Saturday, 18 April 2020

गस्तीसाठी बजाज ऑटो कडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 29 दुचाकी

एमपीसी न्यूज – शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी बजाज ऑटो कडून 29 दुचाकी पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या वाहनांची गौरसोय लक्षात घेत बजाज ऑटोने हा मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी प्रभावीपणे गस्त घालून त्याची अंमलबजावणी करता यावी यासाठी महिंद्रा कंपनीकडून 11 एप्रिल रोजी 10 कार देण्यात आल्या […]

Corona Update 17th April | Zone wise positive cases and containment areas


महापालिकेने वायसीएम व भोसरी रुग्णालयासाठी २५ आयसीयू बेड, १२ व्हेंटिलेटरची खरेदी

पिंपरी - कोरोनाबाधितांवर उपचारासाठी महापालिकेने वायसीएम व भोसरी रुग्णालयासाठी २५ आयसीयू बेड व १२ व्हेंटिलेटरसह अन्य आवश्‍यक उपकरणे व साहित्य खरेदी केले आहे. तसेच, कंपन्यांच्या सीएसआर फंडाडून तीन व्हेंटिलेटर वायसीएमला मिळाले आहेत. V

PCMC forms tech war room to combat Covid-19


PCMC starts vegetable and fruit centres in 9 wards


मॉर्निग वॉक करणाऱ्यांकडून पोलिसांनी करून घेतली परेड

पिंपरी: मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना निगडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी झटका दिला. सुमारे ३५ नागरिकांकडून परेड, सुर्यनमस्कार तसेच यापुढील काळात नियम मोडणार नाही याची शपथ दिली. शनिवारी (दि. १८) सकाळी ही कारवाई करीत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला. यामध्ये माजी महापौराचाही समावेश आहे. 

राजकारण्यांनो! मदत नको, हस्तक्षेप आवरा

पिंपरी - कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. संक्रमित व्यक्ती शोधण्यापासून त्यांच्यावर प्रभावी उपचार करणे, लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना नियोजन करावे लागत आहे. बंदोबस्तासाठी त्यांना पोलिसांची चांगली साथ मिळत आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे. गोपनीय माहितीसाठी प्रशासनाच्या अगोदर आपापल्या प्रभागात व्हायरल केली जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे "राजकारण्यांनो!, मदत नको पण, हस्तक्षेप आवरा,' असे सांगण्याची वेळ आली असल्याचे गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांवरून दिसते आहे.  

पिंपरीत आठवडे बाजार झाले सुरू; ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना प्रवेश बंदी

पिंपरी : नागरिकांना फळे व भाजीपाला मिळावा, यासाठी शुक्रवारपासून (ता.17) शहरात 16 ठिकाणी आठवडे बाजार सुरू झाले. मात्र, बाजार परिसरात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 5 वर्षांखालील मुलांना प्रवेश नसेल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त अजित पवार यांनी दिली. 

पिंपरीत अंध कलाकारांनी केले डोळसपणे समाजप्रबोधन

पिंपरी - आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात दृष्टी आणि आवाजाला खूप महत्त्व आहे. आवाज दृष्टीहिनांचे सामर्थ्य तर स्पर्श हे माध्यम. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्श हे माध्यम पण त्यांच्यासाठी व्यर्थ ठरले आहे. आपण सर्वजण सिनेमे, टीव्ही पाहू शकतो. सोशल मीडियावर रमू शकतो. खिडकीतून का होईना सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो. किती बोअर झालोय यार असा सूर ही वारंवार आळवतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्रभरातील अंध कलाकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अंध फेरीवाल्यांसाठी दूत ठरले आहेत. एवढ्यावरच न थांबता डोळसांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे.

'डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधे द्या, नाहीतर...'; उपमुख्यमंत्र्यांचे औषध विक्रेत्यांना आदेश!

