMC pools begin following rules

Pimpri: The staff of various swimming pools managed by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) turned back a large number of swimmers on Wednesday to prevent overcrowding in the swimming pools.

संस्था, उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार

पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या शहर स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

उद्योगनगरीला अभाव विशेष नगर वसाहतीचा!

उद्योगनगरी ही ओळख मागे टाकून पिंपरी-चिंचवड ही आता 'टाऊनशीपनगरी' झाली आहे. शहराच्या सुसज्ज विकासामुळे येथील जमिनी आणि घरांना सोन्याचा भाव आला आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घर आता दुर्लभ झाले आहे. मगरपट्टा, नांदेड सिटीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडलाही विशेष नगर वसाहतीची आवश्यकता आहे.

पिंपरीत प्रथमच मालमत्ता आणि वाहनांचे एकत्रित प्रदर्शन

अमेयश सोल्युशनच्या वतीने प्रथमच 3 व 4 मे दरम्यान पिंपरी येथे अपना घर एक्सपो आणि पीसीएमसी ऑटो एक्सपो या एकत्रित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांना अटक

हॉटेल व्यवस्थापकसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा
मैत्रिणीच्या कुटुंबियांसह हॉटेलात जेवणासाठी आलेल्या महिलेला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह चौघांना अटक केली. ही घटना भोसरी-आळंदी रस्त्यावरील पिरॅमिड हॉटेलमध्ये शनिवार (दि.3) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकारणाचा जाब विचारण्याच्या कारणावरुन हॉटेल व्यवस्थापकासह तीन वेटरने महिलेसह तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. हे हॉटेल एका आमदाराच्या नातेवाईकाचे असल्याने पोलिसांनी कारवाई करताना हात आखडता घेतल्याची चर्चा आहे.