MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 19 April 2020
#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
बारा गावांचा भाग यापूर्वीच ‘लॉक’; चार रस्ते, पुलांवरील रहदारी रोखली
पिंपरी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी रुग्ण आढळलेले शहरातील भाग व रस्ते बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील १२ गावांचा भाग यापूर्वीच सील केला आहे. त्यात शनिवारपासून (ता. १८) चार रस्ते आणि चार पूल रहदारीसाठी बंद केले आहेत. अशा पद्धतीने सुमारे निम्मे शहर सीलबंद झाले आहे.
पिंपरी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी रुग्ण आढळलेले शहरातील भाग व रस्ते बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील १२ गावांचा भाग यापूर्वीच सील केला आहे. त्यात शनिवारपासून (ता. १८) चार रस्ते आणि चार पूल रहदारीसाठी बंद केले आहेत. अशा पद्धतीने सुमारे निम्मे शहर सीलबंद झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही
पिंपरी - तुम्ही विनाकारण घराबाहेर पडलात..., मॉर्निंग वा इव्हिनिंग वॉक करताय..., लॉकडाउन व संचारबंदी आदेशाचा भंग केलाय..., तर खबरदार. तुमच्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे आणि ठेवली जातेय महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी तयार केलेल्या ‘वॉर रूम’मधून. इतकेच नव्हे तर, कोरोना विषयीचे दैनंदिन अपडेटही ‘वॉर रूम’च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोचविले जात आहेत.
भोसरी, गवळीनगर, दिघी, च-होली या ‘हॉटस्पॉट’ भागाकडे शहराचे लक्ष; सर्वाधिक 19 रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात मागील दहा दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत शहरातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये भोसरी, गवळीनगर, दिघी, च-होली हा भाग येत असलेल्या ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. या प्रभागात सर्वाधिक 19 रुग्ण आहेत. रात्री पॉझिटीव्ह आलेले दोन रुग्णही च-होलीतील आहेत. त्यामुळे या भागाकडे संपुर्ण शहराचे […]
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रुपीनगर नव्हे तर सेक्टर 22 ओटास्कीम परिसर ‘सील’
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अकराव्या दिवशी कोरोना रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. काल (शनिवारी) एकाच दिवशी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण संभाजीनगर, निगडी ओटास्कीम, यमुनानगर दवाखाना परिसर, चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे चऱ्होली, निगडी ओटास्कीम – यमुनानगर दवाखाना परिसर […]
स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा, अन्यथा बंद करा
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे दिवसातून 4 वेळा निर्जंतुकीकरण करावे अथवा स्वच्छ ठेवण्यात यावे. महापालिका याबाबत आवश्यक दक्षता घेऊ शकत नसल्यास सर्व लहान-मोठे स्वच्छतागृह कुलूप लावून 3 मे पर्यंत बंद करावे, अशी मागणी अँटी कोरोना टास्क फोर्सच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
‘करोना’चा पालकमंत्र्यांकडून आढावा
आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींसह पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील करोना बाधित आणि आकडेवारीसंदर्भात तसेच प्रशासकीय सज्जतेविषयी आढावा घेत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच मंडईमध्ये होणारी गर्दी टाळावी, असे आवाहनही हर्डीकर यांनी यावेळी केले.
महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे नगरसेवकांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला; उपमुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. सर्व नगरसेवकांचे गेल्या महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आले. या निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी […]
पिंपरी चिंचवड मधील कामत हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी | पिंपरी चिंचवड मधील कामत हॉस्पिटलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सॅनिटायजेशन टनेल हे डॉ. दिलीप कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उभारले आहे. कामत हॉस्पिटल चा स्टाफ, पेशंट्स आणि चिंचवड पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांच्यासाठी कामत हॉस्पिटल तर्फे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
गरजूंना मिळेना पण इथं आहे धान्य पडून...
पिंपरी : शहरातील गरजू आणि गरीब लोकांसाठी महापालिकेकडे सुमारे साडेचार हजार पॅकेटस् धान्य जमा झाले आहे. मात्र, अजून त्याचे वाटप सुरू झालेले नाही.
कोरोना नव्हे तर, 'या' कारणामुळे पोलिस हैराण
पिंपरी : कोरोना विषाणूंच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाच डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सहा स्पॉट पोलिसांना नाकाबंदी करण्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे समोर आले आहे.
Video : भंगार गोळा करणाऱ्यांचा थांबला जीवन गाडा
पिंपरी - 'दररोज आम्ही रस्त्यावर, कचराकुंड्यातून भंगार गोळा करतो. ते विकल्यानंतर आम्हांला चार पैसे मिळतात. त्यावर उपजीविका भागते. मात्र, सध्या भंगाराची दुकानंच बंद असल्याने आम्ही गोळा केलेला भंगारमाल आमच्याकडेच पडून आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणेही कठीण झाले आहे, अशी करुण कहाणी आहे भंगारातून भूक भागविणाऱ्या सुखदेव व पंचफुला गायकवाड या दांपत्यांची.
Video : पिंपरी : एसटीची चाके रूतलेली; दीड कोटीचा फटका
पिंपरी - प्रतिदिन 18 किलोमीटर धावणारी...दिवसाला सहा लाखाचे उत्पन्न मिळवून देणारी "लालपरी' आजच्याघडीला "लॉकडाउन'मध्ये अडकून पडली आहे. गेल्या 28 दिवसाच्या कालावधीत सुमारे 5 लाख 4 हजार किलोमीटर धावणारी बसची चाके जागीच थांबल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराचे दीड कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. परिणामी आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळाची चाके अधिकच खोल रूतली आहेत.
आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर “करोना’ संकट
नोकरीवरून काढल्याची शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची तक्रार
पिंपरी -“करोना’मुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढू नका, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील आवाहन केले आहे. परंतु पुणे अणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी कंपन्यांमधील अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे
भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना उन्हात उभे राहण्याची शिक्षा
पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने मोकळ्या मैदानात मंडई सुरू केल्या आहेत. मात्र व्यापाऱ्यांना स्वतःच्या डोक्यावरही छत्री उभारण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे व्यापाऱ्यांना महापालिकेने एकप्रकारे उन्हात उभे राहण्याची शिक्षा सुनावली आहे.
गरजूंना वाटपासाठी प्रत्येक नगरसेवकाला 5 लाखाचे धान्य खरेदी करून द्यावे
महापौर उषा ढोरे यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणारे कामगार, गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धान्य खरेदी करून वाटपासाठी देण्यात यावे. तसा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवावा, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
डाळींची मागणी वाढली
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या भीतीने जवळपास 50 टक्के नागरिकांनी मांसाहारासह महाग झालेल्या पालेभाज्यांचा त्याग केल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी डाळींना रोजच्या आहारात स्थान दिल्याने विविध प्रकारच्या डाळींची विक्री सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. तूर आणि चणा डाळीला जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.
Subscribe to:
Posts (Atom)