http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34112&To=7
गॅस शवदाहिनीचा प्रस्ताव मंजूर
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे रोटरी क्लबने दिलेला गॅस चलित शवदाहिनीचा प्रस्ताव आणि स्टेशन भागातील मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टच्या मालकीच्या जागेस संरक्षक भिंत बांधण्याच्या ठरावांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनेनुसार दोन्ही ठरावांतील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 24 October 2012
खंडेनवमीनिमित्त औद्योगिक नगरीत यंत्रपूजा
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34109&To=5
खंडेनवमीनिमित्त औद्योगिक नगरीत यंत्रपूजा
खंडेनवमीनिमित्त पूजेसाठी औद्योगिक नगरीत उत्साह संचारला असून शहरातील सर्वच कारखान्यात यंत्राची पूजा करण्यात आली. यंत्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्यात आली.

Now, get SMS alerts on traffic jams
Now, get SMS alerts on traffic jams: Citizens will get free alerts and advisories on traffic through SMSes.After a gap of two years, the traffic police will relaunch the service on October 24
Two killed in road accidents at Bhosalenagar, Nigdi
Two killed in road accidents at Bhosalenagar, Nigdi: Two persons, including a 50-year-old woman, died in separate accidents in the city on Sunday.The first incident took place at Bhosalenagar around 2.30 am.
राज्यात २४ टक्के दुधात पाणी
राज्यात २४ टक्के दुधात पाणी: महाराष्ट्रात २३.९४ टक्के दुधात चक्क ‘पाणी’ आढळल्याची माहिती पुढे आली आहे आणि एक टक्का दूध भेसळयुक्त आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारत पाच लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. देशातील ६८ टक्के दूध अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निकषांची पूर्तता करत नसल्याची माहिती अलीकडेच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली होती.
‘साहेब’ म्हणतात, पाण्याचे राजकारण ...
‘साहेब’ म्हणतात, पाण्याचे राजकारण ...:
पिंपरी / प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
पाण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातील अधिवेशनात केले. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी पालिकेनेच पक्षीय राजकारणातूनच आळंदीला पिण्यासाठी पाणी देण्यास स्पष्टपणे नकारघंटा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कथनी व करणीतील फरक उघडपणे दिसून आला आहे.
Read more...

चिंचवडमध्ये भरणार ‘महाराष्ट्राची जत्रा’
चिंचवडमध्ये भरणार ‘महाराष्ट्राची ...:
१५० बचत गटांचा सहभाग
पिंपरी / प्रतिनिधी
पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर यशस्विनी सामाजिक अभियान व सुनेत्रा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १२ नोव्हेंबपर्यंत चिंचवडला ‘महाराष्ट्राची जत्रा’ हे राज्यस्तरीय बचत गट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरणार आहे.

‘सोनं’ तोडल्यास गुन्हा!
‘सोनं’ तोडल्यास गुन्हा!: पुणे। दि. २२ (प्रतिनिधी)
विजयादशमी च्या दिवशी सोने म्हणून कांचन वृक्षाची फांदी तोडल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो. दसर्याच्या पार्श्वभूमीवर या वृक्षाची होणारी अनधिकृत तोड रोखण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला असून फांद्या तोडताना कोणी आढळून आल्यास संबधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
दसर्याच्या निमित्ताने नागरिकांकडून एकमेकांना आपटयाच्या पानांचे सोने म्हणून एकमेकांना दिले जाते. यासाठी अनेकदा आपल्या परिसरातील कांचनवृक्षाच्या फांद्या मोठया प्रमाणावर तोडल्या जातात. हे रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था व नागरिकांनी अशी वृक्षतोड निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ संबधित पोलीस ठाणे अथवा ९९२३0५0६0७ या क्रमांकावर एसएमएस पाठवावेत अशा सूचना उद्यान विभागाने केल्या आहेत.
आपटयाची पाने न वाटता त्या झाडांचे रक्षण करण्याची शपथ मुक्तांगण शाळेतील विद्यार्थ्यांनी आज घेतली. आपटयाच्या वृक्षाखालीच उभे राहून विद्यार्थांनी हा संकल्प सोडला. नेस्ट या संस्थेच्यावतीने या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते.

