Friday, 28 September 2018

...आता कुठे पोलिसांमध्ये ‘सिंघम’ दिसला

सर्वत्र अंधकार पसरलेला असताना कुठेतरी एखादा कवडसा दिसावा, तसा अनुभव सध्या पिंपरी चिंचवडकर घेत आहेत. खून, खंडणी, दहशतवाद, चोरी, लूटमार, हाणामारी, टवाळखोरी, गुंडागर्दीमुळे शहर बदनाम झाले होते. सर्व सोयींनीयुक्त असे हे सुंदर, समृद्ध शहर राहण्यायोग्य राहिले नव्हते. वाहतूक समस्येने लोक हैराण होते. रोजच्या वाहतूक कोंडीत मेटाकुटीला आलेल्या हिंजवडीतील चार लाख आयटी कर्मचाऱ्यांनी आणि काही उद्योजकांनीही ‘आता पुरे’ची भाषा सुरू केली होती. प्रशस्त रस्ते असूनही रोजचे अपघात सुरूच होते. बेशिस्त वाहनचालकांमुळे शिस्तबद्ध चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. बाहेरून आलेल्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे सर्व रिक्षाचालकांची नालस्ती झाली होती. थोडक्‍यात गुन्हेगारी आणि एकूणच वाहतूक समस्येने सर्वसामान्य नागरिकांना नको नको झाले होते, कहर झाला होता. अशा परिस्थितीत आर. के. पदमनाभन्‌ यांच्यासारखा पहिलाच एक ‘सिंघम’ पोलिस आयुक्त शहराला लाभला.

शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा – राहुल जाधव

चौफेर न्यूज – शहर स्वच्छते मध्ये नागरीकांनी सहभाग द्यावा, असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास खात्या तर्फे नॅशनल इन्सिट्युट ऑफ अर्बन अफेयर्स आणि इकले साऊथ एशिया यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिका-यांची कार्याशाळा आयोजित करण्यात आली आहे त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

दुचाकीची सीएनजी किट ‘गॅस’वरच

पिंपरी - दुचाकीच्या सीएनजी किटसाठी अर्थसाह्य देण्याचे बॅंकांनी नाकारल्यामुळे ही योजना फसली आहे. शहरामध्ये १६ लाख दुचाकी असून आतापर्यंत केवळ १५० दुचाकींना हे किट बसविण्यात आले आहे. 

मेट्रोचे काम 30 टक्के पूर्ण

पिंपरी-चिंचवड : वाढणारी वाहनांची संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण आणि प्रवासासाठी लागणार वेळ या सर्वांना पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात आहे. मेट्रोच्या वतीने शहरात मार्गिका क्रमांक एकचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड करांना मेट्रोतून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे.

शहरात कॅन्सर रुग्णालय बांधा – माजी महापौरांची मागणी

पुण्याच्या धर्तीवर पिंपरीतही माजी महापौरांची संघटना
निगडीत महापौर निवासस्थान उभारणार : राहुल जाधव
पिंपरी-चिंचवड : शहरातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त कॅन्सर रुग्णालय बांधण्यात यावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी शहराच्या माजी महापौरांनी केली. तसेच माजी महापौरांसाठी पालिका मुख्यालयात कार्यालय करावे, वैद्यकीय विमा चालू करावा, पालिकेच्या कार्यक्रमांना बोलविण्यात यावे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी, मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव द्यावे. आंद्रा-भामा आसखेड, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर पुण्याच्या धर्तीवर पिंपरीत देखील माजी महापौरांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, महापौरांच्या निवासस्थानासाठी निगडीत आरक्षण आहे. त्याठिकाणी महापौर निवास्थान बांधण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

महापालिकेच्या वायसीएम व जलशुद्धीकरण केंद्रात सौर उर्जा प्रकल्प उभाणीस मंजुरी

सौर उर्जेतून वीज निर्मिती प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तेचा ताबा तब्बल 25 वर्षे ठेकेदार एजन्सीला मोफत का द्यायचा. पालिकेची आर्थिक क्षमता असताना ठेेकेदाराला पोसण्यासाठी हा प्रकल्प का राबवायचा, असा सवाल सत्ताधार्‍यांसह विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करीत, आयुक्तांसह अधिकार्‍यांना धारेवर धरले. अखेर विरोध डावलून सत्ताधार्‍यांनी क्‍लीन मॅक्स कंपनीसोबत रेस्को तत्वावर सदर 459 किलो वॅटचा प्रकल्प यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) व सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यास मंजुरी दिली.

११७६ फुकटय़ा प्रवाशांवर ‘पीएमपी’कडून कारवाई

पीएमपीकडून निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला आहे.

पिंपरी : शहरातील महिला अत्याचाराचे पडसाद सर्वसाधारण सभेत

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. मात्र शहरातील गुन्हेगारी आणि महिला सुरक्षित आजही नाहीत..शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांची हप्तेखोरी वाढली आहे. तक्रारदारांना न्याय देण्याचे सोडून त्यांच्यावरच कायद्याचा दंडुका उगारला जातो, अशा संतप्त शब्दात सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेकानी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवत सभा तहकूब केली.

गिधाड प्रवृत्ती ठेचायलाच हवी


आज मध्यरात्रीपासून विमान प्रवास, एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज महागणार

येत्या पाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही जर एसी, वॉशिंग मशिन, फ्रीज अशा वस्तू खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्याकरिता महत्वाची आहे. कारण या वस्तू आता महाग होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यामध्ये विमान इंधन, वातानुकूलन यंत्रणा (एसी), वॉशिंग मशिन आणि फ्रीजचा समावेश आहे. यामुळे या वस्तूंच्या खरेदीकरिता रक्कम मोजावी लागणार आहे.

[Video] पिंपरी पालिकेच्या अधिकाऱ्याची चौकशी करा -आमदार चाबुकस्वार

पिंपरी पालिकेच्या अधिकाऱ्याची चौकशी करा -आ.चाबुकस्वार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणार-हर्षल ढोरे

जुनी सांगवी (पुणे) : सांगवी व परिसरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने समाज बांधवांना इतरत्र जावे लागते. येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरात प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा सांगता समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

[Video] पिंपरी पालिकेच्या गेटवरच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना रोखले !