Tuesday, 10 July 2018

‘पब्लिक बायसिकल शेअरिंग ’ १५ ऑगस्टला सुरू

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुणे स्मार्ट सिटीप्रमाणे ‘पब्लिक बायसिकल शेअर सिस्टीम’ योजना राबविण्यात येत आहे. ‘एरिया बेस डेव्हल्पमेंट’अंतर्गत पिंपळे सौदागर येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना येत्या 15 ऑगस्टला सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 200 सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

पिंपरी चिंचवड़ आयुक्तालय को मिला एक और एसीपी

हाल ही में वरिष्ठ पुलिस निरीक्षक से एसीपी (सहायक पुलिस आयुक्त) पद पर प्रमोशन पाकर पिंपरी चिंचवड़ से ट्रांसफर हुए श्रीधर जाधव को पुनः पिंपरी चिंचवड़ में ट्रांसफर दिया गया। उनके रूप में पिंपरी चिंचवड़ के नए पुलिस आयुक्तालय को एक और एसीपी मिला है। सोमवार को तीन एसीपी के ट्रांसफर के आदेश जारी किए गए जिसमें जाधव को नए पिंपरी चिंचवड़ पुलिस आयुक्तालय में नियुक्ति दी गई है।

पिंपरी चिंचवड आयडॉलची प्रथम फेरी संपन्न

चिंचवड : पिंपरी चिंचवड आयडॉल मोरया करंडक २०१८ या स्पर्धेची पात्रता फेरी शनिवार आणि रविवार दिनांक ७ आणि ८ जुलै  रोजी मनिषा स्मृती निवासभोईरनगरचिंचवड येथे झाली. परीक्षक सुबोध चांदवडकरप्रतिभा थोरातआयोजक हर्षवर्धन भाऊसाहेब भोईरसंयोजिका सुषमा बोऱ्हाडे व मानसी भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेस सुरवात करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड: रूग्णालयात बर्थ डे सेलिब्रेशन, ४० युवकांनी घातला गोंधळ

महाविद्यालयात, उद्यानात, मुख्य रस्त्यावर साजरा होणाऱ्या वाढदिवसाचे लोण आता थेट रुग्णालयात पोहोचले आहे. रूग्णांचा विचार न करता मित्राला सरप्राइज देण्यासाठी तब्बल ४० युवकांनी रूग्णालय परिसरात गोंधळ घालत वाढदिवस साजरा केला. ही घटना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घडली. युवकांनी घातलेल्या गोंधळामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

इंद्रायणीच्या प्रदूषणाची तक्रार केली थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयाकडे

पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणार्‍या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. याकडे पालिकेचा निष्क्रिय पर्यावरण विभाग गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. या नदीच्या प्रदुषणाबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

प्रसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरु करण्यात येणार आहे. पंसती क्रमांकासाठी वाहनधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.

पावसामुळे चिंचवड-चिंचवडगाव मधील रस्त्यांची दयनीय अवस्था

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे चिंचवड-चिंचवडगाव मधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चिंचवडे कॉर्नर तसेच संत नामदेव चौकातील खड्डे दुचाकी वाहनचालकांच्या दृष्टीने अपघातास धोकादायक ठरत आहेत. चापेकर चौकात सिमेंटचे ब्लॉक ठिकठिकाणी उखडले आहेत. या खड्यांची पालिकेने तातडीने दुरुस्ती करावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.

सेवा रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे कोंडी

पिंपरी - कासारवाडीतील सेवा रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. या परिसरात मेट्रोच्या कामाला सुरवात झाली असताना रस्तावरील अतिक्रमणे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दरम्यान, वाहतूक पोलिस आणि मेट्रो या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

चाकण, तळेगावमध्ये आता लॉजिस्टिक पार्क

पिंपरी - उद्योगांकडून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या सोयीसाठी राज्य सरकारने औद्योगिक वसाहतींमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे धोरण ठरवले आहे. चाकण, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यात हे पार्क लवकरच उभे राहणार आहे. त्यामुळे परिसरातील उद्योगांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. 

