Tuesday, 17 April 2018

मेट्रो पुणे जिल्ह्यातही जाणार, पण दुसऱ्या टप्यात

पिंपरीः पहिल्या टप्यात पिंपरी-चिंचवड शहराच्या फक्त वीस टक्के भागात धावणारी मेट्रो ही दुसऱ्या टप्यात,मात्र शहरातच नव्हे,तर शहराबाहेर जिल्ह्यातही जाणार आहे.

एमआयडीसी असलेल्या चाकणपर्यंत तिचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यात पश्‍चिम टोकाला निगडी आणि शहराच्या उत्तर टोक असलेल्या मोशीच्या पलीकडे हद्दीबाहेर चाकणपर्यंत जाणार आहे.

हॅरिस समांतर पुलाचे काम रखडले

पिंपरी : दापोडीहून बोपोडीकडे जाणार्‍या हॅरीस पुलास समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, बोपोडीतील आदर्शनगर झोपडपट्टी न हटविल्याने बोपोडीहून दापोडीकडे जाणार्‍या पुलाचे काम रखडले आहे. तेथील बाधीत झोपडीधारकांना औंध येथे स्थलांतरास भाजपच्याच नगरसेविकेने विरोध करत न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे पुलाचे काम रखडण्याची शक्यता आहे. परिणामी पुलाच्या विकासकामाला खो बसला आहे. 

“पारदर्शक’ कारभार “कचऱ्यात’

महापालिकेत सत्तेवर आल्यावर भाजपच्या पहिल्या स्थायी समितीने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा विद्यमान स्थायी समितीने लावला आहे. शहरातील घरोघरचा कचरा संकलन करण्यासाठी मंजूर केलेली 500 कोटींची निविदा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. या निविदा प्रक्रियेवरुन निर्माण झालेला संशयकल्लोळ, कोर्टबाजी, विरोधकांनी केलेले आरोप यातून बचावासाठी भाजपने हा निर्णय घेतला असला तरी यामुळे तथाकथित “पारदर्शक’ कारभाराचा “कचरा’ झाला आहे. सरकारच्या चौकशी समितीने निविदा प्रक्रिया योग्यच असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र, भाजप श्रेष्ठींचा आपल्याच पदाधिकाऱ्यांवर “भरवसा नाय का’, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

“बीआरटी’चे कॅरीडोर मेट्रोने चिरडले!

  • महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात: मेट्रो धावण्याच्या तयारीत; पण, बीआरटीची दूरवस्था
पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी ते दापोडी बीआरटी मार्ग लवकरच सुरु करणार, अशा वल्गना कित्येकदा केल्यानंतरही या मार्गावर बीआरटी सुरु झाली नाही. दुसरीकडे मेट्रोचे काम मात्र मेट्रोच्याच गतीने सुरु आहे. कानामागून येऊन तिखट झालेल्या मेट्रोने आपल्या कामासाठी बीआरटी मार्गाचे कॅरिडोर उखडून टाकले आहेत. पिंपरी चौकात खराळवाडी येथे मेट्रोसाठी बीआरटी कॅरिडॉर उखडून टाकण्यात आले आहेत.

गांधी रेल्वे उड्डाण पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट

पिंपरी - शहरातील ३२ वर्षे जुन्या इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाचे संरक्षक कठडे ठिकठिकाणी ढासळू लागले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बीआरटी विभागाच्या वतीने या पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्यात येत आहे. 

महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍तपदी दिलीप गावडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ वर्गात समावेश झाल्याने दोन अतिरिक्त पदाची आवश्यकता होती. त्यानुसार सह आयुक्त दिलीप गावडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या इतिहास प्रथमच दोन अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी उपलब्ध झाले आहेत.

पिंपरी चिंचवड़ मनपा के प्रशासकीय पदभार की पुनर्रचना

पिंपरी चिंचवड मनपा में प्रशासकीय कामकाज को सुचारू बनाने के लिहाज से मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर ने पदभारों की पुनर्रचना करते हुए सहायक आयुक्तों को नये से पदभार सौंपे हैं। इसके तहत मनपा के सह आयुक्त दिलीप गावड़े को अतिरिक्त आयुक्त का पदभार सौंपा गया है। वहीं मनपा के सहायक आयुक्तों को नए से विभाग वार कामकाज सौंपे गए हैं। सोमवार को मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर ने इसके आदेश जारी किए हैं।

पिंपरीत 33 जिलेटिन बॉम्ब नष्ट


पिंपरीत प्लास्टिकविरोधी मोहीम

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्‍त शहराची मोहीम हाती घेतली असून, त्या अंतर्गत १९ ते २१ एप्रिलच्या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल आणि प्लास्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या ताट, कप, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडी आदी 'डिस्पोजेबल' वस्तू; तसेच हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे आणि वाटी, स्ट्रॉ, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाउच, अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन यांवर बंदी घालण्यात आली आहे. सजावटीसाठीच्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावरही बंदी घातली आहे. या विरोधात प्लास्टिक उत्पादकांनी कोर्टात धाव घेतली असून, कोर्टानेही निर्णय कायम ठेवत मुदत दिली आहे.

