Monday, 9 April 2018

Pune Municipal Corporation begins widening highway in Bopodi to ease traffic congestion

PIMPRI CHINCHWAD: Commuters travelling on the Pune-Mumbai highway can expect the bottleneck at Bopodi to ease over the next six months after Pune Municipal Corporation (PMC) completes widening of the Pune side of the highway.

Kalewadi phata BRTS lane nears completion


PIMPRI CHINCHWAD: Very soon, commuters will travel on the 10.5km BRTS corridor from Kalewadi phata to Dehu Alandi. It will be an unique experience as to travel on the 1.6km flyover at Empire Estate in Chinchwad.

गणेश तलावाच्या पाण्याने गाठला तळ

निगडी – बाराही महिने पाण्याने भरलेला असणारा गणेश तलाव आता तळ गाठू लागला आहे. तलावातील बहुतेक भाग कोरडा पडला असून, अगदी थोडेसे उथळ डबक्‍यासारखे पाणी कोपऱ्यांमध्ये उरले आहे. अयोग्य पाणी नियोजनामुळे गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच प्राधिकरणातील गणेश तलाव कोरडा पडला आहे.

दापोडीतील रस्ता बाधितांना न्याय कधी?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील दापोडीच्या महात्मा फुलेनगरमधील 30 मीटर रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 350 पैकी फक्त 219 रहिवासी पात्र ठरत असल्याने उर्वरित रहिवाशांना याचा फटका बसणार आहे. सर्व बाधितांना पात्र ठरविण्याची रहिवाशांची मागणी आहे. याकरिता या खासगी जागा मालकाने देखील पुढाकार घेतला असून, महापालिका प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Drones take to the skies as Maha-Metro begins survey for proposed Swargate-Katraj corridor

The Maharashtra Metro Rail Corporation (Maha-Metro) on Saturday began the physical survey for the proposed Swargate-Katraj Metro corridor.

Pune Metro conducting a drone survey of Satara road on Saturday

Mayor intervenes as school continues to make parents buy kits

More chaos at GIIS

Officials finally agreed to hand out EFK equipment, after which those who had already paid for it lined up to get their money back

प्राधिकरणातील वेदांगीची सायकलवर जगप्रदक्षिणा

प्राधिकरण, निगडी येथील 19 वर्षीय वेदांगी कुलकर्णी ही चक्‍क सायकलवर जगप्रदक्षिणा घालणार आहे. ही मोहिम ती कोणाच्या मदतीविना एकटीने पूर्ण करणार आहे हे विशेष. दररोज 320 किलोमीटर वेगाने 100 दिवसांमध्ये 5 खंडांतून एकूण 29 हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे. भारतीय मुली साहसी क्रीडा प्रकारात मागे नसल्याचे या मोहिमेतून वेदांगीला दाखवून द्यायचे आहे. 

Hinjewadi residents irked by dumping, burning of garbage

PUNE: Rampant dumping and burning of garbage around their housing societies near the Hinjewadi IT Park have irked residents no end.

सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने दापोडीत स्वच्छता मोहिम

पुणे (Pclive7.com):- जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन सामर्थ्य प्रबोधिनी दापोडी शाखेच्या वतीने दापोडी मधील पवना घाट व परिसराची स्वच्छता करण्यात आली. या दरम्यान पवना घाट व परिसरामध्ये खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या व दारुच्या बाटल्या आढळल्या असुन, दरम्यान स्वच्छता करताना कार्यकर्त्यांनी पवना घाट व परिसरातील विविध भागात स्वच्छता केली.

जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात 200 व्यावसायिकांचा सहकुटुंब सहभाग

निर्भीडसत्ता न्यूज –
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम हे अभियान सुरु करण्यात आले आहे. अभियानाचा आज (रविवार, दि. 8) 155 वा दिवस होता. शहरातील तब्बल २०० व्यावसायिकांनी सहकुटुंब या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

पुणे-लोणावळा लोकलचे तिकीट मोबाइलवर मिळण्याची सुविधा सुरू

मोबाइल अ‍ॅप तिकिटाच्या सुविधेचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आणखी 864 जणांचे स्वप्न साकारणार

पिंपरी - आर्थिक दुर्बल घटकांसाठी महापालिकेतर्फे चिखली येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०११ मध्ये काढलेल्या सोडतीमधील ८६४ जण प्रतीक्षा यादीत होते. त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ५० हजार रुपये स्वहिस्सा भरण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील नागरिकांचे घराचे स्वप्न आता साकार होणार आहे. 

