As many as 9,440 students are set to get admissions under the 25% reservation scheme of the Right to Free and Compulsory Education (RTE) Act through the online process starting March 24.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 22 March 2014
तातडीच्या रुग्णांसाठी दारी येणार सुसज्ज रुग्णवाहिका
डायल करा क्रमांक 108
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध असणा-या सुसज्ज रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. गरजूंनी या बाबतची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. त्यासाठी गरजूंना डायल करायचा आहे क्रमांक 108.
अवैध बांधकाम प्रश्नी राजीनाम्याची गरज नव्हती - राहुल नार्वेकर
पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राजीनामा देण्यापेक्षा विद्यमान आमदारांनी बोलण्याऐवजी कृती केली असती तर ’कॅम्पा कोला’सारखाच हा प्रश्न सुटू शकला असता. आमदाराने आपल्या अधिकारांचा पुरेपुर वापर केला असता तर राजीनाम्याची वेळच आली नसती, अशी टीका राष्ट्रवादी उमेदवार राहुल नार्वेकर यांनी केली.
मावळसाठी तीन दिवसात 43 उमेदवारी अर्जांचे वितरण
प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश
मावळ लोकसभा मतदार संघासाठी तीन दिवसात आत्तपर्यंत 43 उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये निवडणूक लढविणार नाही असे म्हणणारे खासदार गजानन बाबर, शेकापचे लक्ष्मण जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर आणि आपचे मारुती भापकर यांचा समावेश आहे.

मारुती भापकरांचे विकिपिडिया पेज
सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. मावळमधून अनेक दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांच्यापैकी आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर विकिपिडीयावर चमकले आहेत. मारुती भापकर यांचे विकिपिडिया पेज तयार करण्यात आले असून सध्याच्या टेकसॅव्ही मतदारांवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
मिरवणूक खर्च टाळून गारपीटग्रस्तांना मदत
पिंपरी : नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे मित्र परिवारातर्फे शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
मिरवणुकीचा खर्च वाचवून गारपिटीमुळे बाधित शेतकर्यांना शिंदे मित्र परिवार, तसेच चिंचवड येथील यशस्वी मित्र मंडळ, श्रीधरनगर युवा प्रतिष्ठान व भिगवण येथील समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील घरपड झालेले गंगाराम भरणे तसेच डाळिंब व फळबागांचे नुकसान झालेले लीलाबाई खारतोडे, अंकुश गावडे, संतोष पोरे, हरिभाऊ चवरे, वैशाली वाघमोडे, तात्या वाघमोडे व यशवंत मोहिते यांना मदत करण्यात आली.

अनधिकृत बांधकामप्रश्नी जुंपली
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जिव्हाळ्याच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरण प्रश्नावरून मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. काल शिवसेनेच्या मेळाव्यात नदीपात्रातील स्वत:ची शाळा वाचविण्यासाठी शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांचा बळी द्यायला निघालेल्या लक्ष्मण जगताप यांना धडा शिकवावा, असे आवाहन उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेकाप-मनसेचे उमेदवार जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी मोर्चा काढून दुसरीकडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी प्रोत्साहन देऊन दुटप्पी भूमिका बारणे घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुर झाली आहे. उमेदवारांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि शेकापचे उमेदवार यांच्यात जुंपली आहे.
महिलांना प्रचाराचा रोजगारभत्ता
चिंचवड : शहरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. गाजावाजा करून प्रचार सुरू झाला नसला तरीही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटरसारख्या सोशल साइटवर प्रचार सुरू केला आहे. चिंचवड परिसरात प्रचाराची पत्रके वाटपासाठी महिला घरोघरी फिरत आहेत. महिनाभर का होईना, मात्र रोजंदारीवर काम मिळाल्याने अनेक महिला प्रचार कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)