Thursday, 12 July 2018

30% of Pimpri-Swargate Metro route construction in PCMC limits complete

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation has .. 

दहा हजार चारशे त्र्याहात्तर कुटुंबांना मिळाले वैयक्तिक स्वच्छतागृह

पिंपरी - महापालिका प्रशासनाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत जून अखेर 10 हजार 473 कुटुंबांना वैयक्तिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे शक्‍य झाले आहे. तर, 465 सामुदायिक स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात शहर हागणदरीमुक्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात सहाव्या क्रमांकावरून पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्याचे मोठे आव्हान कायम आहे. 

‘स्मार्ट सिटी’साठी केंद्रासह राज्याकडून 57 कोटी निधी

आजअखेर 84 कोटी मिळाले
पिंपरी-चिंचवड : शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात येणार्‍या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 57 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा 32 कोटी आणि राज्य सरकारचा 16 कोटीचा निधी आहे. तर, आजपर्यंत एकूण 84 कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला असल्याची माहिती, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

PCMC to soon get 200 cycles under Smart City project

Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon get 200 new cycles under the Smart City bicycle-sharing initiative. In the first phase, they will be deployed in Pimple Saudagar and Pimple Gurav in August. Four companies — Pedl, Yulu, Mobike and Mobicyle — have shown interest in providing these cycles, with expenses to be taken care of by the Centre. Posh societies will provide parking spaces, as will parts around the local BRTS corridor. A PCMC official said, “We had been planning to execute this for quite some time and hope it will be a success, now that many people in Pune are responding well to the initiative. The bikes will be deployed around Independence Day and more can be expected in coming months.” — PMB

पुनरुत्थान गुरुकुलम मधील विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून लोकसभाध्यक्षा गेल्या भारावून!

पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील चापेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येणा-या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील १५ वा अध्याय न अडखळता वाचून दाखविला. तसेच मुलांचे लाकडी कोरीव काम, धातू काम पाहून महाजन भारावून गेल्या. त्यांनी  गुरुकुलमच्या कार्याचे कौतुक केले. 

रावेत बंधारा वाहू लागला!

चिंचवड : शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी मावळ परिसरात संततधार असल्याने नद्यांना पाणी वाढले आहे. यामुळे शहरातून वाहणारी पवना नदी खळखळून वाहू लागली आहे. हा पूर पाहण्यासाठी विविध ठिकाणी दिवसभर गर्दी असते. रावेत बंधार्‍याचे हे मनमोहक दृश्य.

वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि वृक्ष तोडा

चिंचवड : नुकताच जागतिक पर्यावरण दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. ‘असंख्य’ पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आणि 364 दिवस झोपलेल्या वृक्ष संवर्धन समितीने यात हिरीरीने भाग घेतला. ‘असंख्य’ संकल्प केले. दिवस आला, गेला…फलीत काय? हे पहा! चिंचवड येथील एसकेएफ कॉलनी समोरचे दृश्य!!

त्या पत्राशेड, भंगार दुकानांवर कारवाई करणार

आढळरावांच्या आरोपानंतर आयुक्तांनी घेतली भूमिका
पिंपरी-चिंचवड :मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले होते. ‘जीवाला घाबरून भोसरीतील अनधिकृत टपर्‍या आणि चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकानांवर आयुक्त कारवाई करत नाहीत’, असा आरोप त्यांनी केला होता. हे चांगलेच जिव्हारी लागल्याने पुरेसा पोलिस बंदोबस्त करून तात्काळ कारवाई करणार असल्याची भूमिका महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी मांडली.

पिंपरीच्या आमदार पुत्राने मध्यरात्री उड्डाणपूलावर साजरा केला वाढदिवस

उल्टा चोर कोतवाल को डाँटे…चुकीचे वर्तन तरीही मीच शिरजोर
प्रतिबंध केल्याने महिला पोलिस उपनिरीक्षकांवर खात्याकडून कारवाई
पिंपरी-चिंचवड : उल्टा चोर कोतवाल को डाँटे…असे म्हणण्याची वेळ एका महिला फौजदारावर आली आहे. कारण नाशिक उड्डाणपूलावर मध्यरात्री एक वाजता मित्र-मैत्रिणींसह दणक्यात वाढदिवस साजरा करणार्‍या पिंपरीच्या आमदार पुत्राला केवळ हटकल्याचे निमित्त झाले आणि खातेनिहाय कारवाईस सामोरे जावे लागले. शिवाय यापुढे लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट वर्तन करू नये, अशी सक्त ताकीदही मिळाली. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून पोलीस अधिकार्‍यांना अशा मानहानीकारक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याचे चर्चा पोलीस खात्यात सुरु आहे.

