MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 10 September 2013
Mandals, devotees get Rs 50-crore insurance cover
Devotees visiting Ganesh mandals in Pune and Pimpri Chinchwad are insured against death, disability and medical expenses caused by terrorist attacks and accidents during the 10-day Ganesh festival.
गणेशोत्सवावरील खर्चात बचत करुन बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
पोलीस आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरीतील वास्तुउद्योग कॉलनी मधील नवनिर्माण विकास मंडळाने गणेशोत्सवावरील खर्चात बचत करीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने वास्तुउद्योग येथील मुख्य चौकाचे 'नवनिर्माण विकास मंडळ चौक' असे नामकरण करण्यात आले.
'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणी सहा जणांवर कारवाई
शहरातील हिंजवडी, सांगवी आणि चिंचवड भागातील सहा जणांच्या विरोधात 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' गुन्हा दाखल केला आहे. विशेष मोहिमेत राबवत पोलिसांनी नाकाबंदी करून शहरातील वाहने तपासली असता त्यात मद्यप्राशन करून वाहन चालवताना सहा सण पोलिसांना आढळले.
रिक्षाचालकाच्या त्रासामुळे तरुणीची चालत्या रिक्षामधून उडी
रिक्षाचालकाने अनावश्यक प्रश्न विचारून त्रास दिल्याने घाबरून 20 वर्षीय तरुणीने चालत्या रिक्षामधून उडी घेतली. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वल्लभनगर ते पिंपरीदरम्यान ग्रेडसेप्रेटरमध्ये आज (सोमवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. चालत्या रिक्षातून उडी घेतल्याने तरुणी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
देहू-आळंदी रस्ता विकसित करण्याच्या कामाला गती मिळणार
बहुचर्चित देहू-आळंदी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. या 30 मीटर रस्ता रुंदीकरणांतर्गत जलनिःसारण नलिका टाकणे, पदपथ, दुभाजक बांधणे तसेच इतर कामासाठी 44 कोटी 30 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीने मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या मिळकतींचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडीट'
मुंब्रा येथे बहुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत महापालिकेच्याच 30 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे 'स्ट्रक्चरल ऑडीट' करण्यात येणार आहे.
शहरातील निर्माल्यकुंडाची दुरवस्था
गणेशोत्सव सुरू झाला असताना निर्माल्यासाठी नदीकिनारी असलेले निर्माल्यकुंड कच-यानेच भरुन वाहत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. पिंपरी गावातून थेरगावकड़े जाणा-या पुलाच्या बाजूला असलेल्या निर्माल्यकुंडाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.
रहाटणीतील दवाखाना महापालिका बंद करणार
रुग्णसंख्या कमी असल्याने रहाटणीतील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करण्यात येणार आहे. रहाटणीतील दवाखाना बंद करुन पुनावळयात नवीन दवाखाना सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
वाहतूक पोलिसाशी अरेरावी पडली महागात
पिंपरी कॅम्पात वाहतूक कोंडी सुरळीत करत असतानाच 'नो एन्ट्री'तून घुसणा-या एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून अरेरावी केली. मात्र, त्याची ही अरेरावी त्याला चांगलीच महागात पडली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 8) रात्री पिंपरी कॅम्पातील रिव्हररोडवर
निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीत विद्यार्थ्यांना चौघडावादनाचेही धडे
चौघडावादनासारखी पारंपरिक वादन कला जपत, वडिलांचा वारसा जोपासत, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्याची आणि कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळते असे चौघडावादक रमेश पाचंगे... त्यांच्याही घरात चौघडावादकाची पाचवी पिढी घडते आहे त्यांच्या मुलाच्या प्रसादच्या रुपाने... आपल्यासारखेच समाजात आणखी चौघडावादक तयार व्हावे
पाच रुपयात पाच किलोमीटर; स्वयंसेवी संस्थांची जनमोहीम सुरू
एक किंवा दोन थांबे एवढाच प्रवास केला तरीही दहा रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. याचा विचार प्रशासनाने केल्यास आणि किलोमीटर प्रमाणे दरआकारणी केल्यास प्रवासीसंख्या निश्चितपणे वाढेल, असे राठी यांनी सांगितले.
पिंपरी पालिकेत समाविष्ट होण्यास नवीन गावांचा विरोधच
देहू-आळंदीतही पिंपरी पालिकेत जाण्यास विरोध व्यक्त झाला आहे. देहूत ग्रामसभेत विरोधाचा ठराव मांडण्यात येणार आहे. हिंजवडीची स्वतंत्र नगरपालिकेची मागणी आहे.
अंध-अपंगांना उपचार मोफत
पिंपरी : अंध, अपंग, बधिर-मूक व्यक्तींना महापालिकेच्या रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येतात. वैद्यकीय सेवा मोफत दिली जाईल, परंतु केसपेपर आणि विविध वैद्यकीय तपासण्या, दाखला याचे शुल्क माफ केले जाणार नाही, असा आदेश आयुक्त श्रीकर परदेशी यांनी काढला असून, मंगळवारी होणार्या स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
पिंपरी महापालिका समावेशाविषयी सभा
देहूगाव : देहूगावचा समावेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत व्हावा किंवा न व्हावा यासाठी ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी उद्या सायंकाळी ६ला येथील हनुमान मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच कांतिलाल काळोखे यांनी दिली.
Commuters on a mission for Rs 5 fare, PMPML says it is possible but not now
A large number of citizens who use two-wheelers and autorickshaws, and those who frequently use personal vehicles, will start travelling by PMPML buses
Subscribe to:
Posts (Atom)