Saturday, 13 October 2012

दहशतवाद्यांना फ्लॅट देणा-या घरमालकाची पोलिसांकडून चौकशी

दहशतवाद्यांना फ्लॅट देणा-या घरमालकाची पोलिसांकडून चौकशी
पिंपरी, 12 ऑक्टोबर
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर चार साखळी बॉंबस्फोट घडविणा-या 'इंडियन मुजाहिदीन'च्या तीन दहशतवाद्यांनी कासारवाडीत आश्रय घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर दहशतवाद्यांना भाडय़ाने फ्लॅट देणा-या घरमालकाला भोसरी पोलिसांनी आज चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांनी एजंटमार्फत फ्लॅट घेतल्याचे घरमालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी आता 'एजंट'चा तपास सुरु केला आहे. तथापि, दहशतवाद्यांना फ्लॅट देणा-या घरमालकाचा मुलगा अपहरण आणि खूनप्रकरणात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून कातिल सिद्दीकी खूनप्रकरणाशी त्याची काही संबंध आहे काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


विजेच्या धक्क्याने 15 महिन्याच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

विजेच्या धक्क्याने 15 महिन्याच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी, 12 ऑक्टोबर
हौसिंग सोसायटी मधील बागेत खेळत असताना तेथील एका वीज प्रवाह चालू असलेल्या खांबाला स्पर्श केल्यामुळे विजेचा धक्का बसून एका पंधरा महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना पिंपळेगुरव येथील कल्पतरु इस्टेट फेज 2 येथे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत मुलाला वाचविण्यास गेलेले मुलाच्या आजोबाही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

टाटा मोटर्सने केले वंचितांचे तोंड गोड

टाटा मोटर्सने केले वंचितांचे तोंड गोड
पिंपरी, 12 ऑक्टोबर
समर्पित भावनेने लोकांसाठी काम करणा-या संस्थांना मदत म्हणुन तसेच समाजातील वंचित घटकांचे तोंड गोड करण्याच्या हेतुने टाटा मोटर्सने 'जॉय ऑफ गिव्हीग वीक' नित्त 'मिठास जिंदगी की' हा साखर गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमात तब्बल सोळा हजार नागरिक, टाटा मोटर्सचे कर्मचारी व समाजातील सेवाभावी घटकांनी 21 टनापेक्षा जास्त साखर गोळा केली. ही साखर 16 सेवाभावी संस्थांना वाटण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


तळवडे येथे पालिकेच्या कारवाईत 23 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त्‍ा

तळवडे येथे पालिकेच्या कारवाईत 23 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त्‍ा
पिंपरी, 12 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत तळवडे भागातील शेलारवस्ती, सोनवणे वस्ती परिसरात आज केलेल्या कारवाईत 23 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने शालेय आपत्ती व्यवस्थापन मोहीम

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने शालेय आपत्ती व्यवस्थापन मोहीम
पिंपरी, 12 ऑक्टोबर
महापालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय आपत्ती व्यवस्थापन मोहिमेला सुरवात केली आहे. याच मोहिमेचा पहिला टप्पा म्हणुन मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समिती स्थापित करण्याचे आदेश लवकरच शहरातील सर्व शाळांना देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


यंदाच्या नवरात्र महोत्वात इको फ्रेंडली देवींच्या मूर्ती !

यंदाच्या नवरात्र महोत्वात इको फ्रेंडली देवींच्या मूर्ती !
पिंपरी , 12 ऑक्टोबर
नवरात्रोत्सव चार दिवसांवर आल्याने मूर्तीकारांची लगबग सुरु झाली आहे. या मूर्ती पीओपी 2 या पाण्यात लवकर विरघळणा-या मातीपासून तयार केलेल्या आहेत. शिवाय या मूर्तींसाठी खाण्याचे रंग, इकोफ्रेंडली रंग वापरण्यात आल्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव इकोफ्रेंडली साजरा होणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


पवना जलवाहिनीपाठोपाठ आंद्र जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन

पवना जलवाहिनीपाठोपाठ आंद्र जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन
वडगाव मावळ, 12 ऑक्टोबर
पवना धरणापासून पिंपरी-चिंचवडपर्यंत जलवाहिनीच्या विरोधातील आंदोलन गाजत असतानाच मावळ तालुक्यातील आंद्र धरण ते चाकण एमआयडीसी या नव्या जलवाहिनीच्या विरोधातही आजपासून आंदोलनास सुरूवात झाली. आंद्र धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या जलवाहिनीचे काम आज बंद पाडण्यात आले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


दिवसा पाहणी; रात्री काम फत्ते

दिवसा पाहणी; रात्री काम फत्ते: पराग कुंकुलोळ। दि. १२ (चिंचवड)

भोईरनगरच्या विठ्ठल मंदिरातून समई, त्याच्या शेजारच्या दुकानातून रेडिओ चोरला होता. इंदिरानगरच्या किराणा दुकानातून तांदळाचे पोते, तर प्रेमलोक पार्कच्या बंद शाळेतून वायर चोरल्या.. चिंचवड परिसरात नागरिकांनी पकडलेल्या लहान मुलाला विश्‍वासात घेतल्यावर त्याने दिलेली ही माहिती. पोलिसांनी एकदा पकडून नेले. चोरीचा माल घेणार्‍या भंगार व्यावसायिकाचे दुकान दाखविले. त्यानंतर मला जाण्यास सांगितले. कोठे, केव्हा, कोणता माल हाती लागेल याचा अंदाज घेऊनच चोरीचा मनसुबा सिद्धीस नेला जातो, असेही त्याने सांगितले.

जोखीम उचलण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्या हे साधे तंत्र चोरी करताना पकडले जाऊ नये, याकरिता बालगुन्हेगारांनी आत्मसात केले आहे. जेथे चोरी करावयाची तेथे आधी टेहळणी केली जाते. काय हाती लागेल याचा अंदाज घेतला जातो. मगच चोरी केली जाते.

बालगुन्हेगारांचे टोळके एखाद्या परिसरात बंद घरांची, दुकानांची दिवसा पाहणी करते. काहीवेळा एका दिवसात काम फत्ते केले जाते. तर काही जोखमीच्या ठिकाणी दोन-तीन दिवस चकरा मारून केव्हा आणि कसा हात मारायचा याचा अंदाज घेतला जातो. शक्यतो रात्रीच्या वेळीच चोरी केली जाते.

दुकानांचे, टपर्‍यांचे पत्रे, मागील दरवाजा उचकटून ते सहज आत जातात. त्यांचे दोन सहकारी कानोसा घेण्यासाठी बाहेर थांबून राहतात. चोरी करण्यासारख्या वस्तू, पैसे हाती लागले की धूम ठोकतात. चोरीचा माल बर्‍याचदा पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दळवीनगर परिसरात बांधलेल्या पत्राशेडमध्ये ठेवला जातो. दुसर्‍या दिवशी ठराविक भंगार व्यावसायिकाला देऊन त्याच्याकडून पैसे घेतले जातात. हेक्सॉ ब्लेड, स्क्रू ड्रायव्हरच्या सहायाने परिसरातील रोहित्रांची झाकणे व केबल कापून तिची विक्री केली जात असल्याची माहितीही पुढे येत आहे.

‘नकोशी’साठी बालस्केटर्सचा धावा

‘नकोशी’साठी बालस्केटर्सचा धावा: स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पुणे ते मुंबई प्रवास
पुणे। दि. १२ (प्रतिनिधी)

स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी अवघ्या ५ वर्षांपासून १४ वर्षांपर्यंतची २0 मुले पुणे ते मुंबईचा प्रवास स्केटिंगवरून करणार आहेत. बालदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १0 नोव्हेंबरला पुण्यातून हा उपक्रम सुरू होणार असून, १४ नोव्हेंबरला गेट वे ऑफ इंडियाला मुले पोहोचणार आहेत, अशी माहिती दि अँडव्हेन्चर हबचे अध्यक्ष सुरेश बाबू यांनी दिली.

