Friday, 20 July 2018

एकाही ग्राहकाला नेट मीटर नाही

पुणे - गेल्या दोन वर्षांत शहरात पंधरा हजारांहून अधिक ग्राहकांनी सोलर सिस्टीम बसविली. परंतु यापैकी एकाही ग्राहकाला महावितरणकडून नेट मीटर पुरविण्यात आला नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. 

महापालिकेचे आता नागरी सुविधा सक्षमीकरण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. तसेच, आवश्‍यक कागदपत्रे मिळवण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे कमी व्हावेत. यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात किमान चार नागरी सुविधा केंद्र उभारण्याचे धोरण आखण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित केंद्र खासगी तत्त्वावर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

महानगरपालिकेच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे

पिंपरी-चिंचवड उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा संदर्भात अनेक अडचणी
मुस्लिम विकास परिषदेच्यावतीने मांडल्या समस्या

वीज दरवाढीस पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचा विरोध

महावितरणने वीज नियामक आयोगाला 3842 कोटी रु.ची तूट दाखवणारा दरवाढीचा प्रस्ताव सादर

पायाभूत सुविधांचे जाळे जुने झाल्याचा संघटनेचा आरोप

Staff to now be punished for bunking work: PCMC

After receiving several complaints from citizens and elected members regarding the unavailability of staff at ward offices during work hours, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued a circular, instructing all officers to not leave their seats without informing superiors.

More than 15 hours of darkness for PCMC residents as rain causes short circuit in sub-station

Rainfall over the last two days resulted in several hours of power cut in areas across the city, including Pimpri Chinchwad, on Tuesday. According to residents of Pimple Saudagar, they have been in the dark for nearly 24 hours since Monday.

PCMC,residents,darkness

सांगा, आम्ही कसे जगायचे?

पिंपरी - पाकिस्तानात राहत असताना तेथील दहशतवाद, अस्थिरतेने पाठ कधीच सोडली नाही. हिंदूंचा होणारा छळ हा कळीचा मुद्दा असल्याने आम्ही भारतात आलो. हिंदू असल्यामुळे भारताचे नागरिकत्व लगेच मिळेल, अशी खात्री होती. मात्र, नागरिकत्वाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे, अशी कैफियत पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदूंनी मांडत ‘सांगा आम्ही जगायचे कसे,’ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 

मतदार नोंदणीसाठी गृह निर्माण सोसायटी फेडरेशन करणार मदत

नवी सांगवी(पुणे) - पिंपरी चिंचवड को-ऑप हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवार ( ता. 18 ) रोजी महानगर पालिकेचे सह-आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप गावडे यांच्यासमवेत बैठक पार पडली. यावेळी गावडे यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना सोसायट्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरीता जागृती करुन मतदार नोंदणी अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन केले. फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही या राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याची शाश्वती दिली.

सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे धोरण लवकरच

नागपूर - सहकार कायद्यात सुधारणा करताना गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचे धोरण त्यात समाविष्ट करण्यात येईल, असे आश्‍वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.

१,२६४ सहकारी गृहनिर्माण संस्थांवर कारवाई?

दोन हजार ७०१ गृहनिर्माण सहकारी संस्थांपैकी १ हजार ३८५ संस्थांनी सन २०१६-१७ मध्ये लेखापरीक्षण केले आहे

तक्रारीसोबतच द्या ऑनलाइन कागदपत्रे

'महारेरा'च्या कार्यपद्धतीत मोठा बदल
वर्षानुवर्षे रखडणारे बांधकाम प्रकल्प आणि व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अस्तित्वात आलेल्या 'महारेरा'कडे तक्रार करणे आता अधिक सोपे झाले आहे. 'महारेरा'कडे तक्रार करण्यासंबंधीच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. त्यानुसार आता केवळ तक्रारच नव्हे तर, तक्रारीसोबत आवश्यक ती कागदपत्रेही ऑनलाइन पद्धतीनेच 'महारेरा'कडे पाठवता येणार आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे 'महारेरा'च्या कार्यालयात पोहोचवण्याची गरज आता उरणार नाही.

Day after announcing Rs 100 for ‘selfie with potholes’, Pimpri NCP receives 1000 pictures

A day after the Pimpri-Chinchwad unit of the NCP announced a reward of Rs 100 for anyone who clicks a ‘selfie with potholes’, the party has received over 1,000 pictures from across the region. Opposition leader in Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), Datta Sane, said on Wednesday that he has received around 1,000 such selfies so far. Three other NCP members have also received scores of pictures. “We will pay Rs 100 to each of these senders, as promised,” said Sane.

दांडीबहाद्दरांवर आता शिस्तभंगाची कारवाई

थम्ब करुन ’फिल्ड’वर जाण्याच्या नावाखाली वैयक्तिक कामेमहापालिका आयुक्तांचा आदेश
पिंपरी-चिंचवड : वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता कामाला दांडी मारणार्‍या, हजेरीपत्रकावर सही करून अथवा थम्ब करुन ’फिल्ड’वर जाण्याच्या नावाखाली वैयक्तिक कामे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या दांडीबहाद्दरांवर निलंबन अथवा शिस्तभंगाची कारवाई करा, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केला.

