Monday, 12 February 2018

[Video] #MetroFromNIGDI नागरिकांच्या उपोषणाला राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद! पहा कोण काय म्हणाले?

पीसीसीएफ फेसबुक लाईव्हद्वारे आम्ही नागरिक, राजकीय नेते, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचे मुलाखतीद्वारे मत जाणून घेतले. वरील हेडलाईनवर क्लीक करा थेट व्हिडीओ लायब्ररी उघडेल.

मेट्रोची अर्धवट “झूल’

रडत-खडत मेट्रो प्रकल्प “यार्डा’तून बाहेर आला. परंतु, पहिल्या टप्प्यात निगडीऐवजी पिंपरीपर्यंतच मेट्रो नेण्याचा हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. मेट्रो शहरात येणार पण अर्ध्या रस्त्यावर सोडणार ही कल्पना शहरवासियांच्या पचनी पडत नाही. मेट्रो सिटीच्या “ब्रॅंडींग’लाही त्यामुळे बाधा आली आहे. पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या माध्यमातून या अर्धवट प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभे राहिले आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी निधी देण्यास केंद्र व राज्य शासनाने हात वर केले आहेत. त्यामुळे महापालिकेला स्वखर्चावर हा मार्ग पूर्ण करावा लागेल. परंतु, महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ही बाब अशक्‍य दिसत आहे.

निगडीपासून मेट्रोकरिता पिंपरीत धरणे आंदोलन

पिंपरी - पुणे मेट्रोचा नियोजित मार्ग पिंपरी ऐवजी निगडीपासून सुरू करावा, या मागणीकरिता पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने रविवारी (ता. ११) पिंपरीत धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेतील गटनेते राहूल कलाटे सहभागी झाले होते. या आंदोलनास राजकीय पक्षांसह ३० सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शवित आंदोलनात सहभाग घेतला आहे.

अडथळे दूर करून निगडीपर्यंत मेट्रो होणार: पक्षनेते एकनाथ पवारांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन

पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत रविवारी (दि.11) लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी यात सहभागी झाल्या होत्या.रम्यान, सर्व अडथळे दूर करून पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

अडथळे दूर करून निगडीपर्यंत मेट्रो होणार: पक्षनेते एकनाथ पवारांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन

मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेणारच – महेश लांडगे


पिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या मेट्रो पिंपरी पर्यंत येणार असून पुढील मार्ग वाढविण्यासाठी येत असलेल्या नेमक्या अडचणी जाणून त्यावर उपाय काढून पिंपरी ते निगडी पर्यंतच्या मेट्रो कामाला हिरवा कंदील लवकरच दाखवण्यात येईल, असे मत भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेणारच - महेश लांडगे

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण

पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत आज लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण

निगडीपर्यंत मेट्रो; स्वयंसेवी संस्थांचे उपोषण

पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक व स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी एका दिवसांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि.11) आंदोलन झाले. आंदोलनास भेट देऊन खासदार, आमदार, नगरसेवक व महापालिका पदाधिकार्‍यांनी या मागणीस  पाठींबा दिला.  

दापोडी-निगडी ‘बीआरटी’ कधी धावणार

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी या महत्वाकांक्षी बीआरटी मार्गिकेवर (लेन) बस थांबा, रस्त्यांवर पांढरे व लाल पट्टे, वाहतूक नियंत्रक दिवे, दिशादर्शक फलक, गतीरोधक, डांबरीकरण, बॅरीकेट्स आदी सातत्याने होणारी कामे पाहून नागरिक अक्षरशा वैतागले आहेत. पुढील महिन्यात, पुढील महिन्यात, असे सांगत आयुक्त व प्रशासनाने 2017 घालविले. नवीन वर्षांचा सव्वा महिना उलटला. तरी बससेवा सुरूच झालेली नाही. कधी एकदाची या मार्गावरून बस धावते, याचे वेध त्रस्त वाहनचालक व पादचार्‍यांना लागले आहेत.

