वाल्हेकरवाडी - जलपर्णीमुक्त पवना नदीसाठी लोकचळवळ उभारा, शहराला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन खासदार अमर साबळे यांनी जाधव घाट येथे दिले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 4 December 2017
वाल्हेकरवाडी घाटावर एका दिवसात पाच ट्रक जलपर्णी गोळा
पिंपरी – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या ‘उगम ते संगम’ या स्तुत्य उपक्रमाला रविवारी खासदार अमर साबळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोटरीच्या उपक्रमाचे व इतर संस्थांचे कौतुक केले. तसेच यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थिती लावत उपक्रमाचे कौतुक केले.
First metro station to come up at Sant Tukaramnagar in Pimpri
PIMPRI CHINCHWAD: The first Metro station in Pimpri Chinchwad Municipal Corporation limits will be built at Sant Tukaramnagar in Pimpri, said Brijesh Dixit, managing director of Maha Metro.
Finally, ‘dangerous’ speed-breakers under scanner in PMC, PCMC areas
The development — which follows a series of reports carried by Pune Newsline since last month — is heartening for two-wheeler riders and motorists in Pune who have been facing the nightmare because of the “abnormal-sized” speed-breakers.
PCMC advocates police station for civic offences
PIMPRI CHINCHWAD: The civic body has pressed for its demand to start a police station to help it conduct anti-encroachment drives and demolition of unauthorized constructions in the municipal limits.
SSR rates to decide estimate cost of development works
Pimpri Chinchwad: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start implementing the state scheduled rates (SSR) while preparing the estimated cost of development projects for inviting bids from contractors.
Panel raps officials for slow sewage treatment
Pimpri Chinchwad: The budget committee of the state legislative Assembly rapped the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for not treating all sewage, and the haste with which the contracts were allotted for the Pavana dam-Nigdi pipeline before possession of the land.
निगडी-देहूरोड प्रवास सुरक्षित
देहूरोड - रस्ते विकास महामंडळातर्फे पुणे-मुंबई महामार्गाचे निगडी ते देहूरोडदरम्यान चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निगडी दिशेला देहू फाटा ते एमईएस पंप हाउसदरम्यान काही ठिकाणचा अपवाद वगळता चारही लेनचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या लेनवरून वाहतूक वळविल्याने महामार्गावरील सुरक्षितता वाढली आहे. परिणामी संभाव्य अपघातांची शक्यताही कमी झाली आहे.
पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’
पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगी महत्वाच्या आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास आम्ही सकारात्मक अाहोत. मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी आणि निधी हे दोन्हीही नसल्याचे सांगत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे तुर्तासतरी मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ झाली आहे.
…तरच पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो!
पिंपरी – शहरातील नागरिकांनी पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका न्यावी, या मागणीबाबत महामेट्रो सकारात्मक आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने पिंपरी ते निगडीपर्यंतचा “डीपीआर’ बनविण्याची मागणी केली आहे. मेट्रोचा खर्च केंद्र व राज्य सरकार 50-50 टक्के करीत आहे. उर्वरीत मेट्रोसाठी त्यांची आवश्यक ती परवानगी मिळणे गरजेचे आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी महापालिका खर्च करणार असेल, तर निश्चितच विचार करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
पिंपरी – महापालिकेत सत्तांतर होवून भाजपने सत्ता हस्तगत केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी कामकाजात लक्ष घातले आहे. बापट यांनी पवना नदीवरील पुर्वीचा बंधारा जीर्ण झाल्याने नवीन बंधाऱ्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सुचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. परंतु, पाटबंधारे व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांत समन्वय न राहिल्याने पवनेचा बंधारा अद्याप कागदावर राहिला असून पालकमंत्र्याच्या आदेशाला
ज्येष्ठांच्या प्रवास पास शुल्क वाढीचा निषेध
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाने ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक प्रवासी पास शुल्कात जाचक वाढ केली आहे. या शुल्क वाढीचा ज्येष्ठ नागरीक जन आंदोलन कृती समितीच्या वतीने निषेध केला आहे.