निविदा मागे घेणार्‍या ठेकेदारास टाकणार आता काळ्या यादीत

स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन, रिंग करण्यासाठी चुकीच्या दराचे कारण देत, पहिले पाकिट उघडल्यानंतर निविदा मागे घेणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

सात महिन्यात एक किलो सोने जप्त, 23 गुन्ह्यांची उकल

पिंपरी-चिंचवड : चालू वर्षांमध्ये वाकड पोलिसांनी सात महिन्यात विविध गुन्ह्यांमधील 28 लाख 31 हजारांचे तब्बल 934 ग्रॅम सोन्याचे दागिने गुन्हेगारांकडून हस्तगत केले. या कारवाईमुळे विविध ठाण्यातील 23 गुन्हे उघडकीस आले आहेत. वाकड पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील अन्य ठाण्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.

आता स्कूलबस, भाजीपाल्याची कोंडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीचे आंदोलन संपते ना संपते तोपर्यंत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने चक्‍का जाम आंदोलनाची सुरुवात आजपासून होत आहे. स्कूलबस, भाजीपाला; तसेच इतर मालाची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टच्या वतीने देशभरात चक्‍काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरातील बहुतांश माल वाहतूकदार संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, मालक-चालक संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.   

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पहिली शिक्षण समितीची बैठक; महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ उपक्रम

कारगील विजय दिवस साजरा केला जाणार  
महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी ‘दप्तरविना शाळा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या दिवशी मास पी. टी, ग्रंथ प्रदर्शन, वाचन, व्याख्यान, कविसंमेलन असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या गुरूवारी (दि.19) झालेल्या पहिल्या सभेत अध्यक्षस्थानी प्रा. सोनाली गव्हाणे होत्या. पालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या 87, उर्दू माध्यमाच्या 14, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा आहेत. पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या एकूण 37 हजार 973 आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती वीस हजार झाडांची प्रत्यक्ष पाहणी करणार – विलास मडिगेरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदा 60 हजार झाडे लावण्यात येणार असून, त्यापैकी 20 हजार झाडे लावल्याचा दावा उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी केला. मात्र, त्या बाबतची सविस्तर माहितीचा आग्रह सदस्यांनी धरल्यानंतर अधिकार्‍यांची धांदल उडाली. त्यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत सादर कराव्यात अश्या सूचना समितीने दिल्या आहेत.
वृक्ष प्राधिकरण समितीची सभा गुरूवारी झाली.

पीएमपीएमएलकडून बस महापालिकेने खरेदी करण्याचा स्थायी समितीचा आयत्यावेळीचा निर्णय

पिंपरी चिंचवड महापालिकेचा पीएमपीएमएलकडून बस खरेदीची प्रक्रिया रखडली असून प्रवासांसाठी बस उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. त्यासाठी महापालिकेने बस खरेदी करून पीएमपीला द्याव्यात, असा निर्णय ऐनवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. मात्र, किती बसेसची खरेदी करावी, याचा उल्लेख केलेला नाही.

अप्रशिक्षित आहारतज्ज्ञांचा सुळसुळाट

शैक्षणिक पात्रता नसतानाही आहाराबाबत सल्ले

मांज्यात अडकलेल्या कावळ्याची झाली सुटका

अग्निशमन विभागाला मिळाले यश
पिंपरी : पतंगाच्या मांज्याला अडकलेल्या कावळ्याला जीवदान देण्यात संत तुकाराम अग्निशमन दलाला यश आले आहे. 50 फूट उंच नारळाच्या फांदीला अडकलेल्या मांज्यामध्ये मंगळवारी (दि. 17) सकाळपासून अडकलेला कावळा अग्निशमन दलाच्या मदतीने मांज्यातून मुक्त झाला.

४00 मुलांना शिफारसपत्रे

पिंपरी :औद्योगिक विकासासाठी जमिनीचे भूसंपादन केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना रोजगार मिळावा, म्हणून एमआयडीसीने गेल्या वर्षभरात चाकण, तळेगाव, रांजणगाव परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या ४00 मुलांना शिफारसपत्रे दिली आहेत. एमआयडीसीकडून शिफारसपत्रे देताना त्यामध्ये संबंधित युवकाची शैक्षणिक अर्हता तपासून त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे. 

अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर


भोसरी परिसरातील पाणीपुरवठा आज बंद

पिंपरी - जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी भोसरी गावठाणासह इतर परिसरात पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २०) सकाळी दहानंतर बंद ठेवला जाणार आहे. शनिवारी (ता. २१) पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्‍यता असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पिंपरीला पाणी देण्यास विरोध

टाकवे बुद्रुक - आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा योजना राबविण्यास आंद्रा धरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी  विरोध दर्शविला आहे. 

जैन साध्वी डॉ. चंदनाजी यांचा चिंचवडला मिरवणुकीद्वारे प्रवेश

पिंपरी - जैन साध्वी डॉ. चंदनाजी आणि डॉ. अक्षयज्योतीजी यांचा चातुर्मासानिमित्त चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये मिरवणुकीद्वारे प्रवेश झाला. मिरवणूकीत जैन बांधव पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होते.