Saturday, 31 August 2013

State government seeks report on merger of 20 villages

The state government has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to send a report on whether 20 villages including Chakan should be merged with the municipal limits.

Pardeshi transfers 57 civic staffers

1,179 PCMC employees were reshuffled since he took over

आळंदी, देहू, चाकण, हिंजवडी, गहुंजे सह 20 गावांचा महापालिकेत समावेशाचा प्रस्ताव

राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मागविला अभिप्राय
देहू, आळंदी, चाकणसह नवीन 20 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याबाबत राज्य शासनाने अभिप्राय मागविला आहे. या

पर्यावरण पूरक गणेश सजावट विषयावर ...

पुणे महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्रामार्फत शहरातील नागरिकांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात अनावधानामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट' या विषयावर 4 सप्टेंबर रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे.

नगरसेवक रोहित काटे यांच्यावर गुन्हा

दापोडी गावठाणातील दहीहंडी उत्सवात `डीजे' लावून `वाजवा रे वाजवा'चा आवाज करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ आप्पा काटे यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका डीजे चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची ...

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी आज आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष योगेश बहाल यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
रहाटणी येथील बळीराज मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर

बांधकामाच्या नोंदणीसाठी ...

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अवैध, वाढीव बांधकामांची नोंद करताना सरसकट हमीपत्र घेऊ नका. हमीपत्राच्या सक्तीमुळे दलालांची चलती होऊन महागाई, बेरोजगारीमुळे पिचलेल्या रहिवाशांची झोळी अधिकच दुबळी होईल, अशी भीती शिवसेना गटनेते श्रीरंग बारणे यांनी आज व्यक्त केली. महापालिकेच्या दफ्तरी ज्यांचे बांधकाम अवैध आहे, त्यांच्याकडूनच हमीपत्र घ्यावे,

गणेशोत्सवात तीन दिवस दारूची दुकाने बंद - अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

विधायक पद्धतीने उत्सव साजरा व्हावा यासाठी गणेशोत्सवामध्ये तीन दिवस जिल्हय़ातील दारूची दुकाने बंद ठेवावीत, असे आदेश अजित पवार यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

भोसरीतील १०० कोटीच्या उड्डाणपुलाचा उपयोग काय? - सतत वाहतूक कोंडी; महापौर-आमदारांकडून दखल

भोसरी चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्याच्या हेतूने उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र, वाहतूक कोंडीत काडीचाही फरक पडला नाही. उलट, पुलाखालील भागात प्रचंड अतिक्रमणे झाली.

बिलाशिवाय औषध विक्री करू नका!

पुणे : औषध दुकानांना यापुढे ग्राहकांना औषधांचे बिल देणे बंधनकारक आहे. ग्राहकाला बिल नको असेल, तरी त्याचा तपशील बिल स्वरुपात ठेवणे बंधनकारक आहे. तसे न करणार्‍यांवर परवाना रद्दची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी दिली. 
झगडे पत्रकार परिषदेत म्हणाले, अनेकदा चुकीच्या अथवा बनावट औषधांची विक्री केली जाते. बहुतांश प्रकरणांत औषधांचे बिल दिले जात नसल्याने एखाद्या रुग्णाला चुकीच्या औषधामुळे आरोग्यावर विपरित परिणाम झाला तरी पुढे काही कार्यवाही करता येत नाही. तसेच एखाद्या नामांकि त कंपनीच्या नावे बनावट औषधेही बाजारात येऊ शकतात. अथवा एखाद्या नामांकित औषध कंपनीच्या औषधातही कधीकधी चुकीची मात्रा असू शकते. बिलामध्ये रुग्णाच्या डॉक्टरांचा व औषधांचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादा गैरप्रकार घडल्यास त्यावर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे झगडे म्हणाले. (प्रतिनिधी)

राज्य सरकारचा "एचए'ला मदतीचा हात

पिंपरी - आर्थिक अडचणीत असलेल्या केंद्र सरकारच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनंतर राज्य सरकारनेही मदतीचा हात पुढे केला आहे.