वृत्त संस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपणार आहे. मात्र, त्यापुर्वीच मोदी सरकारनं लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना भारतीयांना करावा लागणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 1 May 2020
नागरिकांचे प्रश्न आयुक्तांचे उत्तर; ईमेल द्वारे प्रश्न पाठवण्याचे आवाहन
उद्या फेसबुक लाईव्ह भाग 5 मध्ये, आयुक्त नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे! तुमचे प्रश्न 👉 info@pcmcindia.gov.in वर ईमेल करा 📧
कोरोनासारख्या महासंकटावर मात करून औद्योगिकनगरीला पूर्वपदावर आणू – महापौर ढोरे
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. इथला कष्टकरी कामगार हा या शहराचा पाठकणा आहे. लाॅकडाऊन मुळे शहरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असला तरी लवकरच आपण कोरोनासारख्या महासंकटावर मात करून या औद्योगिक नगरीला पूर्वपदावर आणू, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त महापौर ढोरे […]
पिंपरी-चिंचवड : करोनामुक्त व्यक्तींचं स्वागत करणं माजी महापौरांना पडलं महागात
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; ढोल, ताशे आणि पुष्पवृष्टी करून करण्यात आलं होतं स्वागत
महापालिकेला लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका; विकासकामांना लागणार कात्री
एमपीसी न्यूज (गणेश यादव) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेला बसला आहे. लॉकडाउनमुळे आर्थिक मंदी उद्भवली असून श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी महापालिकेलाही आर्थिक झळ बसली आहे. राज्य सरकारकडून एप्रिल महिन्यासाठी वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) मिळणाऱ्या 135 कोटी रुपयांपैकी केवळ 50 कोटी रुपयेच मिळाले आहेत. याशिवाय महापालिकेच्या बांधकाम परवानगी, […]
पीपीई कीट खरेदीसाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला 50 लाखाचा निधी
एमपीसी न्यूज – कोरोनाविरोधात लढणा-या डॉक्टर, नर्स, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी पीपीपी कीट खरेदीकरिता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे. महापालिकेच्या वायसीएम आणि जिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात आला आहे. आमदार बनसोडे यांनी आज (गुरुवारी) महापालिकेच्या कोरोना वॉररुमला भेट दिली. शहरातील परिस्थितीचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी नगरसेवक अमित गावडे, […]
रात्रीच्या "सौंदर्यात नटलेलं पिंपरी-चिंचवड" (भाग-नववा)
पिंपरी- भक्ती शक्ती शिल्प परिसर, श्री कृष्ण मंदिर , निगडी बीआरटीएस टर्मिनल या ठिकाणावरील हे रात्रीचे दिसणारे सौंदर्य व रस्त्याचे नयनरम्य दृश्य पहा फोटोच्या माध्यमातून (छायाचित्रे - संतोष हांडे)
रात्रीच्या "सौंदर्यात नटलेलं पिंपरी-चिंचवड" (भाग-आठवा)
पिंपरी- संत ज्ञानेश्वर महाराज चौक (भेळ चौक), संभाजी महाराज चौक, काच घर चौक,प्राधिकरण, दुर्गा देवी टेकडी प्रवेश द्वार, निगडी-प्राधिकरण या ठिकाणावरील हे रात्रीचे दिसणारे सौंदर्य व रस्त्याचे नयनरम्य दृश्य पहा फोटोच्या माध्यमातून (छायाचित्रे - संतोष हांडे)
पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोन; निर्बंधांबाबत काय निर्णय?
पुणे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणानुसार देशातील 733 जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. यात देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये असून, महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. लॉकडाउनचा कालावधी 3 मे रोजी संपल्यानंतर या जिल्ह्यांत निर्बंध लागू राहणार आहेत. याचवेळी ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध अतिशय कमी प्रमाणात असतील.
Mumbai : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी, सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
एमपीसी न्यूज – पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह राज्यातील 800 जणांना जाहीर झाले आहे. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. याबाबतचे आदेश आज, गुरुवारी (दि. 30) महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, तसेच आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उप […]
Chinchwad : गेल्या 41 दिवसात साडेसहा हजार जणांवर गुन्हे दाखल; 1642 वाहने जप्त
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात मागील 41 दिवसात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या सहा हजार 545 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 1 हजार 642 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार आहे. कोरोनाचा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. हा प्रसार […]
एकाचवेळी तब्बल 250 जणांसोबत ‘फ्री’मध्ये करता येणार ‘Video Conferencing’
करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अशातच आता Google ने आपले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलंय. आतापर्यंत हे अॅप केवळ G Suite च्या ग्राहकांसाठी उपलब्ध होतं. त्यासाठीही पैसे आकारले जायचे. पण आता हे अॅप मोफत उपलब्ध करण्यात आलं आहे.
उद्योगनगरी संकटात
मोठय़ा कंपन्या, लघुउद्योजकांसह अनेक छोटय़ा उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, रोजंदारीवरील मजूर असे कामगार शहरातून निघून गेले आहेत
Video : इंजिनिअर, आर्किटेक्ट यांनी स्वतः बनविले अडीच हजारांहून अधिक मास्क
पिंपरी : केवळ आपल्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ते नागरिकांसाठी वॉरियर्स ठरले आहेत. टेलरिंगचे ज्ञान अवगत नसूनही काही दिवसांत ते आत्मसात करून त्यांनी मास्क तयार करण्याचा चंग बांधला अन् तो पूर्णत्वास नेला. वास्तुविशारद, अभियंता अन् उद्योजकांनी एकत्रित येऊन मजूर व आर्मीच्या जवानांसाठी अडीच हजारांहून अधिक मास्क तयार केले आहेत.
किती टक्के पालक वापरताहेत स्मार्टफोन, इंटरनेट?; वाचा तुम्हीच!
पुणे : 'कोरोना'मुळे ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असताना 'अॅक्टिव्ह टीचर्स फोरम' (एटीएफ) या शिक्षक गटाने राज्यातील एक हजार १८६ शाळांमधील १.६७ लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ४५ टक्के मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे तर, २७ टक्के पालकांकडे इंटरनेट आहे. त्यामुळे 'कोरोना' नंतर घरातून फक्त देण्यासह टीव्ही, रेडिओ यासह इतर माध्यमांचा विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन 'एटीएफ'ने केले आहे.
‘ईएसआय’ रुग्णालय “करोना’साठी उपलब्ध करून द्यावे – आमदार बनसोडे
पिंपरी – करोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भविष्यकाळात निर्माण होणारा धोका किंवा वाढणारी रुग्ण संख्या विचारात घेऊन अधिकच्या खाटांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी भविष्यकालीन तरतूद म्हणून राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ईएसआय) करोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
“त्या’ महिलेने मांडली मध्यमवर्गाची व्यथा; पोलिसांकडून मदत आणि कायदेशीर नोटीसही
पिंपरी (प्रतिनिधी) – गोरगरिबांना शासन अन्नधान्य व रेशन देत आहे. श्रीमंतांकडे मुबलक पैसे असल्याने ते लॉकडाऊनच्या काळात आरामात जगत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मध्यमर्गीयांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. पगार मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. मध्यमवर्गियांच्या समस्येला पिंपळे गुरवमधील एका महिलेने वाचा फोडत खासदार, आमदार आणि नगरसेवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारला. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. सांगवी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढत तिला मदत मिळवून दिली. तसेच सोशल मीडियावरील व्हिडिओबाबत तिला नोटीसही बजावली.
Subscribe to:
Posts (Atom)