MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 21 November 2017
शहराला दोन वर्षांत २४ तास पाणी
पिंपरी - शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या साह्याने २४४ कोटी रुपयांचा प्रकल्प येत्या महिन्यात हाती घेण्यात येत आहे. दोन वर्षांत तो पूर्ण केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण शहर पाणीपुरवठ्याच्या २४ बाय ७ योजनेत येणार आहे.
लाखोंच्या महसुलावर पालिकेकडून पाणी
पिंपरी - पुनर्वसनानंतरही पत्राशेड कायम, फेरीवाल्यांकरिता ओटे बांधूनही भाडेवसुली नाही, मोकळ्या जागी भंगार आणि प्लॅस्टिक वेचकांची गोदामे, अस्वच्छता आणि महापालिकेच्या इंच-इंच जागेसाठी लढणाऱ्या फेरीवाल्यांच्या जागेवर आणि महसुलावर महापालिकेने अक्षरशः पाणी सोडले आहे.
देहुरोड-निगडी रस्ता धोकादायक; संथ गतीने काम सुरू
- असुरक्षितता व खड्ड्यानी अपघातांत वाढ
- जड वाहनांचा प्रवेश बंदी कागदवरच
- वाहतूक कोंडी, धुळीने नागरीक त्रस्त
देहुरोड, (वार्ताहर) – राज्य रस्ते विकास महामंडळाने गतवर्षी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील निगडी ते देहुरोड रस्त्याचे चौपदरीकरण सुरू केले. वाहतुकीची सुरक्षितता आणि खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती, जड वाहनांकडे ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढले आहेत. कि. मी. 20.400 ते कि. मी. 26.540 दरम्यानच्या 6.140 कि. मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मुंबईतील पी.बी.ए. इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले आहे. त्यासाठी 39 कोटी 6 लाख 13 हजार 892 रुपये खर्चाची तरतूद केली आहे.
World Bank senior advisor raises objections to PCMC's 'waste-to-energy' project
Vishwas Jape, senior advisor to the World Bank, has raised objections to the ‘waste-to-energy’ plant planned by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) at its Moshi garbage depot. He has laid emphasis on the use of unsegregated waste, which, according to him, can generate energy and save crores for the PCMC.
From December 1, link Aadhaar to phone number from home
PUNE: The Unique Identification Authority of India (UIDAI) has simplified the process for linking mobile phone numbers with Aadhaar. The new process, to be implemented from December 1, will particularly help senior citizens and the differently-abled, who need not go to service providers but will be able to do the linking sitting at home.
रिंगरोड फेरबदलाची कार्यवाही व्हावी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महापालिका हद्दीतील प्रस्तावित रिंगरोडच्या फेरबदलाबाबत नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बाधितांवर कारवाई करू नये, अशी अपेक्षा घर बचाओ संघर्ष समितीने व्यक्त केली आहे. याउलट, अनधिकृत बांधकामात प्रोत्साहन देणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात धावणार पाच हजार सीएनजी स्कूटर
पिंपरी - आतापर्यंत चारचाकी वाहनांना उपलब्ध असणारी सीएनजीची सुविधा आता दुचाकी स्कूटरला उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील पाच हजार स्कूटर्सना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २४) केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार आहे.
गुलाब, जरबेरा, गजऱ्यांना मागणी
पिंपरी – लग्न सराईची धामधूम दिसू लागली असून, फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. डेकोरेशनसाठी लागणारे गुलाब, जरबेरा यासह महिलांकडून गजऱ्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या फुलांचे भाव वाढले आहेत.
थंडीमुळे अंड्यांच्या भावात मोठी वाढ
पिंपरी – थंडीमुळे वाढलेली मागणी व पोल्ट्रीफार्मकडून होणारा कमी पुरवठा यामुळे अंड्यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच रुपयांना विक्री होणाऱ्या अंड्याचा भाव रविवारी सात रुपयांवर पोचला होता. यामुळे अंड्यांचा डझनाचा भाव 80 रुपये, तर शेकडा भाव 700 रुपये झाला आहे.
थंडीत वरूणराजाची हजेरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत ऐन थंडीत पावसाची रिमझिम पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने थंडीत पावसाळी वातावरण तयार झाले.
मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. याचीच प्रचिती पावसाच्या स्वरूपात वरूण राजाने लावलेल्या हजेरीने दिसून आली. त्यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, रावेत, निगडी, प्राधिकरण भागासह पुणे आणि मावळमधील काही भागात सोमवारी दुपारनंतर पावसाने अचानक हजेरी लावली. भर हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये पावसाचीच चर्चा रंगली. अचानक आलेल्या पावसाने वाहतुकीचा थोडा खोळंबा झाला. ऐन हिवाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य होत आहे.
पिंपरीत प्रशासनाकडून अन्न विक्रेत्यांना स्वच्छतेचे धडे!
अन्न व औषध प्रशासनाने शहरातील अन्न विक्रेत्यांसाठी घेतलेल्या स्वच्छता कार्यशाळेला फेरीवाले- टपरीधारकांसह अन्न विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद केलेल्या ८५ विक्रेत्यांना परवाने व ॲपरन देण्यात आले. पिंपरीतील कै. लोखंडे सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
विधीसह स्थायीत ऐनवेळचे विषय दाखल करू नका; न्यायालयात जाण्याचा शिवसेनेचा इशारा
पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीच्या सभेमध्ये अजेंड्यावरील विषय तहकूब करून ऐनवेळचे विषय मंजूर केले जात आहेत. ऐनवेळचे विषय घेण्यामध्ये ‘विधी’चे सभापती राजकारण करत आहेत. त्यामुळे यापुढे ‘विधी’, स्थायी समितीसह कोणत्याही विषय समितीत एकही ऐनवेळचा विषय घेऊ नयेत. अन्यथा या विरोधात न्यायालयात जाऊ, आंदोलने करु असा, इशारा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिला आहे.
मनसे-सेनेच्या संचालकांना स्मार्ट सिटीच्या निर्णयप्रकियेतून ‘डच्चू’
स्मार्ट सिटी संचालकपदी नियुक्त झालेल्या मनसे आणि शिवसेनेच्या संचालकांना निर्णयप्रक्रियेतून सत्ताधारी भाजपने एकप्रकारे डिच्चू दिला आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी स्थानिक संचालकांची सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली, परंतु त्यात मनसेचे सचिन चिखले व शिवसेनेच्या प्रमोद कुटे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधा-यांच्या कुरघोडीमुळे स्मार्ट सिटीला वादाचे ग्रहण कायम असून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आता अधिकारी परदेश दौऱ्यावर!
पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे स्पेन दौऱ्यावर, आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन दौऱ्यावर गेले असतानाच आता पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण हेही परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दोघांचा फिलिपाईन्स दौरा खासगी संस्थेने स्पॉन्सर केल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. मात्र, करदात्या नागरिकांच्या खर्चाने पालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या परदेश दौऱ्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पिंपरी न्यायालय स्थलांतरणाबाबत न्यायाधिशांच्या सूचना
पिंपरी – मोशीतील कोर्टाच्या नियोजित सुसज्ज इमारतीबरोबरच मोरवाडी कोर्टाच्या स्थलांतराबाबत पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी व उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय न्यायाधिशांची एकत्रित बैठक पुण्यात पार पडली. नव्या जागेतील इमारतीमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या इमारतीमधील नियोजित न्यायालये व या इमारतीच्या भाड्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
….तर टीपी स्कीमसाठी म्हाळुंगे पॅटर्न
पुणे– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) राबवित असलेल्या म्हाळुंगे- माण नगररचना योजनेमध्ये (टीपी स्कीम) सर्व जमिन मालकांचा फायदा आहे. यामध्ये कोणीही शेतकरी वंचित होणार नाही. टीपी स्कीममध्ये सर्व शेतकऱ्यांचा फायदा आहे. पीएमआरडीएची म्हाळुंगे – माण ही पहिली टीपी स्कीम असून ती यशस्वी करू. यामुळे नविन सुंदर वसलेल शहर तयार होईल. त्यामुळे टीपी स्कीमसाठी म्हाळुंगे पॅटर्न राज्यात निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
Subscribe to:
Posts (Atom)