पुणे : राज्यात सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नोंदणीकृत डॉक्टरच्या परवानगीशिवाय सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीची औषधांची विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पोलीस कर्मचारी आणि पत्नीला करोनाची लागण

पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे

‘अत्यावश्यक’ सेवांतील कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन: अजित पवार

आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. तर आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, पोलीस, होमगार्ड व इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन-मानधन तात्काळ देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. करोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीने हे निर्णय घेतल्याची माहिती समितीप्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली

शहरातील सर्व आठवडे बाजार उद्यापासून सुरू राहणार, महापालिकेचा आदेश

पिंपरी चिंचवड शहरातील भाजीपाला व फळे विक्री पूर्णतः प्रतिबंध करणेत आला होता. या करीता सर्व आठवडे बाजार शनिवार दिनांक ११०४ / २०२० रोजी ६.०० वाजले पासून मंगळवार दिनांक १४ / ४ / २०२० रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत बंद करण्यात आले होते. नागरीकांना फळे भाजीपाला मिळावा याकरीता बंद करण्यात आलेल्या आठवडे बाजार दि. १७ / ४ / २०२० पासून चालु करणेस मान्यता देणेत येत आहे. पुढील आदेश होई पर्यंत आठवडे बाजार खालील अटी / शर्तीस अधिन राहून चालू राहतील, असा आदेश महापालिका प्रशासनाने काढला आहे.

नागरिकांनी सक्षमतेने आपल्या आरोग्याची आणि शहराची काळजी घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षमतेने काम करीत असून नागरिकांनी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तेवढ्याच सक्षमतेने आपल्या आरोग्याची आणि आपल्या शहराची काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. 

घरमालकांनो भाडेकरुंना तीन महिन्याचे भाडे आकारू नका, राज्य सरकारचा आदेश

करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागामार्फत राज्यातील घरमालकांना करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाच्या भीतीने शहरातील खासगी दवाखाने बंद, डॉक्टरही गायब, रुग्णांची गैरसोय

नागरिकांना खरी गरज आहे. त्याचवेळी दवाखाने बंद करून गेलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम केली आहे 

तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणची ‘मिस्डकॉल’ व ‘एसएमएस’ सुविधा

एमपीसी न्यूज – महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ‘लॉकडाऊन’ मुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता यावी यासाठी सोपी व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. त्यानुसार ही सुविधा महावितरणच्या वीजग्राहकांसाठी राज्यभरात सुरु होत […] 

तळवडे परिसरातील तब्बल १५०० कुटूंबांना नगरसेवक पंकज भालेकर यांचा मदतीचा हात..!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनची मुदतही ३ मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे हातावरचं पोट असलेल्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. म्हणूनच सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी गरजूंना मदतीचा हात दिलायं. तळवडे परिसरातील तब्बल १५०० कुटूंबांना भालेकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किराणा साहित्यांचे किट घरपोच केले आहे. 

आणखी काही क्षेत्रांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून वगळण्यात आलं, पहा …

केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निर्देशांमध्ये आणखी काही क्षेत्रांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून वगळण्यात आलं आहे.यामध्ये कृषि, बांधकाम आणि बँकिंग या क्षेत्रांचा समावेश आहे. सरकारकडून या संदर्भात सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत. २० एप्रिलनंतरच ही सूट लागू होणार आहे. 

भोसरीचा ‘अन्नदूत’: लोकसहभागातून ११ हजारहून अधिक कुटुंबांना अन्नधान्य!

– महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकसहभाग असलेला ‘एक हात मदतीचा’
– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा आदर्शवत उपक्रम

पुणे जिल्ह्यात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात १०० खासगी उद्योगांचे योगदान

पिंपरी - कोरोना विरूद्धच्या लढ्यात पुणे जिल्ह्याच्या परिसरातील सुमारे १०० खासगी उद्योग सीएसआर निधी, वस्तू किंवा देणगी स्वरुपात योगदान देत अाहेत. त्यामुळे, विविध रुग्णालयांना पीपीई कीट, मास्क यासारख्या अत्यावश्यक वस्तू पुरविणे शक्य होत आहे. 

रहाटणीचे संदीप नखाते बनले अन्नदूत, तब्बल १०० कुटुंबीयांची भागवली भूक

रहाटणी परिसरातील गरजु १०० कुटुबांना स्विकृत नगरसेवक संदिप नखाते यांच्या वतीने धान्य व सॅनिटाईझरचे सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.