‘पिंपरी जलपर्णीमुक्त’ अभियानास सुरुवात

पवना नदीतील जलपर्णी काढून पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. त्यात दोनशे कार्यकर्त्यांनी भाग घेतला. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या पुढाकाराने शहरात 'जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम' उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आंबेडकर जयंतीच्या दिवशी केजुबाई बंधारा, थेरगाव बोट क्लब येथे जलपर्णी काढण्यात आली. त्यात क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य, रानजाई प्रकल्पाचे मजूर, डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवडचे सदस्य, महापालिकेचे अभियंता प्रवीण लडकत, क्वीन्स टाउन जेष्ठ नागरिक संघ, पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, एसकेएफ कामगार संघटना, पोलिस मित्र मंडळ, चंद्रकांत राधाबाई, दामोदर कुलकर्णी यांच्यासह ४० संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो मार्गिका सुरू करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणाची मागणी होत असतानाच आता स्वारगेट ते खडकवासला अशी मेट्रो मार्गिका सुरू  करावी, अशी मागणी सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.

पिंपरीत गुन्हेगारांचा उच्छाद

खराळवाडी येथे ४० ते ५० जणांच्या टोळक्याने धिंगाणा घालत रस्त्यावर लावलेल्या मोटारी फोडल्या.

जलतरण तलावांवर ‘हेराफेरी’

पिंपरी - यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामात देखील शहरातील जलतरण तलावांवरील लिपिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून संगनमताने तिकिटांची ‘हेराफेरी’ केली जात आहे. महापालिकेच्या तिजोरीत जाणाऱ्या पैशांवर खुलेआम डल्ला मारला जात आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाने आता त्याला आळा घालण्यासाठी थेट स्वतंत्र दक्षता पथकच नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामार्फत सर्व जलतरण तलावांचे जागेवर जाऊन लेखापरीक्षण (स्पॉट ऑडिट) केले जाणार आहे. 

तापकीरनगरात मैला मिश्रीत पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करा – दाखले

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या ग प्रभागातील थेरगाव – तापकीरनगर परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून मैला मिश्रीत पाणी सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता साबळे यांना कल्पना देवूनही संबंधीत अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून त्यांच्या कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे. याबाबत, पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त यांना निवदेन देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम

पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची महापालिका आयुक्‍त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

रहाटणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; बोधिवृक्षाचा प्रथम वर्धापन दिन साजरा

पिंपरी (Pclive7.com):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती राहाटणीतील अानंद बुध्दविहार येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी एकवर्ष पूर्ण झालेल्या बोधिवृक्षाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

[Video] प्रभागाच्या विकासाबाबत सांगत आहेत- मा प्रमोद कुटे (नगरसेवक पि चि मनपा )

प्रभाग क्रमांक 14 चे विद्यमान नगरसेवक मा प्रमोद कुटे यांनी त्यांच्या प्रभाग जी विकास कामे केली त्याबद्दल ते सांगत आहेत

[Video] चिंचवड येथे कॅलिग्राफी कार्यशाळेंचे आयोजन !

घारेशास्त्री सभागृह चिंचवड येथे दिनांक १८ ते २२ एप्रिल या दरम्यान या कॅलिग्राफी कार्यशाळेंचे आयोजन केले असल्याची माहिती सुमित काटकर व शरद कुंजीर यांनी दिली.

जुन्या कपडय़ांपासून बनवलेल्या नवीन वस्तूंचे दालन

इको रिगेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक स्वप्निल जोशी यांनी या बाबतची माहिती दिली.

रेडिओ सागरमित्र 90.4 एफएम

पिंपरी - राज्य सरकारच्या निर्णयामुळे सध्या प्लॅस्टिकबंदीचा विषय सर्वत्र चर्चेत असला, तरी शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी प्लॅस्टिक जमा करून ते पुनर्वापरासाठी सागरमित्र अभियानाकडे देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अव्याहतपणे सुरू आहे. हे काम करत असताना मुलांना आलेले अनुभव आता तुम्हाला ‘रेडिओ सागरमित्र ९०.४ एफएम’ या माध्यमातून ऐकता येणार आहेत. येत्या जूनपासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात होणार असल्याचे सागरमित्र अभियानाचे समन्वयक विनोद बोधनकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

संस्कार ग्रुपचा तपास ‘आर्थिक गुन्हे’कडे

पिंपरी - दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. विशेष पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम १४ कोटींच्या पुढे पोचली आहे. तर या प्रकरणात फॉरेन्सिक तज्ज्ञ व ऑडिटरची नेमणूक करण्यात येणार आहे. भरघोस कमिशन लाटणारे सुमारे २० एजंटही पोलिसांच्या रडारवर आहेत.  

महावितरणच्या अपघातांमध्ये यंदा घट

पिंपरी – महावितरण कंपनीच्या दैनंदिन कामकाजादरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये यावर्षी घट झाली आहे. महावितरणच्या वतीने नुकत्याच साजऱ्या केल्या गेलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहांतर्गत ही बाब उघड झाली आहे. वारंवार वीज अपघात होणारी ठिकाणे शोधून या अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत.