पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी हॅरिस पूल ते मोरवाडी, पिंपरी असे पुणे मेट्रोचे अंतर होते. मात्र, रिव्हर्स लाईन व मेंटेनन्स लाईनसाठी मेट्रोची मार्गिका आणखी सुमारे 700 मीटरनी पुढे वाढविण्यात आली आहे. आता मेट्रो चिंचवडचा एम्पायर इस्टेट (मदर तेेरेसा) पूल ओलांडून जाणार आहे. त्यामुळे शहराला निगडीच्या दिशेने जाण्याच्या मार्गाची थोडी का होईना भेट मिळाली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 18 July 2018
महामेट्रोच्या जलद कृती दलाचे काम उत्कृष्टपणे सुरु
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन ची मार्गिका क्र.१ पीसीएमसी ते स्वारगेट आणि मार्गिका क्र.२ वनाज ते रामवाडी साठी दोन क्यूआरटी टीम महामेट्रोने तयार केल्या आहेत. महामेट्रोचे काम मार्गिका क्र.१ व मार्गिका क्र.२ येथे जलद गतीने सुरु असून नागरिक, पादचारी, वाहनचालक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरक्षित रहावी यासाठी महामेट्रोतर्फे जलद कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे जलद कृती दल मार्गिका क्र.१ चे दि.१५ डिसेंबर २०१७ आणि मार्गिका क्र.२ चे दि. २७ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यरत आहेत.
वाहतूक फेरबदलामुळे कोंडीत भर
हिंजवडी - नव्या पोलिस अधिकाऱ्याने मनमानी पद्धतीने केलेल्या प्रायोगिक फेरबदलामुळे आयटीयन्ससह स्थानिक वाहनचालकांना सोमवारी (ता. १६) दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
Dark clouds hang over cantonment existence, yet again
The Army seems keen to hand over civilian areas in the cantonment region to the civic bodies, say sources. However, the public mood on the cantonment area does not seem to second such a plan. Many believe that civic bodies like Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will add to the mess, as they themselves are struggling to take proper care of their jurisdictions. Some also opine that the central and state governments should provide fiscal assistance to implement development projects and make welfare schemes applicable to cantonment area, instead of abolishing the cantonment boards.
उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात
खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनात घट; मोठा आर्थिक फटका
पिंपरी - सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. महावितरणकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने उद्योजक तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
पिंपरी - सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. महावितरणकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने उद्योजक तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
सलग वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
पिंपरी - शहरातील पिंपळे सौदागर, विशालनगर, पिंपळे निलख, वाकड, थेरगाव या परिसरात महिन्यातून ५० ते ७५ तास वीज नसते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पलाश हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष किरण वडगम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
#MilkAgitation एक लाख लिटर दुधाचा तुटवडा
पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या दूध आंदोलनाचा मंगळवारी (ता. १७) शहराच्या दूधपुरवठ्यावर परिणाम झाला. शहराला एक लाख लिटर कमी दुधाचा पुरवठा झाल्यामुळे काही भागात दुधाचा तुटवडा जाणवत होता. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाच ते साडेपाच लाख लिटर दुधाची आवश्यकता असते. हा पुरवठा सांगली, कोल्हापूर, नगर, संगमनेर या भागातून मोठ्या प्रमाणात होत असतो. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध आंदोलनामुळे सोमवारी शहराला नियमितपणे दुधाचा पुरवठा झाला होता.
पिंपरीत मोबाइल कंपन्यांकडे सुमारे २० कोटींची थकबाकी
पालिकेच्या तगाद्याकडे नामांकित कंपन्यांचाही काणाडोळा
तोडफोडीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा हतबल
पिंपरी-चिंचवड शहरातील तोडफोडीच्या घटनांनी कहर केला आहे.
लोकप्रतिनिधींची थेट पोलीस आयुक्तांकडे धाव
वाकड – थेरगाव परिसरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या धंद्यांना बंद करावे, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून होत आहे. परंतु धंदे बंद होत नसल्याने आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. ग प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.
