Thursday, 29 November 2018

पिंपरीत 1 डिसेंबरला ‘मिलान्ज एक्सपो’

एकाच छताखाली उत्पादक-व्यवसायिक संवाद साधणार
पिंपरी चिंचवड : बीएनआय ग्रुप यांच्या वतीने पिंपरी टो क्लस्टर येथे 1 आणि 2 डिसेंबरला ‘मिलान्ज एक्सपो’ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बीएनआयच्या पिंपरी चिंचवड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक देवानंद देशमुख यांनी दिली. यावेळी, स्नेहल कोठारी, मनोज अगरवाल, भारत दिघे, विनीत बियाणी आदी उपस्थित होते.

शहरातील विकासकामांसाठी 6 कोटी 66 लाखाच्या खर्चास मंजूरी

पिंपरी चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामांसाठी सुमारे 6 कोटी 66 लाख 42 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात मंगळवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. यामध्ये, प्रभाग क्र.12 मधील काळभोर नगर शाळा क्र.2/2 येथील सिमा भिंतीची उंची वाढविणे, पेव्हर ब्लॉक बसविणे यासह देखभालीची कामे करण्याकामी सुमारे 52 लाख 16 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी मिळाल्याची माहिती विलास मढेगिरी यांनी दिली.

MahaMetro to start overhead cable work on PCMC-Phugewadi section


'Citizen-friendly tweaks to Societies Act'


Top priority to check driving on wrong side: Pimpri police chief


महेश लांडगे म्हणजे झेपावणारा गरुड – सिंधूताई सपकाळ

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचले आहेत. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तरी ते सहन करायला हवेत. काट्यांचा केवळ बोचण्याचा गुणधर्म आहे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा बघून एक दिवस काटे सुद्धा बोचणं सोडतील आणि तेच एक दिवस प्रयत्नवादी असलेल्या महेश लांडगे यांची ‘महेश दादा सगळ्यांचा दादा’ अशी ओळख […]

One-way traffic movement eases congestion at Hinjawadi IT park


रावेत बंधार्‍याचे पालिकेकडून सर्वेक्षण

पिंपरी-चिंचवड महापालिका संपूर्ण  शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रावेत बंधारा येथून पवना नदीतून पाणी उपसा करते. या बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच, पाणीसाठा अधिक व्हावा म्हणून बंधार्‍याची उंची वाढविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पालिकेने बंधार्‍याचे सर्वेक्षण केले आहे. 

पालिकेच्या उर्दू शाळांत 38 शिक्षकांची कमतरता

शाळेच्या पटसंख्येसाठी आधीच बदनाम असलेल्या महापालिका शाळांमध्ये आता विद्यार्थी संख्या वाढत असताना शिक्षकांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. शिक्षक भरती नसल्यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या 14 उर्दू प्राथमिक शाळांमध्ये शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षकच नाहीत. त्यामुळे सध्या शाळांमधील शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्ग एकत्र करून शिकवावे लागत आहे.  शहरामध्ये उर्दू माध्यमाच्या एकूण 14 शाळा आहेत. यामध्ये संच मान्यतेनुसार 131 शिक्षकांची गरज असताना सध्या फक्त 93 शिक्षकच शिकविण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे 38 शिक्षक याठिकाणी कमी आहेत. 

‘होर्डिंग’च्या वाढीव खर्चाच्या ठरावाची अंमलबजावणी करु नका’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील 300 अनधिकृत फलक काढण्यासाठी तीन कोटीची वाढीव तरतूद केली आहे. प्रत्यक्षात अनधिकृत फलक धारकानेच फलक काढणे अपेक्षित आहे. तरीदेखील पालिका फलक काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. त्यामुळे सदस्य प्रस्तावाद्वारे फलक काढण्यासाठी तीन कोटीच्या वाढीव खर्चाच्या केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करु नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने […]

कचरा कोंडीमुळेच स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा कचरा; महापालिकेची कबुली

