Monday, 10 September 2018

शहर परिवर्तनामुळे कोणाचे उखळ पांढरे?


E-classroom project cost hiked to Rs 40cr

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Smart City Ltd (PCSCL ..

PCMC hires firm to repair BRTS shelters

Pimpri Chinchwad: A private agency has been appointed to rep ..

Metro work on Khadki stretch: Shiv Sena MP to take up issue with Delhi

Shiv Sena’s Maval MP Shrirang Barne has decided to take up the issue of Pune Metro work getting stuck on the Khadki stretch. “I had no clue that the work had halted…. I will take it up with the defence ministry,” Barne told The Indian Express paper on Sunday.

चिंचवडमधील नदीलगतच्या रस्त्याचे भूसंपादन

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जुन्या हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील (डीपी) चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक 51 पासून पवना नदीलगतच्या सर्व्हे क्रमांक 47 व 48 पर्यंतच्या 45 मीटर रस्ताचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे डांगे चौक ते निगडीपर्यंत  वाहतूकसुलभ होणार आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाचा व नुकसान भरपाईच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती सभेपुढे आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान वीस दिवस ब्लॉक

10 ते 30 सप्टेंबरदरम्यान दररोज तीन तास होणार विविध तांत्रिक कामे

पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ब्लॉक घेण्यात येणार आहे. 10 ते 30 सप्टेंबरदरम्यान दररोज तीन तास हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

4 हजार 302 वाहनांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 4 हजार 302 वाहनांवर 23 दिवसात कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकावर चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सरसावली असून त्यानुसार शहरातल्या प्रत्येक मुख्य चौकात ही कारवाई केली जात आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या टपर्‍यांवर हातोडा

शिवाजी चौकात सकाळपासून जोरात कारवाई
हिंजवडी : हिंजवडीतील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या हिंजवडीतील रस्त्यांवरील टपर्‍यांवर पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)ने हातोडा चालविला आहे. आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रस्त्यावरील टप-यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला जात आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सध्या चर्चेत आहे. वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक देखील सुरु केली आहे. रस्त्यावरील टपर्‍यांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

रस्ते बंदीबाबत नवे धोरण

देशभरातील ६२ कँटोन्मेंटमधील रस्ते बंदीसंदर्भात संरक्षण मंत्रालयाने नवे धोरण जारी केले आहे. त्यानुसार, लष्कर परिसरातील नागरिकांकडून हरकती-सूचना मागविल्याशिवाय आणि संरक्षण मंत्रालयाची पूर्वसंमती घेतल्याशिवाय स्थानिक लष्करी प्रशासनाला कँटोन्मेंटमधील कोणतेही रस्ते बंद करता येणार नाहीत.

पिंपरी-चिंचवडमध्ये बोअरवेलमधून पाण्याऐवजी येतंय पेट्रोल

पिंपरी-चिंचवड : पेट्रोलचे दर मागील काही दिवसांपासून गगनाला भिडले असल्याने सामान्यांना त्याची झळ बसत आहे. विरोधकांनी अनेक आंदोलने करुनही काहीही फरक पडला नसून दरवाढीवर नियंत्रण आलेले नाही. असे असतानाच एक आश्चर्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना पेट्रोलच्या बाबतीत अच्छे दिन आले आहेत. याचे कारण म्हणजे शहरातील डुडळगाव येथे चक्क बोअरवेल पाण्याऐवी पेट्रोल येत आहे. आता हे असे कसे काय याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर तांत्रिक बिघाडामुळे हे झाले आहे. या अनोख्या गोष्टीमुळे गावकऱ्यांमध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांचा यावर्षी धार्मिक देखाव्यांवर भर असल्याचे दिसत आहे. नृसिंह अवतार, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन, स्वामी समर्थ लीला, अशा विविध विषयांवर देखावे केले जाणार आहेत.

सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठा सजल्या

पिंपरी-चिंचवड:लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या-छोट्या दिव्यांच्या माळा, प्लॅस्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध प्रकार एक ना अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत

शहरात स्वाईन फ्लूसंदर्भात नियोजनात्मक जनजागृती करा

खासदार अमर साबळे यांचे आरोग्य विभागाला सूचना
पिंपरी : स्वाईन फ्लू हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार केल्यास तो निश्‍चित बरा होतो. एच 1 एन 1 या विषाणुमुळे हा आजार पसरतो. साधा फ्लू व स्वाईन फ्लू यांची लक्षणे एकसारखीच असल्याने स्वाईन फ्लू आजाराची त्वरित निदान करून त्यावर वेळीच उपचार केले जात नाही. त्यामुळे हा आजार वाढून नियंत्रणात आणण्यास अवघड होते आणि अशा रूग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सार्वजनिक ठिकाणी जसे शाळा, महाविद्यालय, कंपनी, कार्यालय यामध्ये स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करावी

शरद पवारांनी हिंजवडीप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा काढावा

नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली मागणी
हिंजवडी : हिंजवडी येथे आयटी पार्कमध्ये आणि परिसरामध्ये रोजच वाहतूक कोंडी होत असते. पीएमपीएमएलच्या बस, स्थानिक रहिवाश्यांची वाहने, कंपन्यांंच्या गाड्या, कर्मचार्‍यांच्या खासगी गाड्या तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या मोठ्या गाड्या या सर्वांमुळे या वाहतूक कोंडीमध्ये वाढ होते आहे. अनेकदा पोलीस खात्याला निवेदन देऊनही काही उपाय योजना झाली नाही. मात्र नवीन पोलीस आयुक्तालय झाल्यावर आयुक्तांनी चक्राकार वाहतूक सुरू केली आहे. तसेच कर्मचार्‍यांना आणि रहिवाश्यांना या वाहतूक कोंडीवर आपली मते आणि सुचना मागवल्या होत्या. त्यामुळे शरद पवार यांनी या वाहतूक कोंडीवर प्रभावी व दीर्घकालीन तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे व शिष्टमंंळाने निवेदनाद्वारे केली. यावेळी हिंजवडी ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच सागर साखरे, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आपली मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव भारती यांनी केली देहूनगरीची पाहणी

देहुरोड – राज्यातील वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थानातील स्थानिक नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्‍न आणि विविध विकासकामांची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकांत भारती यांनी देहूनगरीला भेट देऊन पाहणी केली.