PCMC to start work on first lap of ring road

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon start constructing the first portion of high capacity mass transit route (HCMTR) in Rahatni and Pimple Saudagar, which will ease travel for IT professionals living in Pimple Saudagar to Hinjewadi IT Park and Mumbai-Pune Expressway.

Metro stations to get platform screen gates & doors at Rs 170 crore

To prevent accidental falls, suicides and homicides, the Maharashtra Metro Rail Corporation Limited (Mahametro) has taken a decision to install platform screen gates (PSGs) at 25 elevated and platform screen doors (PSDs) at five underground Metro rail stations in the city.

MahaMetro installs first girder at Kharalwadi

Pimpri Chinchwad: The Maharashtra Metro Rail Corporation has installed the first girder on two pillars at Kharalwadi.

PCMC to approach high court to vacate stay on BRTS lane

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will submit a safety audit report of the Dapodi-Nigdi Bus Rapid Transport System (BRTS) in the Bombay high court on February 12, to vacate the stay on launching the BRTS service.

On February 2, IIT-B submitted a revised report to the PCMC regarding safety features with new suggestions. Now, PCMC will submit the report, along with photographs of the safety measures undertaken, in the high court on February 12 to vacate the stay order. 

BRTS launch on NH4 awaits high court nod

Pimpri Chinchwad: The civic body, which has implemented the suggestions made by the Indian Institute of Technology (IIT), Bombay, will also put in place some minor safety measures on Pune-Mumbai highway before launching the Bus Rapid Transit System, joint city engineer Rajan Patil said.

Nigdi residents irked by open gutter for a week

Citizens visiting Pradhikaran face traffic jams due to broken cover, around which makeshift plants are placed as a warning

Residents swim in childhood memories as Pavana sparkles after clean-up drive

PIMPRI CHINCHWAD: For 95 days, hundreds of volunteers from various social organizations laboured to free Pavana river of water hyacinth.

A little over three months ago, organizations like Pimpri Chinchwad Citizens Forum (PCCF), Bhavsar Vision and Nisargamitra followed the lead of the Rotary Club of Walhekarwadi, and together removed 550 truckloads of water hyacinth from the river.

Image may contain: sky, outdoor, nature and water

एम्पायर इस्टेट पूल पूर्णत्वाकडे

पिंपरी - एम्पायर इस्टेटसमोरून जाणाऱ्या पुलाचे काम मार्चमध्ये पूर्ण होण्याची शक्‍यता असून या मार्गावरील बीआरटीची कामे जूनपर्यंत संपविण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडत शहरातील नागरिकांना पूर्वेकडून पश्‍चिमेकडे या दीड किलोमीटर लांबीच्या पुलावरून जाता येईल. काळेवाडी फाट्यापासून हा रस्ता सुरू होत असून त्यानंतर पुलावरून ऑटो क्‍लस्टरपर्यंत तसेच पुढे केएसबी चौक, चिखलीगावापर्यंत जाता येईल. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून वाहनांना आणि बीआरटीला स्वतंत्र मार्ग असेल.

देहूचा पालिकेत समावेश नको नगरपंचायत करा

देहू - देहूचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करू नये, तसेच देहूची स्वतंत्र नगरपंचायत करावी, अशी मागणी देहूतील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरपंचायतीसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

प्राधिकरणाची भूखंड विक्री थांबवा

पिंपरी – प्राधिकरणाने संपादित केलेल्या भूखंडाचा साडेबारा टक्के परतावा अद्याप एकाही शेतकऱ्याला मिळाला नसताना प्रशासनाकडून निवासी भूखंड विक्री केले जात आहेत. ही प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी केली आहे.

ड्रेनेजलाईन फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर

पिंपरी – विकास कामांच्या बाबतीत महापालिकेने कायमच दुर्लक्ष केलेल्या थेरगाव भागातील जुन्या ड्रेनेजलाईन फुटल्याने सांडपाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे. नागरिकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे याबाबत संताप व्यक्त होत आहे.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाची शंभरी

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई – उगम ते संगम’ या अभियानाला आज (रविवार, दि. 11) रोजी तब्बल शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसांमध्ये या अभियानात विविध सामाजिक संघटना व वैयक्तिकपणे नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच या अभियानामध्ये मागील आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी देखील सहभाग नोंदविला.

रनेथॉन ऑफ होप २०१८ च्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सचिन पाटील प्रथम; सात हजार स्पर्धकांनी घेतला भाग

रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनमॅरेथॉन ऑफ होप २०१८ च्या मॅरेथॉन स्पर्धेत  कोल्हापूरच्या सचिन पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत सात हजार स्पर्धकांनी भाग घेतला.

नगरसेवक नाना काटेंच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी व वीणापूजन करून हरिनाम सप्ताहाला सुरूवात

पिंपळेसौदागर येथे प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १७ फेब्रुवारीदम्यान हा सोहळा चालणार आहे. नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी व वीणापूजन करून या हरिनाम सप्ताहाला सुरूवात करण्यात आली.

महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची आमदार महेश लांडगे यांची सूचना

भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिका-यांना केल्या आहेत. तसेच नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना देखील लांडगे यांनी केल्या.

वाकडमधील अडीच किलोमीटर लांबीचे उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून उभारण्याचे नियोजन – नगरसेवक संदिप कस्पटे

हिंजवडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याबरोबरच महत्त्वाचे मार्गही सक्षम करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यानुसार वाकड येथील कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु, एवढा मोठा उड्डाणपूल उभारण्याचा खर्च महापालिकेला पेलवणारा नाही. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारने करावा यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामार्फत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी दिली.

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

पोलिस ठाण्यात तक्रार देताना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन फसवणूक, रस्त्यावर लुबाडल्यानंतर पोलिसांची मदत कशी घ्यावी, असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडतात. या संदर्भात नागरिकांकडून ‘सकाळ’ने प्रश्‍न मागविले होते. या प्रश्‍नांना पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेली उत्तरे.

‘नायलॉन’ मांजावर बंदीसाठी लोकशिक्षणासह जनजागृती हवी

पशुपक्ष्यांसह मानवी जीवनाला घातक ठरत असल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) काचेचे लेपण लावलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम दोऱ्यांपासून बनवलेला ‘मांजा’ उत्पादन, साठा, विक्री व खरेदीवर बंदी घातली आहे. तरीही पतंगासाठी नायलॉन, गट्टू आणि तंगुस मांजा या सांकेतिक नावाने ‘चायनीज’ व भारतीय बनावटीचा मांजा सर्रास विकला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घातक मांजा न वापरण्याबद्दल माहिती देणे, सामूहिक प्रतिज्ञेचा उपक्रम राबविला पाहिजे. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा असली तरी भारतीय दोऱ्याचा वापर करावा. याबाबत डॉ. कल्याण गंगवाल यांच्याशी यशपाल सोनकांबळे यांनी साधलेला संवाद...

टांझानियातील किलीमांजरो पर्वतावर शिवजयंती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सह्याद्रीचे मावळे अनिल वाघ, क्षितीज भावसार आणि रवी जांभूळकर हे युवक. 19 फेब्रुवारीला साजरी होणारी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील सर्वात उंच माऊंट किलीमांजरो या पर्वतावर साजरी करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे, सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाणार आहे.

Shiv Sena MP threatens to approach PMO regarding irregularities in PCMC tendering process

The ruling Bharatiya Janata Party (BJP) at Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been facing flak from the opposition parties for its tendering processes. The latest criticism has come from Shiv Sena MP Shivajirao Adhalrao Patil who threatened to approach the Prime Minister’ss Office (PMO) and Enforcement Directorate (ED) over alleged irregularities and financial bungling.