Tuesday, 19 September 2017

निगडीपासून मेट्रोची सुरवात, आमदार महेश दादा लांडगे घालणार लक्ष!

निगडी, भक्ती-शक्ती चौक येथे पुणे मेट्रो फेज 1 सुरवात व मल्टिमोडलं ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पांना मंजुरी या नागरिकांच्या 2 प्रमुख मागण्यांना मंजुरी मिळवण्यासाठी आमदार महेश दादा पाठपुरावा करणार आहेत. निगडी ते दापोडी मार्ग हा पिंपरी विधानसभेत मोडतो, नुकतेच पंतप्रधानांच्या मिशन 350 अंतर्गत पिंपरी विधानसभेची जबाबदारी महेश लांडगे यांना देण्यात आली आहे, मेट्रोच्या निमित्ताने सुरवात करून शहराचे लोकप्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहरावरील अन्यायाची मालिका खंडित करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल...


रुबाबासाठी 'पिस्तूल'

पुढारी विशेष

'मसल', 'मनी पॉवर'च्या दिखाव्यासाठी वाढता वापर 

'आयटी' विभागात सावळा गोंधळ, 'सारथी' बदलण्याची मागणी

स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्मार्ट सिटीचे सारथ्य महापालिकेचा आयटी विभाग करणार आहे, असे असले तरी ...

पिंपरी 'स्मार्ट सिटी'च्या नियोजनासाठी इस्राइलकडून धडे

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात या संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, सहायक आयुक्त ...

प्रशासनाकडे विकासकामांचा “दुष्काळ’?

नागरिकांचा सवालः हाच का सत्ताधाऱ्यांचा अजेंडा!
पिंपरी, (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पहिल्या सहा महिन्यातच पिंपरी-चिंचवड समस्यांचे आगार बनले आहे. विकासाचा वेग मंदावला आहे. नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. कचरा, साफसफाई, ड्रेनेज, रस्ते, खड्डे, पाणी आदी सुविधांमधील अनियमिततेचा नागरिकांना त्रास होत आहे. हे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांना वैद्यकीय विभागाच्या पदोन्नतीसारख्या विषयांत कमालीचा रस दिसत आहे. लोकांचे प्रश्‍न चर्चेअंती सोडविण्याचे व्यासपीठ असलेल्या सर्वसाधारण सभेतील अजेंड्यावरही विषयांचा “दुष्काळ’ पडला आहे. यावरून सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन यांच्यातील उदासिनता दिसून येत आहे.

बड्या धेंडांना पाणीपट्टी थकबाकीत सूट

पिंपरी – महापालिका पाणी पुरवठा विभागातील पाणीपट्टी थकबाकीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कुटूंबातील नागरिकांनी पाणीपट्टी थकबाकी न भरल्यास तातडीने त्यांचे नळ जोडणी तोडली जाते. परंतु, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने शहरातील बड्या धेंड्याकडे कोट्यावधी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी रखडली आहे. या थकबाकी वसुलीकडे पाणी पुरवठा विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. तसेच, त्यांच्यावर नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जात नाही. त्यामुळे 30 हजारापेक्षा अधिक पाणीपट्टी थकबाकी 1 हजार 341 नागरिकांकडे राहिलेली आहे.

[Video] दख्खनच्या राणीची नवी 'डायनिंग कार'!

कशासाठी 'पोटासाठी', खंडाळ्याच्या घाटासाठी... 🚂
दख्खनच्या राणीची नवी 'डायनिंग कार'!

"शिक्षण' सैरभैर

पिंपरी - महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त होऊन तीन महिने उलटले, तरी ठोस नियमावलीअभावी शिक्षण समिती स्थापनेला सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी केवळ "तारीख पे तारीख' देत आहेत. समिती स्थापनेला मुहूर्त मिळत नसल्याने शिक्षण विभागाचा कारभार सैरभैर झाल्याचे चित्र आहे. 

"आरटीओ'ची आजपासून विशेष वाहन तपासणी मोहीम

पुणे - राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) राज्य रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत गेल्या महिन्यात राबविलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेवर परिवहन आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही मोहीम पुन्हा राबविण्याचे आदेश सर्व आरटीओंना दिले आहेत. त्यानुसार मंगळवार (ता. 19) पासून ही तपासणी मोहीम सुरू होणार आहे. यामध्ये हेल्मेटचीदेखील तपासणी केली जाणार आहे. 

'अणूशी संबंधित उद्योग उभारावेत'

'एमसीसीआयए'ने भोसरी येथील केंद्रात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याला ... एमसीसीआयएतर्फे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी चिंचवड येथे ऑटो क्लस्टर उभारण्यात आले आहे. मात्र, गेल्या ...

Sunburn '17 relocates to Pimpri-Chinchwad in Pune; DJ Snake and Martin Garrix to headline

Sunburn Festival 2017, will be hosted at Pimpri-Chinchwad in Pune. The new venue will not only host an artist line up and stage but also aims to enhance the fan experience by giving hassle free entry to the festival arena and easy access to the venue ...

BJP-led PCMC in the dock again; now top official offers to quit

THE BJP, which rode to power in Pimpri-Chinchwad by accusing the Ajit Pawar-led NCP regime of corruption, is facing yet another embarrassing situation as its ...

शहरात फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांसाठी “शेल्टर’ची मागणी

चौफेर न्यूज – शहरात फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कायमस्वरुपी शेल्टरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका उषा मुंढे यांनी केली आहे.