PCMC has actually received Rs1,390 crore. LBT is the biggest revenue earner for the civic body. The monthly LBT collection ranged from Rs39.65-52.21 crore in this fiscal. It also received monthly grants from state government ranging from Rs28.86-63.60 ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 3 April 2017
मेट्रोमार्ग उभारणीसाठी विदेशी कंपन्या उत्सुक
शिवाजीनगर ते हिंजवडी हा साधारणतः २२ किमीचा संपूर्ण उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग असून, या मार्गावर २३ स्टेशन असतील. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे शहरात विकसित करण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या ...
पिंपरी महापालिकेत 'आर्थिक तिढा'
आतापर्यंतच्या 'परंपरे'चा संदर्भ देत आर्थिक वर्ष संपल्यानंतरही बिले स्वीकारावी, असा ठेकेदारांचा आग्रह व त्यास मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी दाखवलेली असमर्थता, यावरून पिंपरी पालिकेत 'आर्थिक तिढा' निर्माण झाला आहे. सर्वाची ...
पिंपरी टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र
पिंपरी - शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आणि न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी सांगितले.
टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय यांच्यातर्फे पिंपरीमधील टपाल कार्यालयात नव्याने सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बारणे बोलत होते. आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर नितीन काळजे, पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी अतुल गोतसुर्वे, पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्वर, डाक विभागाच्या संचालिका सुनीता अयोध्या, वरिष्ठ पोस्टमास्तर अभिजित बनसोडे उपस्थित होते.
‘स्वीकृत’बाबत भाजपचे गुप्तगू
पिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली आहेत. सभागृहातील पक्षाचे बळ पाहता भाजपच्या वाट्याला तीन जागांवर सदस्य नियुक्त करता येणार आहेत.
‘निगडी-देहूरोड’ चौपदरीकरणास गती
देहूरोड - रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या निगडी ते देहूरोड चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. एक डिसेंबर २०१६ रोजी काम सुरू झाले आहे. गेल्या चार महिन्यांत चौपदरीकरणासह मार्गातील उड्डाण पुलाच्या प्राथमिक स्तरावरील विविध पातळ्यांवरील कामे अंतिम टप्प्यात आहेत.
सत्ता बदलली अन् नेत्यांच्या भिंतींवरील प्रतिमाही!
महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या दालनातील भिंतींवर अनेक वर्षे स्थिरावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या छबींची जागा आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या छबींनी घेतली आहे. विविध दालनांच्या भिंतींवरील नेत्यांच्या प्रतिमांचेही परिवर्तन होताना दिसत आहे.
‘स्वाइन फ्लू’ची औषधे आता सर्व मेडिकलमध्ये
पुणे - स्वाइन फ्लूवर रामबाण ठरलेली औषधे राज्यातील औषध दुकानांमधून उपलब्ध होणार आहेत. त्या बाबतचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.
राज्यात जानेवारीपासून स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या रोगामुळे राज्यात आतापर्यंत ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लूची औषधे आता सर्व औषध दुकानांमध्ये उपलब्ध करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात गेल्या आठ वर्षांपासून स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. या रोगावर उपचार करण्यासाठी ‘टॅमिफ्लू’ हे औषध प्रभावी
Subscribe to:
Posts (Atom)