या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व या टीमचे नेतृत्व करणारी मनाली बाबू उपस्थित होते. सुरेश बाबू म्हणाले, स्त्रीभ्रूणहत्येचे लोण समाजात मोठय़ा प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुले अद्वितीय साहस करू शकतात, हेही या उपक्रमातून दिसून येणार आहे. यामध्ये स्केटिंग करणारे पुण्यातील १0 मुले आणि अंबरनाथ येथील १0 मुले सहभागी होणार आहेत. या उपक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार अविनाश इनामदार, गायक शंकर महादेवन, सलील कुलकर्णी सहभागी होणार आहेत.

१0 नोव्हेंबरला बालगंधर्व रंगमंदिरापासून या स्केटिंगला झेंडा दाखवून सुरुवात केली जाणार आहे. ११ नोव्हेंबरला ही मुले पुण्याहून निघून पिंपरी-चिंचवड-तळेगाव दाभाडे मार्गे लोणावळा येथे पोहोचतील. १२ नोव्हेंबरला लोणावळ्यापासून खोपोलीमार्गे पनवेल येथे पोहोचतील. १३ नोव्होंबरला पनवेलहून निघून वाशी मार्गे दादरला पोहोचतील. १४ नोव्हेंबरला दादरहून गेट वे ऑफ इंडिया येथे या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

बांधकामावरील दंड आकारणीचा प्रस्ताव

बांधकामावरील दंड आकारणीचा प्रस्ताव: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेला ५00 रुपये प्रतिचौरस फूट दर नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे दंड आकारणीचा फेरप्रस्ताव प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.

३ हजार चौरस फुटांपर्यंत २५ रुपये प्रति चौरस फूट दंड आकारणी करावी. ३ ते ५ हजार चौरस फुटांपर्यंत ५0 रुपये प्रति चौरसफूट, ५ ते १0 हजार चौरस फुटांपर्यंत १00 रुपये प्रतिचौरस फूट, १0 हजार चौरस फुटांपर्यंत ५00 रुपये प्रतिचौरस फूट दंडआकारणी करावी, असा फेरप्रस्ताव मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

बांधकामे नियमितीकरणासाठी सरसकट ५00 रुपये चौरसफूट याप्रमाणे दंड आकारणीचा प्रस्ताव प्रशासनाने ठवेला होता. त्यात सुधारणा सुचविणारा प्रस्ताव शहरसुधारणा समितीमार्फत सर्वसाधारण सभेपुढे आला आहे.
यापुढे अनधिकृत बांधकामांना सुविधा न पुरविण्याचा प्रस्तावसुद्धा सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामांची नळजोड, सांडपाणी व्यवस्था खंडित करण्याचे धोरण आगामी काळात महापालिकेतर्फे राबवले जाणार आहे.

महापालिका अस्थापनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. तसेच शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रशासन अधिकारी आशाराणी पाटील यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव येत्या महापालिका सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. पदोन्नती समितीने केलेल्या शिफारसीनुसार या पदासाठी अर्हता धारण केलेले डॉ. साळवे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी आहेत.

चिंचवड नाटय़गृहातील दुरवस्थेची अतिरिक्त आयुक्तांकडून दखल

चिंचवड नाटय़गृहातील दुरवस्थेची ...:
पिंपरी / प्रतिनिधी
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहातील दुरवस्थेची अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी गंभीर दखल घेतली असून यापुढे नाटय़गृहातील कामांमध्ये निष्काळजीपणा न करण्याची तंबी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. चिंचवडच्या नाटय़गृहात भरत जाधव यांच्या ‘पुन्हा, सही रे सही’ या नाटकाच्या वेळी साऊंड व एसीची यंत्रणा खराब झाल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. त्यामुळे प्रयोग अर्धा तास थांबवण्यात आला होता. त्याचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिध्द केले व त्याची दखल कदम यांनी घेतली.
Read more...

स्थायी समितीच्या बैठकीत पतीराजही सोबत हवेत!

