Tuesday, 3 April 2018

प्लॅस्टीक बंदीमुळे भाजीमंडईत रद्दी पेपरला मागणी

जुनी सांगवी (पुणेे) : महाराष्ट्र सरकारने नुकताच प्लॅस्टीक बंदी कायदा लागु केल्याने याची सांगवी परिसरात बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. सांगवी व परिसरात लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांकडुन जनजागृती करण्यात येत आहे. येथील भाजी मंडई व बाजारपेठेत याचा परिणाम पहावयास मिळत आहे.

आणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...

नेहमीप्रमाणे गणपत झोपेतून उठला.....एरवी हाताने नाकातला शेमबुड पुसत रडणाऱ्या पोराच्या आवाजाने गणपत उठायचा पण आज मात्र घरात निरव शांतता पसरली होती...! 

Parks, public spaces to stay open longer

In order to tackle the heatwave which has arrived this year much earlier than usual, the disaster management department of the state government has issued a circular to the Pune district administration to prepare an action plan to deal with the situation. The department has also for the first time come up with an advisory asking that all public places like parks, community halls, temples and other such establishments should be kept open during the afternoon so that people can take shelter from sunstroke.

रस्त्याच्या कामांमुळे बाधित होणाऱ्यांना सदनिका

प्राधिकरणाकडून चिंचवड जुना जकात नाका ते रावेत दरम्यानचा ३४ मीटरचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे

अवघ्या 650 मीटरसाठी आळंदीची "कोंडी'

पिंपरी  - आळंदीला बाह्यवळण ठरणाऱ्या चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथील नियोजित रस्त्याला काही शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे सुमारे 650 मीटर लांबीचा हा रस्ता चार वर्षांपासून रखडला असून, आळंदीतील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. भूसंपादन विभागाच्या चुकीमुळे रस्त्याचे काम थांबवावे लागल्याचे काही शेतकऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सगळ्या पंपांवर "सीएनजी' मिळू शकेल; पण...!

पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर "सीएनजी'च्या सार्वत्रिक विक्रीचा विषय प्रलंबित आहे. 



अनाथ मुलांना सरकारी नोकरी व शिक्षणात 1 टक्का आरक्षण

राज्यशासनाचा निर्णय जाहीर
मुंबई – राज्यातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या अनाथांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगण्यासाठी जातीपासूनच्या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुला-मुलींना शासकिय नोकऱ्यांपासून ते शासकिय लाभापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी पात्र होता येत नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथांना 1 टक्के समांतर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अनाथ मुलांना आऱक्षण देण्यासंबधीचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला.

आरोग्य आणि पर्यावरणासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प गरजेचा – महेश लांडगे

चौफेर न्यूज  –  मोशीतील कचरा डेपोला लागलेली आग दुर्दैवी आहे. सहा वर्षाच्या कालखंडानंतर डेपोला आग लागली आहे. शहरातील कच-याची समस्या उग्र होत आहे. नियोजित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पामुळे कच-याची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणासाठी या प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे मत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. तसेच मोशीतील कचरा डेपोला आग लागू नये यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावित. तात्पुरत्या आणि कायमस्वरुपाचा तोडागा काढावा, अशा कडक सूचना देखील त्यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला आग लागली होती. त्यापार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आज (सोमवारी) आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, सह शहर अभियंता अयुब्बखान पठाण, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार लांडगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

[Video] मोशी कचरा डेपो आग प्रकरणी हात कोणाचा ? महेश लांडगे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला लागलेली आग हा निव्वळ योगायोग आहे अशी आगीबाबतची सारवासारव करीत पालिका प्रशासनाची बाजू घेत यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची पालिका प्रशासन काळजी घेईल असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात केले

सलग पाचव्या दिवशी आग

पिंपरी – विद्युत रोहित्राची ठिणगी पडून हॉटेलला आग लागली. या आगीमध्ये हॉटेलसह दोन दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना पिंपरीतील कामगार नगर येथे सोमवारी (दि. 2) पहाटे घडली. सलग पाचव्या दिवशी शहरात आगीची घटना घडली.

युवक राष्ट्रवादीचे “विशाल’ संघटन!

विरोधकांवर सातत्यपूर्ण हल्लाबोल : विशाल वाकडकर यांचा वाढता प्रभाव
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपविरोधात राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने विविध आंदोलनांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण “हल्लाबोल’ केला आहे. आजवर युवक राष्ट्रवादीने 35 आंदोलने करुन शहरातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. परिणामी, महापालिकेत विरोधी पक्षात असतानाही युवकांचे कुशल संघटन बांधून युवक आघाडीचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रशासनावरील अंकूश कायम ठेवला आहे.

सांगवी-पिंपळेगुरव परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला; राष्ट्रवादीकडून आयुक्तांना डास मारण्याची बॅट भेट

पिंपरी (Pclive7.com):- सांगवी-पिंपळे भागात नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. त्याच बरोबर गटरांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.