पदाधिकार्‍यांच्या मोबाईल सेवेसाठी सव्वाकोटीचा घाट

मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे
पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना महापालिकेतर्फे मोबाईल सिमकार्ड दिले जाते. त्याचे शूल्कही पालिका संबंधित कंपनीला अदा करते. या मोबाईल सेवेसाठी आगामी काळात 1 कोटी 25 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या मंजुरीने स्थायीसमोर मान्यतेसाठी आणला आहे.

आता स्थायीच्या तहकूबीचा ‘सिलसिला’ सुरू!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका सभा तहकूब करण्याचा विक्रम करणाऱ्या सत्ताधारी भाजपकडून आता स्थायी समिती सभा तहकूब करण्याचा ‘सिलसिला’ सुरू झालायं. आज होणारी स्थायीची बैठक आयुक्त नसल्याने तहकूब केली गेल्याचे स्थायी सदस्यांकडून सांगण्यात आले. पण त्यामागे वेगळेच कारण असल्याची कुजबुज पालिका वर्तुळात सुरू आहे.

“तो’ प्रस्ताव आयुक्‍तांपर्यंत आलाच नाही

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील काही ठराविक भागात बांधकामास मनाई केलेल्या स्थायी समितीचा ठराव आता महिना उलटूनही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापर्यंत कार्यवाहीकरिता पोचलेला नाही. अशा मंजूर सदस्य प्रस्तावांची कायदेशीर तपासणी करुन निर्णय घेऊ, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

शासन आदेशाला केराची टोपली

पिंपरी – महाराष्ट्र शासन नियोजन विभागाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तु स्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण, रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश असताना या शासन आदेशाला शिक्षण मंडळाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे थेट पद्धतीने होणाऱ्या शालेय साहित्य खरेदीला विरोध करत न्यायालयात जाण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

“त्या’ कंत्राटी कामगारांना न्याय कधी?

पिंपरी – कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम 20 जून 2018 पर्यंत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना कामगारांच्या हातात अद्याप काहीही पडले नाही. ज्या कामगारांनी काम केले आहे. त्याची यादी ठेकेदारांनी सादर करावी, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यावर येत्या मंगळवारी (दि. 17) सुनावणी होणार असून न्यायालयाच्या भुमिकेकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

जागा बळकावणाऱ्यांची टोळधाड

शहरात समाविष्ट झालेल्या गावांच्या गायरानांची अवस्था कोणीही यावे अन्‌ टपली मारून जावे अशी आहे. काल परवाचे उदाहरण पहा. चिखलीच्या जाधववाडीतील गायरानावर कब्जा करण्यासाठी झुंबड उडाली होती. कोण लोक; कुठून आले तपास नाही. त्यांनी रातोरात फक्की मारून, दगडी लावून तीन-चार गुंठ्यांचे भूखंड ताब्यात घेतले. काही महाभागांनी थेट बांबू, चटईच्या झोपड्या उभ्या केल्या. कोणीतरी तथाकथित सामाजिक कार्यकर्ता त्यांचा सूत्रधार होता. यापूर्वीही याच जागेबाबत असाच प्रकार झाला.

…अन्यथा आयुक्‍तांना खिळे भेट

पिंपरी – आंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत “खिळेमुक्‍त झाड’ हे अभियान गेले चार महिन्यापासून शहरात चालू आहे. शहरातील सर्वच स्तरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही झाडांवर अजूनही फ्लेक्‍स, बॅनर आणि खासगी क्‍लासच्या जाहिरातींमुळे झाडांचे विद्रुपीकरण सुरूच आहे. संस्थेने कारवाई करण्यासाठी आयुक्तांना निवेदनही दिले आहे. संबंधितांवर कारवाई होत नसल्याने गेल्या महिन्यात काढलेले सुमारे दहा हजार खिळे आयुक्‍तांना भेट देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महावितरण देणार वीज दरवाढीचा शॉक

पुणे - एकीकडे बेस्ट, टाटा आणि रिलायन्स कंपन्या वीजदर कपातीचे धोरण राबवीत असताना, दुसरीकडे महावितरणने मात्र महसुली उत्पन्नातील तोटा भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर मांडला आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी 5 टक्के, तर कृषीसाठी 35 टक्के, तर वाणिज्यसाठी सरासरी 15 टक्के इतक्‍या मोठ्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाची सुनावणी वीज नियामक आयोगापुढे होणार असून, त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे.

