Saturday, 3 March 2018

'शंभर रुपये पाणीबिलाचा निर्णय चुकीचा'

पिंपरी - ""मीटरनुसार पाणीपट्टी भरणाऱ्या कुटुंबांना दरमहा किमान शंभर रुपये बिल आकारण्याचा निर्णय चुकीचा असून, तो रद्द करावा,'' असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना शुक्रवारी स्पष्ट केले. किमान बिलआकारणीमुळे कमी पाणी वापरणाऱ्या नागरिकांना दिलेली सवलत मिळणार नाही, त्यांना विनाकारण जादा रक्कम भरावी लागेल, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले. या संदर्भात त्यांनी महापौर नितीन काळजे यांना कळविले आहे. 

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ पाट्या लावण्याचे धोरण पिंपरी पालिकेने गुंडाळले

पिंपरी : विद्यमान; तसेच गत टर्ममधील नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या नावाची फक्त एकच पाटी लावण्याचा विषय पिंपरी पालिकेने दफ्तरी दाखल केला आहे. "आता पिंपरी पालिकाच लावणार आजी, माजी नगरसेवकांच्या नावांच्या पाट्या' या हेडिंगखाली नुकतेच (ता.27) "सरकारनामा'ने वृत्त व्हायरल केले होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोचणार असल्याचे या बातमीत म्हटले होते. त्याची दखल घेत पालिकेतील सत्ताधारी भाजपने नुकत्याच (ता.28) झालेल्या पालिका सभेत हा विषय मंजूर न करता तो दफ्तरी दाखल करण्यात आला.

…तर भाजपच्या पराभवाची सुरूवात “उद्योगनगरी’तून?

सन्मानाची वागणूक मिळेना : "राम-लक्ष्मण' गटांतील अस्वस्थता शिगेला!

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात घुसून भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेत मिळवलेला विजय ऐतिहासिक मानला जातो. “पीसीएमसी’तील पराभव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अक्षरश: खचली होती. परंतु, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत याच “उद्योगनगरी’तून राज्यातील भाजपच्या पराभवाची सुरूवात होईल, असे भाकीत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

पिंपरी स्थायीचा अध्यक्ष जगताप समर्थक होणार, की लांडगे समर्थक ? 

पिंपरी : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याचा फैसला उद्याच होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी तीन ते पाच अशी अर्ज दाखल करण्याची वेळ व मुदत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून एकच अर्ज दाखल करून ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची औपचारिकता व अध्यक्षांची घोषणा सात तारखेला स्थायी समितीच्या विशेष सभेत होणार आहे.

PCMC seal on development projects worth Rs 565 crore

PIMPRI CHINCHWAD: The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation approved development works costing Rs 565 crore on Wednesday.
The works include building 2,376 affordable houses at Charholi and Ravet at an expenditure of Rs 220.75 crore. The waste-to-energy project at Moshi, costing Rs 208 crore, was also approved at the meeting.

Civic amenities get a land boost

PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has acquired land within the old and new city limits after negotiations with private property owners.

पायाभूत सुविधांपासून बस स्थानके दूरच

पुणे - पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था, वेळापत्रक आदी किमान पायाभूत सुविधा शहर परिसरातील 75 पैकी अवघ्या 16 बस स्थानकांवर उपलब्ध असल्याची कबुली पीएमपी प्रशासनाने माहिती अधिकाराअंतर्गत नुकतीच दिली आहे. 

पर्यावरणपूरक रंगात रंगली धुळवड

पिंपरी – पर्यावरण पूरक रंगांचा वापर तसेच पाण्याची बचत करत पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले.

आष्टीकरांच्या पाटीमुळे लाभार्थी संभ्रमात

पिंपरी – महापालिकेच्या नागर वस्ती विकास योजना विभागाचा पदभार डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडून घेतला आहे. स्मिता झगडे यांनी तो कार्यभार संभाळला आहे. परंतु अद्यापही सहाय्यक आयुक्‍तांच्या केबिनवरील तात्कालीन सहाय्यक आयुक्‍त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या नावाची पाटी हटवण्यात आली नाही. त्यामुळे योजनांची माहिती घेण्यासाठी येणारे नागरीक बुचकाळ्यात पडत आहेत. बाहेर पाटी साहेबांच्या नावाची आणि आत खुर्चीवर मात्र मॅडम दिसत असल्याने नागरीक संभ्रमात पडत आहेत.

मटण, मासळी, चिकनवर ताव

धुळवडीच्या दिवशी मासळी, मटण तसेच चिकनला खवय्यांकडून मोठी मागणी राहिली.

पावणे दोन लाख वाहने "सीएनजी'वर

पुणे - शहरातील सुमारे पावणे दोन लाख वाहने सीएनजी या इंधनावर चालतात. गेल्या दोन वर्षांत या इंधनाचा वापर वाढला आहे. साधारणपणे प्रति दिन साडेचार लाख किलो सीएनजी गॅसचा खप होत आहे. 

देहूत आज बीज सोहळा

देहू - जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा शनिवारी (ता. 3) आहे. त्यासाठी लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत. 

‘शिवनेरी’तर्फे उद्या राज्यसेवा मॉक टेस्ट

पुणे - राज्यसेवेत दाखल होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रविवारी (ता. ४) संपूर्ण राज्यात राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर मॉक टेस्ट होणार आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने होणारी ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची आहे. या टेस्टसाठी राज्यभरातल्या उमेदवारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

भारिपची शनिवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने

पिंपरी – भारिप बहुजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि.3) निगडी प्राधिकरणातील हवेली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिली.