Tuesday, 15 April 2014

प्रचाराचा आज शेवट

पिंपरी : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणसंग्रामात उन्हाच्या तडाख्यातही उमेदवारांनी मावळ मतदारसंघ ढवळून काढला. 
राजकीय नेत्यांच्या कडवट आरोप प्रत्त्यारोपाने वातावरण अधिकच गरम झाले आहे. ही तापलेली स्थिती मंगळवारी शांत होणार आहे. प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ६ ला थंडावणार आहेत. 

'लवासा नियमित होऊ शकते, तर गरीबांची बेकायदा बांधकामे का नाही ?'

उद्धव ठाकरे यांचा सरकारला खडा सवाल
काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांनी सत्ता भोग भोग भोगली. त्यातून स्वतःच्या घरावर सोन्याची कौले बसविली. आता गोरगरीबांच्या घरांवर नांगर फिरवायला निघाले आहेत. मात्र, शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे गोरगरीबांची घरे पाडाल तर याद राखा, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगवी येथे दिला. लवासा अधिकृत होत असेल तर सर्वसामान्यांची घरे का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

मावळ लोकसभा मतदार संघ संवेदनशील जाहीर करावा - मारुती भापकर

शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मावळ लोकसभा मतदार संघात दहशत असून हा मतदार संघ संवेदनशील म्हणून जाहीर करावा, अशी मागणी या मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात मारुती भापकर यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदार संघात शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे वास्तव्य करतात. त्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत व गुंडगिरी आहे.

गर्दीचा उठविला प्रचारासाठी फायदा

पिंपरी : कोपरा सभा, जाहीर सभा, पदयात्रा, प्रचार फेर्‍यांसाठी गर्दी जमविण्यासाठी नाना क्लृप्त्या अवलंबणार्‍या निवडणुकीतील उमेदवारांना सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे पिंपरी चौकात मोठा जनसमुदाय आयता उपलब्ध झाला. या गर्दीचा प्रचारासाठी फायदा उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध पक्षांच्या उमेदवारांच्या डिजीटल स्क्रिन असलेल्या व्हॅन पिंपरी चौकात मोक्याच्या ठिकाणी उभ्या होत्या. त्यावर प्रचार सुरू होता.

बारणेंची काळेवाडीत पदयात्रा

पिंपरी : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काळेवाडीत सोमवारी पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. तापकीरनगरमधून सुरू झालेली पदयात्रा पुढे जोतिबानगर, नढेनगर, कोकणेनगर, सहकार कॉलनी, विजयनगर, पंचनाथ चौक या परिसरात गेली. 

महामानवास उद्योगनगरीचे अभिवादन

पिंपरी - एससी, एसटी संघटना एचए कर्मचारी संघटना यांच्या वतीने महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. एचए कंपनीचे संचालक के. व्ही. वर्की, सरव्यवस्थापक के. पी. राजन, कार्मिक व्यवस्थापक टी. दास, नगरसेवक सद्गुरू कदम, नगरसेविका अमिना पानसरे, माजी उपमहापौर महंमद पानसरे, सुनील पाटसकर, ऑफिसर असोसिएशनचे शक्रुल्ला पठाण, लक्ष्मण रुपनर, धोंडिराज वारे, यू. के. गायकवाड, किरण सुवर्णा, एससी, एसटी संघटनेचे अध्यक्ष बी. बी. संकोनट्टी, राजेंद्र जाधव, मारुती बोरावके उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक यादव यांनी, प्रस्तावना फुलचंद जोगदंड यांनी केले. 
नालंदा मित्र संघ