पिंपरी-चिंचवड पालिकेचा अवांतर निर्णय रद्द
पिंपरी-चिंचवड पालिकेचा अवांतर निर्णय रद्द: - महापालिका विषयांतर करून ठराव मंजूर करू शकत नाही
मुंबई। दि. २२ (विशेष प्रतिनिधी)
सर्वसाधारण सभेच्या पूर्वनिर्धारित विषयत्रिकेच्या बाहेर जाऊन महापालिका कोणताही ठराव मंजूर करू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन वर्षांपूर्वी असेच विषयांतर करून मंजूर केलेला ठराव रद्द केला आहे. परिणामी शहराच्या विकास नियंत्रण निमावलीत (डीसी रुल्स) सुधारणा करणे आणि ‘बीआरटीएस कॉरिडॉर’मध्ये ‘टीडीआर’ वापरून केल्या जाणार्या बांधकामांसाठी आकारायच्या शुल्कात कपात करणे हे त्या ठरावाहव्दारे घेण्यात आलेले निर्णय तसेच त्या अनुषंगाने करणयात आलेली पुढील कारवाईही बेकायदा ठरून रद्द झाली आहे.
महापालिकेच्या २0 ऑगस्ट २0१0 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ९८७ अन्वये हे निर्णय मंजूर करण्यात आले होते. सभेच्या मूळ विषयपत्रिकेत या विषयांचा समावेश नव्हता. त्यामुळे विषयपत्रिकेच्या बाहेर जाऊन मंजूर करण्यात आलेला ठरावातील हा भाग बेकायदा ठरवून रद्द केला जावा यासाठी सीमा सावळे या नगरसेविकेने रिट याचिका केली होती. न्या. अजय खानविलकर व न्या. आर. वाय. गानू यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर केली व वरीलप्रमाणे निकाल दिला. या ठरावाच्या अनुषंगाने ‘डीसी रुल्स’मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता व सरकारने त्यावर जनतेकडून हरकती व सूचना मागविणारी जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मूळ ठरावातील या निर्णयांसंबंधीचा भागच आता रद्द झाल्याने त्या अनुषंगाने केली गेलेली ही पुढील कारवाईही बाद झाली आहे.
हा ठराव मंजूर झाला होता तरी माहापालिकेने गेल्या दोन वर्षांत कोणालाही‘बीआरटीसी कॉरिडॉर’मध्ये ‘टीडीआर’ वापरून बांधकामास परवानगी दिलेली नाही अथवा त्यासाठी कमी केलेल्या दराने शुल्कही अकारलेले नाही. हे निर्णय रद्द करण्याचा निकाल न्यायालयाने
जाहीर केल्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यास सहा आठवडे स्थगिती देण्याची विनंती महापालिकेच्या वकिलाने केली. परंतु ती मान्य न करता महापालिकेने स्वत:च या निर्णयांच्या बाबतीत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवावी, असे सांगितले.
महापालिकेच्या २0 ऑगस्ट १0 च्या सभेसाठी ठरलेल्या विषयपत्रिकेतील प्रस्तावित ठराव सर्व्हे क्र. ३४४, ३४५ व ३४६ मधून जाणार्या १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचा मार्ग ठरविणे व मंजूर विकास आराखड्यातील बगिचा, सांस्कृतिक केंद्र व ग्रंथालय यासाठींची आरक्षणे अन्यत्र हलविणे एवढय़ापुरताच र्मयादित होता. मात्र सुरुवातीस तहकूब झालेली सभा पुन्हा भरल्यानंतर या मूळ विषयाच्या बाहेर जाऊन डीसी रुल्समधील बदल, टीडीआरचा वापर आणि शुल्क आकारणी या सर्वांसह ठराव क्र. ९८७ मंजूर करण्यात आला. न्यायालयाने म्हटले की, सभांसंबंधीचा कायदा व नियम पाहता महापालिका विषयपत्रिकेच्या बाहेर जाऊन अन्य विषयांवर निर्णय घेणे तर सोडाच पण चर्चाही करू शकत नाही. महापौरांनी सभेचे संचालन करताना या नियमाचे पालन करणे गरजेचे होते, असे ताशेरीही खंडपीठाने मारले.