मच्छीमारांकडून होते आहे धोकेदायक मासेमारी
पिंपरी-गेल्या आठवड्यापासून मावळ परिसरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील पवना, इंद्रायणी, मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या हौशी तरुणांची गर्दी नदीपरिसरात वाढत आहे. त्याचप्रमाणे मासे विक्रेत्यांचीही शहरातील पुलांवर लगबग वाढली आहे. अनेक तरुण कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय बसुन धोकादायकरित्या मासेमारी करताना आढळून येत आहेत.
जागा खरेदी करताना आता त्याबद्दलचे विवादही समजणार
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २००२ पासून दस्त नोंदणीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर सुरू केला आहे.
पंतप्रधान आवास योजनेचा विषय स्थायीने फेटाळून लावावा – मारूती भापकर
पिंपरी (Pclive7.com):- नवनगर विकास प्राधिकरणामार्फत कमी खर्चात गृहप्रकल्प उभारला जातो. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत अवाच्या-सव्वा खर्च करुन प्रकल्प राबविला जातो. यामध्ये नक्कीच गौडबंगाल आहे. त्यामुळे बो-हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेचा विषय फेटाळून लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या सर्व निविदा रद्द करुन या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
‘सेल्फी विथ खड्डा, फोटो पाठवा १०० रुपये मिळवा’; राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून सत्ताधारी भाजप शहरवासियांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सेल्फी विथ खड्डा’ हा उपक्रम सुरु केला आहे. शहरातील रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या ९८२२१९९५९९ आणि युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या ९९७००३७५१३ या व्हॉटसअॅपवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फोटो पाठविणा-याला प्रत्येक खड्यांनिहाय १०० रुपये दिले जाणार आहेत.
व्यावसायिक वाहनांना ट्रॅकिंग यंत्रणा बंधनकारक होणार
नवी दिल्ली: केंद्रीय मोटार वाहन नियमातल्या सुधारणांचा मसुदा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केला आहे. यामध्ये राष्ट्रीय परवानाधारक सर्व व्यावसायिक वाहनांना फास्टॅग आणि वाहन ट्रॅकिंग यंत्रणा उपकरण अनिवार्य करण्याचा समावेश आहे. वाहनाच्या पुढच्या काचेवर फास्टॅग लावावा लागेल. त्याचबरोबर राष्ट्रीय परवानाधारकांना वाहनाच्या पुढे ठळक अक्षरात नॅशनल परमीट किंवा एन/पी असे दर्शवावे लागणार आहे.
पीसीसीओईआरमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग कार्यशाळा व युजीकॉनचे अनावरण
चौफेर न्यूज – अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास क्रमाकांतील सिध्दांतांचे फक्त वाचन व पाठांतर करुन अभ्यास करण्यापेक्षा आपले संशोधन प्रकल्प विविध कार्यशाळेत सादर करुन आकलन क्षमता वाढवावी. पीसीसीओईआरच्या अंतिम वर्षांच्या 80 हून जास्त विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट युजीकॉनमध्ये सादर केले. ‘पीबीएल’ कार्यशाळेचा उपयोग नोकरी व उद्योग व्यवसाय करताना अभियंत्यांना मार्गदर्शक ठरेल. असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
घरगुती कोचिंग क्लासेसवर कारवाई नाही
खासगी क्लासेससाठी कायदा आणणार
नागपूर – खासगी कोचिंग क्लासेसच्या नावाखाली राज्यात शिक्षणाचा बाजार मांडला गेला असतानाच घरामध्ये विद्यार्थ्यांची शिकवणी घेणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार खासगी कोचिंग क्लासवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करीत असला तरी 25 ते 50 मुलांना ट्यूशन देऊन रोजगार मिळवणाऱ्या गृहिणी तसेच तरुणांना या कायद्यातून वगळण्यात येणार आहे, असा निर्वाळा देतानाच अशा ट्यूशनवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.
नागपूर – खासगी कोचिंग क्लासेसच्या नावाखाली राज्यात शिक्षणाचा बाजार मांडला गेला असतानाच घरामध्ये विद्यार्थ्यांची शिकवणी घेणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार खासगी कोचिंग क्लासवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करीत असला तरी 25 ते 50 मुलांना ट्यूशन देऊन रोजगार मिळवणाऱ्या गृहिणी तसेच तरुणांना या कायद्यातून वगळण्यात येणार आहे, असा निर्वाळा देतानाच अशा ट्यूशनवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले.
Subscribe to:
Posts (Atom)