एमपीसी न्यूज – कचरा निर्मितीच्या ठिकाणीच कचरा विलगीकरण नाही. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणा-या ठिकाणाच्या तक्रारीची पुर्तता करण्यात अयशस्वी, सार्वजनिक शौचालयातून महसूल नाही. घनकचरा व्यवस्थापनानुसार वाहनामध्ये ‘ट्रॅकिंग’ सिस्टमचा अभाव आणि नागरिकांचा नकारात्मक प्रतिसाद यामुळेच स्वच्छ भारत सर्वेक्षण यादीत पिंपरी-चिंचवड शहराची घसरण झाल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रशासनाने […]

विद्युत समस्या सोडवा

पिंपरी चिंचवड : शहरातील विद्युत विषयक नागरिकांच्या समस्या संदर्भात महापौर राहुल जाधव यांनी शहरातील विद्युत विषयक समस्या सोडविण्याबाबत सुचना दिल्या.

कर्मचार्‍यांवर नव्हे तर अधिकार्‍यांवर कारवाई करा

पिंपरी चिंचवड : शास्तीकर व मिळकत वसुली निर्धारीत उद्दिष्ट वसुली न केल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागातील 88 कर्मचार्‍यांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई कर्मचार्‍यांवरच न करता त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देण्यात आले आहे.

PCMC floats tenders for Rs 1.86 crore project to repair old Harris Bridge

PCMC floats tenders for Rs 1.86 crore project to repair old Harris Bridge
Pimpri Chinchwad: Civic authorities have invited bids for the repair and rehabilitation of Harris Bridge in Dapodi.

हिंजवडीत चक्राकार वाहतूक कायमस्वरूपी

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी राबविण्यात येणारा चक्राकार वाहतुकीचा प्रयोग आता कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील अंतिम आदेश २७ नोव्हेंबर रोजी काढला आहे. हिंजवडीतील शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जॉमेट्रिक सर्कल चौक ते शिवाजी चौक या भागातील वाहतूक विनाअडथळा व्हावी, यासाठी चक्राकार वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 

‘एचए’ पुनर्वसनासाठी ८२१ कोटी

पिंपरी - गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एच.ए.) कंपनीला आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय रसायन मंत्रालयाने ८२१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कॅबिनेट कमिटी फॉर इकॉनॉमिक्‍स अफेअर्स (सीसीए) समोर अभिप्रायासाठी ठेवण्यात आला आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

इंद्रायणीची स्वच्छता युद्धपातळीवर

आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्राची युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. वारीसाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली असून, स्वच्छ वारी-प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प घेऊन हा सोहळा सुरळीत पार पाडणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली. 

शहर अभियंत्यांना “दणका’

पिंपरी- शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्या कार्यशैलीबद्दल दस्तुरखुद्द महापौर राहूल जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत, या प्रकरणाचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांना प्रशासन विभागाला दिले आहेत. दोन दिवसांत महापौर जाधव यांच्या आरोपांमधील तथ्य समोर येणार आहे.

सहा आठवड्यात पेट्रोल १२ रूपयांनी स्वस्त

चौफेर न्यूज – आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्याचा याचा फायदा भारताला झाला आहे. पेट्रोल- डिझेलच्या उत्पादनावरील खर्च कमी झाल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून कपात सुरु आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोल ४२ पैशांनी स्वस्त होऊन प्रति लिटर ७९.६२ रूपये आहे. सहा आठवड्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये १२ रुपयांनी तर डिझेलच्या दरांत १३.६४ रूपयांनी कपात झाली आहे. एकवेळ पेट्रोलच्या किंमतीने ९० चा आकडा पार केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना दिलासा मिळाला आहे.

Deprived of festival bonuses, 1763 PCMC sanitation workers voice their protests


Techies demand more buses to Hinjewadi

Nashik: The Information Technology (IT) professionals from t ..

पिंपरी चिंचवडमधील नाट्यगृहांचे आता ‘ऑनलाईन बुकिंग’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात असणाऱ्या नाट्यगृहांच्या तारखांवरून वाद होत असतात. ते टाळण्यासाठी नाट्यगृह बुकिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाणार असून, आॅनलाईन बुकिंग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहांच्या तारखांचा काळाबाजार थांंबणार आहे. नाट्यगृहांच्या आरक्षणाच्या तारखा आॅनलाइनद्वारे देण्याबाबत अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी पुढाकार घेतला आहे