पिंपरीत मटक्‍याच्या अड्ड्यावर छापा

पिंपरी – पिंपरी पोलिसांनी छापा मारत मटण मार्केटमध्ये मटका खेळणाऱ्या तिघांना आज (दि. 8) अटक केली आहे.
हृषीकेश उर्फ बाळू काळुराफ शिनगारे (वय-38), मोहम्मद मोहसीन खालीद (वय-26, दोघे रा. काळेवाडी) आणि गोविंद रवींद्र सोनवणे (वय-26, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

मेट्रो मार्गात ‘संरक्षण’ची भिंत

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी संरक्षण खात्याची जागा अद्याप महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) मिळालेली नाही. ती प्राप्त करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. मेट्रोच्या खांबांच्या कामासाठीची (वर्किंग परमिशन) अद्याप मिळू न शकल्याने प्राधान्य मार्गाचे (रिच-१) सुमारे चार किलोमीटरचे काम रखडले आहे. येत्या सोमवारी (१६ जुलै) या संदर्भात नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे.

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना वह्याचे वाटप

जुनी सांगवी - प्रत्येकाने समाजाशी असलेली आपली नाळ कायम ठेऊन आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजातील उपेक्षित व गरजू व्यक्तींसाठी खर्च करावा. या उद्देशाने जुनी सांगवी येथील सातारा मित्र मंडळाने साता-यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. 

एसटी स्थानकांत ‘मेडिकल’ कधी?

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्थानकांवर प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत पुण्यासह राज्यातील 568 एसटी स्थानकांवर स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परंतु, त्या उपक्रमाच्या निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यासह पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड आदी एसटी स्थानके जेनेरिक औषधांच्या प्रतीक्षाच करावी लागेल.

पिंपरी-चिंचवडमध्ये खासदारांसमोर संस्थाचालकाला पालकांची मारहाण..

पिंपरी-चिंचवड परिसरातील एका खाजगी शाळेच्या बैठकीत पालकांनी संस्थाचालकाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समोर चोप दिल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसात पालकांनी आणि संस्थाचालकांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

चिखली गावचा संतपीठाच्या माध्यमातून नावलौकीक वाढेल – आमदार लांडगे

चिखली गावाला संत तुकाराम महाराज यांच्यामुळे विशेष महत्व प्राप्त झाले आहे. संत शिल्प या कमानीच्या माध्यमातून त्यामध्ये अधिकची भर पडली आहे. तसेच, संतपीठाच्या माध्यमातूनही नावलौकीक वाढेल, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

Generic drugs to be on special display

Taking a step forward to give a boost to the affordable generic medicines, the central government has decided to make it mandatory for all pharmacies to display generic drugs on a separate shelf. The action will, however, prove to be an exercise in futility unless there are changes in the regulatory mechanism and chemists are allowed to suggest generic products to patients in place of medications prescribed by doctors, they said.

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा

पिंपरी-चिंचवड शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करत असल्याचे सांगत शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला होता. दुस-या दिवशी लगेच सर्व पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देऊन साठे यांना पाठिंबा दर्शविला आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे सादर केले आहेत. यामुळे शहर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन औषध विक्रेत्यांवर कारवाई

गर्भपाताच्या गोळ्यांची 'ऑनलाइन'द्वारे विक्री होत असल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली. आता राज्य सरकारनेच 'ऑनलाइन'द्वारे औषध विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या प्रस्तावीत बदलामध्ये राज्य सरकारने काही बदल सुचविले आहेत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

फेक न्यूजला लगाम लावण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचे नवीन फीचर

चौफेर न्यूज –  सध्या सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होणारे मेसेज मोठा चिंतेचा विषय ठरत असून मोठा धोका व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजमुळे निर्माण झाला आहे. व्हॉटसअ‍ॅपने आता अशा फेक न्यूजला लगाम लावण्यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. युजरला या फीचरच्या मदतीने संशयास्पद लिंकबाबत पडताळणी करता येणार आहे.

पोस्टमनची भरती प्रक्रिया सरकारने करावी

पिंपरीः नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज आणि ऑल इंडिया पोस्ट व एम्प्लॉईज पोस्टमन व एम.टी.एस या संघटनांनी महाराष्ट्रभर संप पुकारला आहे. राज्यातील बेरोजगारांना केंद्र सरकारी नोकरी मिळेल आणि राज्यातील नागरिकांनाही सेवा देता येईल. यादृष्टीने ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी. राज्यभर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक ऑफिसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच कामगार शिल्लक आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 40 ते 45 टक्के पोस्टमन व एमटीएस कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत. सर्वच ऑफिसमध्ये राहिलेल्या कामगारांवर कामाचा बोजा पडत आहे. पोस्टमन कर्मचारी नागरिकांना व्यवस्थित सुविधा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व प्रकारच्या पोस्टमन व एमटीएसच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी व संघटनांनी सरकारकडे केली आहे.