पिंपरी - पदपथांवरील चायनीज स्टॉल


जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'वॉक फॉर गुड हेल्थ '

नवी सांगवी (पुणे) : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नाना काटे सोशल फाउंडेशन व समरीटन्स या सेवाभावी संस्थेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे आज सकाळी ' वॉक फॉर गुड हेल्थ ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नगरसेवक नाना काटे, रोझलँण्ड सोसायटीचे चेअरमन संतोश म्हसकर, आनंद दप्तरदार, नंदकुमार काटे, संदेश काटे, काळुराम कवितके यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

सांगवी दापोडी पुल ते एस.टी.कार्यशाळा रस्ता अंधुक प्रकाशात

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी दापोडीला जोडणारा पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुल ते दापोडी एसटी कार्यशाळा या परिसरात अंधारामुळे नागरीकांना रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. या रस्त्यावर रात्री नियमित रहदारी असते.जुनी सांगवी व परिसरातील कामगार, महिला या रस्त्यानेच कामासाठी पिंपरी, भोसरी व इतर भागात जातात. या परिसरातील पथदिवे जुने व पिवळ्या रंगाचे असल्याने याचा प्रकाश कमी पडतो.

शिक्षक वर्गीकरणात गोलमाल?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत 16 शिक्षकांना महापालिकेत वर्ग करुन घेण्यात आले आहे. प्रति शिक्षक पाच लाख रुपये भाव फोडून पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी आपले “हात ओले’ करत मोठा अपहार केल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

PMPML mulls hitech gates to stop illegal BRTS entries

PUNE: To improve the functioning of the Bus Rapid Transit System (BRTS) corridors in the city, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is thinking about installing electronic gates at the corridor entrances.

First employment convention: ‘Social sector needs better working style to succeed’

Social sector needs to learn and adopt the working style of corporates to succeed, said Deepak Valorkar, head of the Department of Social Work in Karve Stree Shikshan Sanstha. Valorkar was speaking at the first-ever employment convention organised by the Maharashtra NGO Federation at the Vidya Prasarak Mandal Hall in Model Colony on Sunday.

Pune: I’ve asked probe panel to speed up report on buses catching fire, says PMPML chairperson

Nayana Gunde took over as CMD of PMPML in February this year. She spoke to The Sunday Express about the issues that, according to her, need immediate attention as the transport body continues to be in news for the wrong reasons.

pmpml, pune buses, pmpml buses, pmpml chairperson, nayana gunde, pune news, indian express

पुणेकरांना हवेत काउंटडाउन टायमर

पुणे - लाल आणि हिरव्या दिव्यांतच काउंटडाउन टायमर बसवा म्हणजे वेगळा खर्च करण्याची गरज नाही, हॉर्न वाजवून उतावीळपणा करणाऱ्यांना टायमर दाखवून शांत करता येईल, शहरातील वर्दळीच्या किमान ६० चौकांत तरी सर्व बाजूच्या सिग्नलवर टायमर असावेत, असे अनेक उपाय सुचवीत वाहतूक नियंत्रक दिव्यांवर काउंटडाउन टायमर हवेच, असे पुणेकरांनी म्हटले आहे. 

वाळवणाच्या पदार्थांमुळे बटाटा तेजीत

मोशी - उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की महिलांची वाळवणांसाठी लगबग सुरू होते. सध्या त्यासाठी पोषक वातावरणही आहे. त्यामुळे बहुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे ‘होममेड’ वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, रविवारी (ता. ८) उपबाजारात आवक वाढून भाव तेजीत होते. क्विंटलला सतराशे ते अठराशे रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात तो प्रतिकिलो २५ रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात हेच भाव १० ते १२ रुपये किलो होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'अच्छे दिनची गाजर यात्रा'

नवी सांगवी (पुणे) : इंधन वाढ, पाणी प्रश्न, स्वच्छता व यासारख्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आय सांगवी पिंपळे गुरव परिसरात 'अच्छे दिनची गाजर यात्रा' काढण्यात आली. येथील साई चौकात दुपारी बाराच्या दरम्यान बैलगाड्यात घरगुती वापराचे सिलेंडर, दुचाकी, पाण्याचे हंडे, बरोजगार पदवीधर तरूण भजी तळतायेत असे चित्र उभे करून ही गाजर यात्रा निघाली. 

डोईफोडेंना कार्यमुक्‍त करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य शासन सेवेतील प्रतिनियुक्तीवर आलेले सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना दिलेली मुदतवाढ 31 मार्चला संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करुन, राज्य शासनाच्या सेवेत पुन्हा पाठवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

मोफत संस्कारवर्ग

पिंपरी : साने गुरुजी कथामाला, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या वतीने १२ ते १८ एप्रिल या कालावधीत इयत्ता पाचवी ते नववीच्या मुलामुलींसाठी मोफत संस्कारवर्ग घेण्यात येणार आहे. मोरवाडीतील कै. देऊबाई कापसे सभागृहात सकाळी १० ते १२.३0 या वेळात वर्ग भरेल. संस्कारवर्गात मुलांना देशभक्तीपर आणि समाजपरिवर्तनपर गीते, संस्कृत श्लोक, स्तोत्र, मंगलगीते, विनोद, संस्कारकथा, विज्ञानकथा, प्राणीकथा, महापुरुषांची व शास्त्रज्ञांची चरित्रे शिकवले जाणार आहे. प्रवेशासाठी ९३२५५०८७७८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.