Thursday, 13 March 2014

सत्ताधाऱ्यांचा बाहुला होणार नाही- राजीव जाधव

‘‘लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या विधायक व नियमानुसार असलेल्या सूचनांचा विचार केला पाहिजे. मात्र, आपण सत्ताधाऱ्यांचे बाहुले म्हणून काम करणार नाही, आपले कार्यच योग्य ते उत्तर देईल,’’ असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी ठामपणे सांगितले.

नागरिकांमुळे स्वच्छ, सुंदर शहर शक्य

पिंपरी : शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाही सहभाग आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले. बुधवारी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या भागाची पाहणी आयुक्तांनी केली. त्यानंतर झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. शहर अभियंता एम. टी. कांबळे, विकास अभियंता अशोक सुरगुडे, कार्यकारी अभियंता शरद जाधव, मकरंद निकम, जयंत बरशेट्टी, संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी दत्तात्रय फुंदे, सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे उपस्थित होते.

वीज यंत्रणेसाठी आरक्षित जागेची मागणी

वेगाने वाढणा-या पुणे व पिंपरी - चिंचवड शहरात नवीन निवासी, व्यापारी संकुलाच्या जागेत महावितरणच्या वीज यंत्रणेसाठी जागा आरक्षित करावी व त्याचप्रमाणे नकाशा मंजूर करावा अशी मागणी महावितरणच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड शहराचे आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

मतदानादिवशी परीक्षा घेऊ नका

लोकसभेच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असल्यामुळे त्या दिवशीच्या परीक्षा घेऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी पुणे विद्यापीठास दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या स्पष्ट सूचनांमुळे अनेक विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

मतदारजागृतीसाठी ‘परिवर्तन’ची मोहीम

येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. अठरा दिवसांच्या मतदार जागृती मोहिमेत पुण्यातील अनेक ठिकाणी विविध माध्यमांचा वापर करून ‘मतदान करा’ असा प्रचार केला जाणार आहे.

‘ते’ लोकसभेत जाऊन काय करणार?

पिंपरी : विधानसभेत प्रश्न सोडवू शकले नाहीत, ते लोकसभेत जाऊन काय करणार, असा सवाल करीत चिंचवड येथे झालेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीबरोबरच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंडखोरीवरही टीका करण्यात आली. 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चिंचवडकरांच्या समस्या मांडण्यासाठी मेळावा झाला. यामध्ये शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विनोद नढे, नगरसेवक गणेश लोंढे, अँड. संदीप चिंचवडे, आरती चोंधे, विमल काळे, राजू गोलांडे, ज्योती भारती, बाबू नायर, विनायक रणसुभे, बाळासाहेब वाल्हेकर आदींनी मते मांङली.

निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी "बॅकफुट'वर

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.