Saturday, 22 December 2018

PCMC set to create fibre cable network of 750km

PIMPRI CHINCHWAD : The infrastructure for online connectivity  .. 

चिखलीतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनेस मिळाला मुहूर्त

पिंपरी (दि. २१ डिसें.) :- केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून, घरकुल प्रकल्पातील ४ सोसायटयांच्या इमारतीमधील एकूण १६८ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज (दि. २१) रोजी काढण्यात आली.

महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – बस पकडताना महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरटयांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथे घडली. संजीवनी ज्ञानेश्वर देवकर (वय 54, रा. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

‘खेलो इंडिया युथ गेम्स’साठी महापालिकेने दिले 36 लाख रुपये

एमपीसी  न्यूज – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत ‘खेलो इंडिया युथ गेम्स-2019 ‘ होणार आहेत. बालेवाडीत होणा-या या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पावणेछत्तीस लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. 

पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर स्कूलच्या विद्यार्थ्यांची अनिकेत बालग्राम आश्रमास भेट

एमपीसी न्यूज – चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी आकुर्डी येथील अनिकेत बालग्राम या आश्रमास भेट दिली. विद्यार्थ्य़ांनी आश्रमातील विद्यार्थ्यांबरोबर आनंदात दिवस घालवला. तसेच येथील मुलांना शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत भेटवस्तू देऊन आश्रमातील मुलांच्या आनंदात सहभागी होता आले. आश्रमातील मुलांबरोबर गप्पा तसेच त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ हा खूप मौल्यवान होता. हा अनुभव चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेता आला.

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदेना निलंबित करा – शत्रुघ्न काटे

पिंपरी चिंचवड : महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाची माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. ‘मी माहिती देऊ शकत नाही’, असे उध्दटपणे त्यांनी उत्तर दिले. अधिकार्‍यांना एवढी मस्ती कशाला हवी. असे म्हणत ज्योत्स्ना शिंदे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पाडली.

चिखलीच्या घरकूल प्रकल्पातील 168 सदनिकांची सोडत

पिंपरी चिंचवड : घरकुल प्रकल्पातील 4 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत अ‍ॅटो क्लस्टर, चिंचवड येथे महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी ही घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

वाहन चालकांपर्यंत नोटीसा पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहने दामटणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अडवून दंडाची पावती फाडण्यास नकार देत पोलीसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारातही भर पडली आहे. इतकेच काय तर पोलीसांनी गाडी अडविली तर ‘दादा’, ‘भाऊ’, ‘भाई’,ला फोन लावून गाडी सोडविण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यावर उपाय म्हणून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या संबंधित वाहन चालकाला न थांबवता किंवा त्याच्याशी काहीही न बोलता वाहनाचा क्रमांक असलेल्या पाटीचे छाया चित्र काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, गेल्या दहा महिन्यात नियम मोडणार्‍या दोन लाख 79 हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी गोळा केली आहे. त्यातील 46 हजार 700 वाहन चालकांना देण्याच्या नोटीसा तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

महावितरणने कामबंदीचे आदेश मागे घ्यावेत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स संघटनेच्या सभासदाला महावितरणमधून केलेल्या नियमबाह्य कामबंदी आदेश जारी केल्याच्या  निषेधार्थ संघटनेच्यावतीने महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन 26 डिसेंबर पासून महावितरण कंपनीचे रस्ता पेठेतील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे.

टिकटॉकचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई – आयुक्त पद्मनाभन

पिंपरी : केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप्लिकेशनचा दुरुपयोग करत त्यातून अश्‍लील, बदनामीकारक आणि चुकीचे व्हिडिओ बनविण्यात येत आहेत. यामुळे भांडण, आत्महत्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, वाहतुकीस अडथळा असे अनेक प्रकार घडत आहेत. मात्र याची पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली असून असा उपद्व्याप करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली. 

कोकणात निघालेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका

पुणे  :  मंगळवारी आलेली नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शनिवारीच कोकणात फिरायला निघालेल्या पर्यटकांना वाहतूककोंडीचा फटका बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः अमृततांजन पुलाजवळ अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत आहे.

मेट्रोसाठी स्वनिधीतून १५५ कोटी

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते निगडी या अंतरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास गुरुवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकल्पास पुणे मेट्रोऐवजी पुणे व पिंपरी- चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही सभेने मान्यता दिली. राज्य सरकारने निधी न दिल्यास या प्रकल्पासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून १५५ कोटी रुपये देण्याची उपसूचना संमत करण्यात आली. 

वीटभट्टीवरील मुलांसाठी हवी स्कूलबस

पिंपरी - रावेत, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी भागातील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना स्टोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. मात्र, वीटभट्ट्यांपासून शाळांचे अंतर चार ते पाच किलोमीटर असल्याने मुलांना पायपीट करावी लागत आहे. या मुलांसाठी महापालिकेने बसची व्यवस्था करावी, या मागणीसाठी मुलांसह त्यांच्या पालकांनी महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर शुक्रवारी ठिय्या मांडला. 

स्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर

पिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामे करण्यासाठीच्या दोन डीपीआरला (सविस्तर प्रकल्प आराखडा) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे २५५ कोटी रुपयांची कामे एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

पिंपरी शहरात होणार सांडपाण्याचा पुनर्वापर

पिंपरी - शहरात सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणीसाठी नागरिकांचा खासगी सहभाग घेतला जाणार आहे. त्यासाठी धोरण व कृती आराखडा निश्‍चित केला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडची आयपीएलमध्ये निवड, चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार

पिंपरी (Pclive7.com):- आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याची चेन्नई सुपर किंग्ज संघात निवड झाली आहे. शहरातून आयपीएलमध्ये निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पीसीएससीएलच्या वैधानिक लेखापरीक्षकपदी प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस

पिंपरी (दि. २० डिसें.) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (पीसीएससीएल) च्या वैधानिक लेखापरीक्षकपदी (ऑडीटर) चिंचवड येथील प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस यांची नेमणूक करण्यात येणार आहे.