पिंपरी मतदारसंघावरून सर्वच पक्षात ...:
महायुतीत सर्वाधिक तणाव; गोपीनाथ मुंडे यांनाच शह?  
पिंपरी / बाळासाहेब जवळकर
विधानसभा निवडणुकांना बराच वेळ असूनही पिंपरी मतदारसंघावरून राजकीय डावपेचांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पिंपरी-भोसरी मतदारसंघ अदलाबदली करण्याच्या वादग्रस्त विषयावर चर्चा झाली. भाजपकडील पिंपरी शिवसेनेला देऊन त्यांच्याकडील भोसरी मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप शहराध्यक्षच आग्रही असून शिवसेना व गोपीनाथ मुंडे समर्थकांना हादरा देण्याचा दुहेरी डाव त्यामागे आहे. पिंपरीसाठी रिपाइंची प्रतिष्ठा लागणार असून राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ खेचण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच फिल्डिंग लावल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.
Read more...

स्थायी समितीच्या बैठकीत पतीराजही सोबत हवेत!

स्थायी समितीच्या बैठकीत पतीराजही ...:
पिंपरीतील महिला सदस्यांची अजब मागणी
पिंपरी / प्रतिनिधी
स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी विश्वासात घेत नाहीत, हिशेबात घोळ करतात, अशी महिला सदस्यांची तक्रार आहे. त्यावर ‘समाधान’ करणारा तोडगा न निघाल्याने स्थायीच्या ‘प्री’ बैठकीत पतीराजांना बसू द्यावे, अशी अजब मागणी त्यांनी शेट्टी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्थायीच्या कारभाराला वेगळेच ‘वळण’ मिळण्याची चिन्हे आहेत.
Read more...

कष्टकऱ्यांच्या माणुसकीतून उंचावले मदतीचे हात

कष्टकऱ्यांच्या माणुसकीतून उंचावले मदतीचे हात: कष्टकऱ्यांच्या माणुसकीतून उंचावले मदतीचे हातपिंपरी - "सकाळ माध्यम समूहा'ने सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांच्या सहकार्याने 1 नोव्हेंबर "बस डे' जाहीर करताच मोलकरणी, पथारी आणि हातगाडीवाले, भजी-पाव विक्रेते यासारख्या कष्टकरी समाजाच्या महत्त्वाच्या घटकांनी स्वतःच पुढाकार घेऊन या उपक्रमाच्या दिवशी आम्ही हजारोंच्या संख्येने सहभागी होऊच परंतु आर्थिक निधीदेखील उभारू, असे आश्‍वासन देऊन आम्हीही माणुसकीला जागणारे आहोत, हे दाखवून दिले.

For pipeline flow, PCMC woos farmers in Maval with two small dams

For pipeline flow, PCMC woos farmers in Maval with two small dams: PCMC is proposing to build two Kolhapur-type (KT) weirs on the Pavana at Gahunje and Shivane to allow Maval farmers to draw enough water for their needs.

Indian Mujahideen men went unnoticed in Kasarwadi

Indian Mujahideen men went unnoticed in Kasarwadi: Kasarwadi in Pimpri Chinchwad is in focus after the special cell of the Delhi police revealed that IM operative Sayed Feroz had rented a flat here and the IEDs used in the Pune blasts on August 1 and those planned in other places were assembled here.

PCMC urged to amend DC rules

PCMC urged to amend DC rules: The opposition in Pimpri-Chinchwad has asked the PCMC to bring forth a shelved proposal to change development control (DC) rules of PCMC to reserve 25 per cent tenements for people from the economically weaker sections / low income groups, and 10 per cent for medium income groups (MIG) in private layouts, as per a state government directive.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation takes temporary steps to manage waste collection

Pimpri-Chinchwad Municipal Corporation takes temporary steps to manage waste collection: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has temporarily appointed a new contractor for door-to-door collection of garbage in zone A (Nigdi-Pradhikaran) and zone D (Sangvi, Kalewadi and fringe areas) until a permanent contractor is appointed.