मनपाचे उलटे धोरण
मनपाचे उलटे धोरण: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)
टपरीधारक, पथारी, हातगाडीवाले यांच्या पुनर्वसनाचे केंद्र शासनाचे धोरण असताना, त्याची अंमलबजावणी न करता, या छोट्या व्यावसायिकांना त्रास देण्याचे धोरण पिंपरी-चिंचवड महापालिका राबवत आहे, असा आरोप करून खासदार गजानन बाबर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपाने चुकीच्या पद्धतीऐवजी शासनाच्या धोरणाशी सुसंगत काम करावे, असे प्रभारी आयुक्त अनुपकुमार यांना सांगितले.
डिसेंबरपर्यंत हॉकर्सबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी करावी, असे केंद्राला अपेक्षित आहे. युद्धपातळीवर हे काम करणे आवश्यक असताना मनपाने मात्र टपरीधारक, पथारी, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. हातगाड्या जप्त केल्या जातात, टपर्या उचलून नेल्या जातात. मालाची नासधूस केली जात आहे, असे उलटे धोरण राबविले जात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या नेमक्या धोरणाची जाणीव
करून देण्यासाठी शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.

बाजारपेठा फुलल्या
बाजारपेठा फुलल्या: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)
तमाम शहरवासीयांना दसर्याचा मनमुराद आनंद मिळवून देण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. ‘हर्षाचा सण दसरा करा आनंदात साजरा’ असा संदेश देत त्या ग्राहकांना खरेदीसाठी खुणावू लागल्या आहेत. अष्टर, झेंडू यांसारख्या फुलांच्या दरवळाने बाजारपेठांचा परिसर मोहरून गेला आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा मोठा मुहूर्त आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी केलेली खरेदी धनसंचयाचा आनंद देते अशी समाजमनाची भावना आहे. म्हणूनच सोने-चांदीचे दागिने, नवीन वास्तू, दुचाकी, अलिशान मोटारींच्या खरेदीसाठी आवर्जून दसर्याची प्रतीक्षा केली जाते. अशा नवनवीन वस्तू घरी घेऊन येण्यासाठी नागरिक आतुरले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्याधुनिक मोबाइल यांसारख्या नवनव्या वस्तूंच्या खरेदीचा सुखसोहळा नागरिकांना अनुभवता यावा, यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. महागाईने होरपळलेल्या ग्राहकांच्या चेहर्यावर थोडे हसू उमलावे यासाठी सवलती, लकी ड्रॉ यांसारख्या योजना देऊन विक्रेते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, चिखली, खडकी, सांगवी परिसरांत बाजारपेठा असून तेथे आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण पहावयास मिळत आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रोषणाई, आकर्षक योजनांची माहिती देणारी पत्रके व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यात आली आहेत.
औद्योगिक नगरीत खंडेनवमीच्या निमित्ताने लहान मोठय़ा सर्व कंपन्या, दुकाने आदी ठिकाणी यंत्रसामग्री आणि नित्यपयोगी उपकरणांची पूजा होणार असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी सोमवारी नागरिकांची गर्दी होती. झेंडूच्या फुलांचीदेखील मोठय़ा प्रमाणावर आवक झाली आहे. बाजारपेठांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा केशरी आणि पिवळ्याधमक फुलांचे ढिगारे दिसू लागले आहेत. आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पाने, नारळ, गजरा आणि पूजेचे अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांची पावले बाजारपेठांकडे वळू लागली आहेत. ३0 ते ७0 रुपये किलो याप्रमाणो झेंडूच्या फुलांची तर १५0 ते २00 रुपये किलो दराने अष्टरच्या फुलांची विक्री होत आहे. याखेरीज दसर्याला मोठय़ा प्रमाणावर मिठाईचे वाटप केले जात असल्याने हे विक्रेतेही ग्राहकांच्या स्वागतासाठी सजली आहेत.

CSR meet held at Hinjewadi to bring corporates together
CSR meet held at Hinjewadi to bring corporates together: PUNE: Employees of IT companies in Hinjewadi will be more than happy to keep their private vehicles at home and take the public transport if the service is frequent and comfortable.
Subscribe to:
Posts (Atom)