Monday, 15 January 2018

PCMC wants to merge 9 villages

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will seek the merger of nine villages, including the Rajiv Gandhi Information and Technology (IT) Park spread in Hinjewadi, Maan and Marunji, into its limits.
The civic body will urge the Pune divisional commissioner to recommend to the state government the merger of these villages into its limits, Prakash Thakur, deputy director, town planning, PCMC, told TOI.

“स्वच्छ’ स्पर्धेचा निकाल जाहीर

पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्व्हेक्षणात कायम टिकून राहण्यासाठी महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ हॉटेल्स, शाळा, रुग्णालय, गृह निर्माण संस्था, मोहल्ला मार्केट, मंडई अशा सहा गटांमध्ये स्पर्धेत सहा गृह निर्माण संस्था, पाच शाळा, सहा हॉटेल्स, तीन रुग्णालयांनी प्रथम क्रमांक मिळवला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल ठरण्यासाठी महापालिकेने हॉटेल, शाळा, रुग्णालय, गृह निर्माण संस्था, मंडई यांना सहभागी करून घेतले. त्यामध्ये परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता ऍप डाऊनलोड हे निकष ठेवण्यात आले होते.

‘पवने’तून २५० ट्रक जलपर्णी काढली

संक्रातीच्या दिवशीही रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे पवनामाईची स्वच्छता करण्यात आली. सलग ७१ व्या दिवशी पवना नदी पात्रातून २५० ट्रक जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली; तर रविवारी झालेल्या उपक्रमामध्ये पाच ट्रक जलपर्णी काढली आहे.

पुण्यातील विमान प्रवाशांची संख्या तीनच वर्षांत दुप्पट!

लोहगाव विमानतळावर विमानांच्या उड्डाणांसह मागील तीन वर्षांत प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

व्यसनाच्या जाळ्यात तरूणाई; पोलिस यंत्रणा सुस्त

पिंपरी - तरुणांमधील व्यसनांचे वाढते प्रमाण हे फॅशन म्हणून अधिक आहे. दारू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड व पुण्यातही याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सरकार, सामाजिक संस्था, प्रशासन व आपण सर्वांनी सामाजिक भान राखून हे वेळीच सावरायला हवे.

नियोजन प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग हवा - किरण गित्ते


पवना धरण परिसरातील “कृषी पर्यटना’वर “संक्रांत’?

  • मावळातील व्यवसाय धोक्‍याच्या वळणावर
पिंपरी – सोळा मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून पाळला जातो. या धरर्तीवर राज्य शासनाने 16 मे रोजी कृषी पर्यटन दिन साजरा केले जाणार आहे. विभागीय कार्यालयामार्फत कृषी पर्यटन कार्यशाळेची नावनोंदणीही सुरू झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित अर्थातच मार्ट. राज्यात “मार्ट’मार्फत कृषी पर्यटनाला चालना दिली जात असताना मावळ तालुक्‍यातील पवनाधरणकाठच्या कृषी पर्यटन केंद्र चालवणाऱ्यांना धरण प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कृषी पर्यटनाला “मार्ट’कडून मिळणाऱ्या पाठबळाला अतिक्रमणाच्या नावाखाली स्थानिक प्रशासन खीळ घालतेय का ? असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे. मावळातील कृषी पर्यटनाबाबत घेतलेला मागोवा…

पिंपरीत `खासदार दादा आणि आमदार दादा' यांच्यात पुन्हा जुंपली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते कामातील कथित नव्वद कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरून शिवसेनेचे दादा (शहराचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील) यांनी भाजपच्या दादांना (भोसरीचे आमदार महेश लांडगे) यांना काल (ता.13) पुन्हा डिवचले. त्यामुळे या दोन दादांत पुन्हा संघर्ष होऊ घातला आहे. त्याला आमदार दादांनी कालच त्वेषाने प्रतिउत्तर देत या नव्या लढाईला पुन्हा तोंड फोडले आहे. 

[Video] शिवसेनेची भाजपवर डरकाळी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे 11 महिने कामकाज करीत असताना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी यांनी 425 कोटी रुपयांच्या विकास कामामध्ये तब्बल 90 ते 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आज शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील,श्रीरंग आप्पा बारणे,शहराध्यक्ष,राहुल कलाटे, सुलभा उबाळे यांनी पिंपरीतील घरोदा येथे पत्रकार परिषद घेउन केला यावेळी अनेक सेनेचे नगरसेवक,व पदाधिकारी उपस्थित होते.

गटनेत्यांमुळे मनसेच्या प्रतिमेला धक्‍का

पिंपरी – दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा उचलून मुंबईतील परप्रांतियांना घाम फोडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड शहरातील अस्तित्व संपत चालले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मनसेचा एकच नगरसेवक असल्याकारणाने पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना पक्षाचे सर्वाधिकार बहाल केले. मात्र, या नगरसेवकाकडून हे अधिकार धाब्यावर बसविले जात असल्याने पक्षासह ठाकरेंच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी खांद्यावर असताना हा नगरसेवक मात्र, सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून “मांडवली’ करत असल्याची चर्चा आहे. त्याचा फटका पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची भिती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत