Saturday, 10 June 2017

आकुर्डीतील तरुण मित्र मंडळ प्रथम

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा : श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टची घोषणा 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या वर्षी घेतलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये आकुर्डीतील तरुण मित्र मंडळाला 51 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. विजेत्या मंडळांना चिंचवड येथे येत्या सोमवारी (दि. 12) बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

रावेत ते कोल्हापूर सायकल स्वारी

– अठरा तासांत केले 247 किमी अंतर पार 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडच्या तीन सायकलस्वारांनी रावेत ते कोल्हापूर सायकल प्रवास करत 18 तासात 247 किलोमीटरचे अंतर पार केले. यामध्ये सहभागी झालेल्या तीनही सायकलस्वारांनी आपले महामार्गालगतच्या घरी जाऊन कुटुंबियांना आश्‍चर्याचा धक्का दिला.

मोबाईलवर अठरा टक्के जीएसटी

सौर उपकरणे, वातानुकूलन यंत्र, फॅक्‍स, प्रिंटरही महागणार
पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मोबाईल, सोलर वॉटर हिटर, वातानुकूलन यंत्रे आदी महाग होणार आहेत. किमान दहा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करताना आता अठराशे रुपये कर भरावा लागेल. यापूर्वी याच किमतीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी सहाशे रुपये कर द्यावा लागत होता. 

“तो’ एकुलता एक…नेत्ररुपी उरला!

गावडे कुटुंबियांचा आदर्श : अपघाती मृत्यूनंतर मुलाचे नेत्रदान 
पिंपरी, (प्रतिनिधी) – अभियांत्रिकी परीक्षेत चांगले मार्क पडल्यामुळे आनंदाच्या भरात तो घरी येत असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली. हाताशी आलेल्या एकुलत्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला. उद्या (दि.10) नेत्रदान दिन साजरा होत असताना चिंचवड मधील गावडे कुटुंबियांनी काळजावर दगड ठेवत एकुलत्या एका मुलाच्या नेत्रदानाचा घेतलेला निर्णय आदर्श ठरला आहे.

आता शिक्षकांसाठीही उद्दिष्टे निश्‍चित

शिक्षण खात्याचा मनसुबा, गुणांकन पद्धत लागू करणार
पुणे – शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांप्रमाणे आता शिक्षकांसाठीही उद्दिष्ट्ये निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणांकन पद्धती (क्रेडिट) लागू करण्यात येणार आहे. त्याचे सूतोवाच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत जाहीर केलेल्या निर्णयातून केले आहे. शिक्षकांनी घेतलेले प्रशिक्षण आणि त्याचे परिणाम याच्या अनुषंगाने आता गुणांकन (क्रेडिट्‌स) देण्यात येणार आहेत. त्यांचा शिक्षकांच्या गोपनीय अहवालातही समावेश होणार आहे.

‘मी कार्ड’ असेल, तरच मोफत प्रवास

तुकाराम मुंढे यांचे आदेश : पीएमटी कामगार संघ मात्र आक्रमक
– आदेश कायम ठेवल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
– कार्डवाटप न करता आदेश काढल्याचा दावा

… आणि चक्क तुकाराम मुंढे म्हणाले, सॉरी मॅडम

पिंपरी – “पीएमपीएमएल’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यात शुक्रवारी (दि.9) जोरदार खडाजंगी झाली. “पीएमपी’च्या संचालक मंडळाच्या बैठकीतच हा प्रकार घडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

'पीएमपीएमएल'आणि'स्थायी'त वाद रंगण्याची शक्यता

... ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के निधी देते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या दहा वर्षांत तब्बल ५१७ कोटींहून अधिक निधी दिला आहे. हा निधी घेत असाल, तर पिंपरी-चिंचवडला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवावी, ...

तुकाराम मुढेंना राग अनावर! म्हणाले, तुम्हाला पाहिजे तसे काम करा!

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पीएमपीएल संचालक मंडळाची पहिली बैठक वादळी ठरली आहे. महिलांसाठी विषेश बस सेवेच्या संदर्भातील मुद्द्यावर पिंपरी-चिंचवड स्थायी ...