कासारवाडीत शिजला साखळी बॉम्बस्फोटाचा कट ?

 http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33861&To=7
कासारवाडीत शिजला साखळी बॉम्बस्फोटाचा कट ?
पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या तीन जणांपैकी दोघांनी कासारवाडीतील एका भाड्याच्या खोलीत राहून हा कट शिजविला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबतचे वृत्त परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.

जनता सहकारी बँकेच्या परकीय चलन सेवेला सुरवात

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33856&To=1
जनता सहकारी बँकेच्या परकीय चलन सेवेला सुरवात
जनता सहकारी बँकेच्या परकीय चलन सेवेला चिंचवड येथे नुकतीच सुरवात करण्यात आली. कमीत कमी कमिशन आकारुन मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी बँकेने ही सेवा सुरु केली आहे.

पुणे स्फोटातील तीन दहशदवाद्यांना दिल्लीत अटक

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33852&To=7
पुणे स्फोटातील तीन दहशदवाद्यांना दिल्लीत अटक
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणा-या तीन दहशदवाद्यांना दिल्लीमध्ये दहशतवादी कारवायांची तयारी करीत असताना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अतिरेकी मोहम्मद सिद्दिकी याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा स्फोट घडून आणल्याचे तपासात समोर आले आहे.

नदीवर स्लॅब अन् पाण्याच्या गोळ्यांची खरेदी ; अभिरुप सभेत मंजूर झाले मजेशीर ठराव

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33851&To=10
नदीवर स्लॅब अन् पाण्याच्या गोळ्यांची खरेदी ; अभिरुप सभेत मंजूर झाले मजेशीर ठराव
नदी, नाले, तलावांवर बहुमजली स्लॅब टाकून बांधकामाला परवानगी..., पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी गोळ्यांची खरेदी..., उपोषणाच्या ठिकाणी खाण्याची सोय..., प्रत्येक नगरसेवकाला 50 टप-यांचे वाटप... असे अनेक मजेशीर ठराव आज (गुरुवारी) मंजूर करण्यात आले. मुली असलेल्यांनाच निवडणूक लढविण्यास पात्र ठरविण्याची उपसूचना मांडत स्त्री भ्रुण हत्येसारख्या सामाजिक प्रश्नालाही स्पर्श करण्यात आला. निमित्त होते महापालिकेच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अभिरुप सभेचे.

टाटा मोटर्सच्या गिर्यारोहकांनी सर केले माउंट बलजुरी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33847&To=9
टाटा मोटर्सच्या गिर्यारोहकांनी सर केले माउंट बलजुरी
मुसळधार पाऊस, निसर्गाचा प्रकोप, दुथडी भरुन वाहणारी पिंडारी नदी, हिमालयातील हिमनद्या आणि व्हाईट आउट अशा संकटांचा सामना करत टाटा मोटर्सच्या गिर्यारोहकांनी अवघड समजले जाणारे 5922 मीटर उंचीचे बर्फाच्छादीत माउंट बलजुरी हे शिखर 9 सप्टेंबर रोजी सर केले. या मोहिमचे नेतृत्व टाटा मोटर्सच्या वातावरण नियंत्रण विभागात कार्यरत असलेले मनोहर लोळगे यांनी केले.

विकासाचा 'अश्वमेध'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33843&To=6
विकासाचा 'अश्वमेध' निशा पाटील
पुण्यक्षेत्र देहू-आळंदीचा शेजार..., महासाधू मोरया गोसावींचे आशीर्वाद..., अन् क्रांतिकारक चापेकरांची जन्मभूमी... अशी ख्याती ल्यालेली पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी 'मेट्रो सिटी'च्या दिशेने झेप घेत आहे. या समृध्द शहराची पालक असलेली महापालिका एकतिशीमध्ये पदार्पण करत आहे. नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक संकटांमधून वाट काढताना कुटुंब प्रमुखाची जबाबदारी सक्षमपणे पेलण्यात महापालिका यशस्वी झाली आहे. महापालिकेकडून उपलब्ध करुन दिल्या जाणा-या सोई-सुविधांमुळे पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिकनगरी न राहता 'मल्टी'नगरी झाली आहे. महापालिकेच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त त्याचा विशेष आढावा...!