थांब्यावरही थांबत नाही बस
पिंपरी – मुंबई-पुणे महामार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरील मोरवाडी चौकात बस थांबा आहे. मात्र, या बस थांब्यावर बहुतेक बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या (पीएमपीएमएल) निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे. यामध्ये सुधारणा घडवून महामंडळाने येथील थांब्यावर बस थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्राध्यापकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन
ताथवडे – जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ताथवडे येथील राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ए. आय. सी. टी. ई. च्या सहकार्याने प्राध्यापक कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रिसेंन्ट ट्रेंडस इन इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयावर ही कार्यशाळा होईल. 4 ते 15 डिसेंबर 2017 या कालावधीत होणाऱ्या या कार्यशाळेत आय. ओ. टी. सोल्युशन पर्सिस्टंट सिस्टिम्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. आर. के. व्यंकटेश्वरन हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जेएसपीएमचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत, संचालक डॉ. रवी जोशी, अनिल भोसले, डॉ. एम. डी. टकले असणार आहेत.
चिखलीत थिनरच्या कारखान्याला भीषण आग
पिंपरी – चिखलीतील शेलारवस्ती येथील हनीवेल इंजिनिअरिंग या थिनर निर्मिती क्षेत्रातील कंपनीला रविवारी (दि. 3) सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. ज्वलनशील असलेल्या थिनरने तत्काळ पेट घेतल्याने थिनर शॉप पूर्णपणे जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
भूमिगत जलवाहिनीसाठी 57 लाखांचा खर्च
पिंपरी – महापालिकेच्या फ प्रभागांतर्गत म्हेत्रेवस्ती, त्रिवेणीनगर, सहयोगनगर भागात नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन भूमिगत करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाने दोन वेगवेगळ्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. निविदेतील अटी-शर्तीनुसार योग्य दराप्रमाणे 56 लाख 78 हजार रुपये खर्चून जलवाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे.
दिव्यांगांसाठी दहा कोटीची तरतूद करणार
पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात अपंग सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अंध, अपंग, मतीमंद अशा विशेष व्यक्तींना सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात येईल. तसेच अपंगांना दोन हजार “पेन्शन’ देणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका आहे, असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे.
“सरल’च्या कामकाजात विघ्न!
पिंपरी – महापालिका शिक्षण प्रशासन विभागातील “सरल’ प्रणालीचे कामकाज गेल्या तीन वर्षापासून अद्याप पर्यंत 60 टक्केच पूर्ण झालेले आहे. ज्या प्रणालीतून बोगस शाळांना चाप बसून योग्य ती विद्यार्थी व शिक्षक संख्या समोर येणे महत्त्वाचे असताना “सरल’चे कामकाज अनधिकृत शाळा व विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीत मिळालेल्या गुणांमुळे रखडून पडले आहे.
रेशनिंगवर मिळणार 55 रुपये किलो दराने तुरडाळ
पिंपरी – रेशनिंगवर तुरडाळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता 55 रुपये प्रतिकिलो दराने ही डाळ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्यभरातील सार्वजनिक वितरण प्रणाली असलेल्या सर्व रेशनिंग विक्री दुकानांमधून ही डाळ वितरीत केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या कार्यवाहीत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
पिंपरी – महापालिकेत सत्तांतर होवून भाजपने सत्ता हस्तगत केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट यांनी कामकाजात लक्ष घातले आहे. बापट यांनी पवना नदीवरील पुर्वीचा बंधारा जीर्ण झाल्याने नवीन बंधाऱ्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सुचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. परंतु, पाटबंधारे व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांत समन्वय न राहिल्याने पवनेचा बंधारा अद्याप कागदावर राहिला असून पालकमंत्र्याच्या आदेशाला पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी
पिंपरी – मुस्लिम धर्माचे शेवटचे संदेशवाहक आणि ज्यांच्याद्वारे पवित्र कुराण भूतलावर अवतरित झाले असे हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादचा सण शनिवारी (दि.2 ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंतीची जय्यत तयारी पाहावयास मिळाली. यानिमित्त विविध सामाजिक संस्था व मित्र-मंडळांकडून परिसर सजविण्यात आला होता. तसेच, मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
Subscribe to:
Posts (Atom)