सव्वादोनशे सायकलपटूंची ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ वारी

पिंपरी - इंडो सायकलिस्ट क्‍लब (आयसीसी)तर्फे आयोजित यंदाच्या तिसऱ्या ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ सायकलवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वादोनशे सायकलपटूंनी दोन दिवसांत ४७० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तसेच, विठ्ठलाचे मनोभावे दर्शनही घेतले.  

बीआरटीतील मेट्रोच्या कामामुळे कोंडी

सेवारस्त्यावर दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी चालकांना लागतो अर्धा तास
पिंपरी - मेट्रोने पिलरच्या कामासाठी एम्पायर इस्टेट ते मोरवाडीदरम्यान बीआरटी मार्गालगत केलेले बॅरिकेटिंग, सेंट्रल मॉलसमोरील रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने, या कारणांमुळे सेवारस्त्यावरील वाहनचालकांना दोन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तास खर्च करावा लागत आहे. तीन महिन्यांपासून सुरू असणारा वाहतूक कोंडीचा त्रास काही केल्या नागरिकांची पाठ सोडताना दिसत नाही. 

Project delayed, PCMC imposes Rs 1-crore fine on private contractor

The Pimpri-Chinchwad Municipal Commissioner, Shravan Hardikar, has imposed a Rs one-crore fine on a contractor citing delay in the completion of the 24×7 water supply project, work on which had started in 2016. The fine, a civic official said, was one of the highest so far. An official with the PCMC water supply department said the contractor’s work included replacing old pipelines and setting up connections in 40 per cent of the township within a year, for which he would be paid Rs 207 crore.

165 civic staffers told to submit caste certificates in 15 days or lose jobs

AS many as 165 employees of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are facing the prospect of losing their jobs if they fail to submit their caste validity certificates within 15 days. Additional Municipal Commissioner Pravin Ashtikar said 165 PCMC employees from Class III and Class IV were asked to submit their caste validity certificates by April 27 this year. However, several extensions later, the civic body issued a final warning, asking its employees to submit the papers within 15 days or lose their jobs.

प्रभाग अध्यक्षांच्या हितासाठी अधिकार्‍यांवर अन्याय

दहा लाखांपर्यंतचे आर्थिक अधिकार देण्याचा दोन आठवड्यापूर्वी निर्णय
क्षेत्रीय अधिकारी कामकाजावर नाराज
पिंपरी-चिंचवड : दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय अध्यक्षांना दहा लाखांंपर्यंतचे आर्थिक अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्ताधार्‍यांनी प्रभाग अध्यक्षांसाठी आटापिटा करून त्यांना आर्थिक अधिकार देण्याचा विषय केला. मात्र अधिकार्‍यांना आर्थिक अधिकारापासून वंचित ठेवले. या अधिकार्‍यांना क्षेत्रीय कार्यालयात काम करताना आर्थिक अधिकार नसल्यामुळे ‘बिनपगारी फूल अधिकारी’ अशी नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे.

माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात वाढ

चार हजार ऐवजी मिळणार आठ हजार रुपये
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक शाळेत मानधन तत्वावर भरण्यात येणार्‍या शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे. हे मानधन चार हजार रुपये प्रतिमहावरून आठ हजार रुपये प्रतिमहा असे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात माध्यमिक शाळेसाठी मानधन तत्वावर भरण्यात येणार्‍या शिक्षकांना पालिकेकडून प्रतिमहा आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे.

नोंदणी विवाहासाठी ऑनलाइन नोटीस सक्तीची

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे

Make recreational halls, old age homes in residential complexes: Maharashtra govt to civic bodies

The Maharashtra government has issued directions to all its departments to undertake programmes and schemes for the welfare of senior citizens that include discount in property tax and making mandatory the construction of recreational halls in housing societies and old age homes in big residential complexes. The state government had prepared a draft for a senior citizen policy in 2004, which was approved by the state cabinet in 2013. Steps were finalised for its implementation, according to the recommendation of the committee for senior citizens, whose minimum age has been revised from 65 to 60 years. “The state government would be focussing on financial planning and health concerns of senior citizens, along with preparing them to handle stress,” said government official.