Thursday, 6 December 2018

“पीसीएमसी’ चे संकेतस्थळ देशात सर्वोत्कृष्ट

पिंपरी – दिव्यांगांना हाताळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ देशात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. अशा प्रकारचे पारितोषिक मिळवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

चिखली, कुदळवाडी भागातील भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे ‘नोटीसा’

आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा
पिंपरी : चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. भंगार व्यावसाय सात दिवसात बंद करावेत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिल्या 5 नोव्हेंबर रोजी दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 80 व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Plans afoot to construct flyover to Hinjewadi

The civic body plans to construct a flyover from Wakad to Hinjewadi, along the Pune-Bengaluru highway, for the benefit of IT professionals who are stu.

“युथ गेम्स’साठी महापालिका मोजणार 36 लाख रुपये

पिंपरी – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत “खेलो इंडिया युथ गेम्स-2019′ होणार आहेत. बालेवाडीत होणाऱ्या स्पर्धेसाठी महापालिका 36 लाख रुपये खर्च करणार आहे.

महापालिकेचे “स्टेअरिंग’ कधी सांभाळणार?

“श्रीमंत’ महापालिकेचा गाडा सुरळीतपणे हाकण्यासाठी भाजपकडून राहुल जाधव यांना संधी देण्यात आली आहे. रिक्षा चालक ते महापौरपदापर्यंत झेप घेतलेल्या जाधव यांनी नुकतीच रिक्षा चालवत माजी महापौरांचे सारथ्य केले. तर पीएमपीची ई-बस चालवत जोरदार “फोटोसेशन’ केले. भाजपच्या धोरणानुसार जाधव यांना सव्वा वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यापैकी तीन महिन्यांचा कालावधी त्यांनी पुर्ण केला आहे. मात्र, महापालिका कारभारात त्यांचा “नवनिर्वाचितपणा’ अद्याप कायम आहे. शहरावर पाणी कपातीचे संकट आहे. कचऱ्याचा प्रश्‍न जटील होत चालला आहे. महापालिका प्रशासकीय कारभारात कोणाचा कोणाला पायपोस राहिलेला नाही. सत्ताधारी नगरसेवकच विविध प्रश्‍नांवरुन “घरचा आहेर’ देत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कारभाराचे “स्टेअरिंग’ महापौर कधी सांभाळणार, असा प्रश्‍न सामान्यांमधून उपस्थित होत आहे.

निगडी-भेकराईनगर मार्गावर ई-बसची “ट्रायल’

पुणे – दाखल झालेल्या इलेक्‍ट्रिक बसची निगडी-भेकराईनगर मार्गावर “ट्रायल’ घेण्यात आली. ओलेक्‍ट्रा (बीवायडी) कंपनीची 12 मीटर लांबीची बीआरटी मार्गावर धावणारी ही बस आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू केलेली “ट्रायल’ रात्री उशिरापर्यंत सुुरू होती.

पिंपरी कॅम्पातील बांधकाम अतिक्रमणावर कारवाई

चौफेर न्यूज – – पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज बुधवारी (दि. 5) कारवाई केली. दुकानासमोर वाढविलेले छत, फुटपाथ आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका स्थायी समितीची 93 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 93 कोटी 28 लाख सहा  हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. मनपाच्या स्थापत्य विभागाकडील भोसरी ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पुर्वरत […]

कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील उर्वरित कामासाठी पावणेनऊ कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीतील गावजत्रा मैदानालगत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या केंद्रातील उर्वरीत कामे करण्यासाठी आणखी पावणेनऊ कोटी रूपये खर्च होणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने आज (मंगळवारी)मंजुरी दिली.   भोसरी येथे सर्व्हे क्रमांक एक मध्ये गावजत्रा मैदानालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. […]

च-होलीतील 30 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी 38 कोटी रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी च-होलीतील रस्ते विकासावर चांगलाच भर दिला आहे. प्रभाग क्रमांक तीन च-होली परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी येणा-या 50 कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने आज (मंगळवारी)मंजुरी दिली. 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल 38 कोटी रुपये खर्च येणार आहे.  गेल्या 10 वर्षात केवळ रस्त्यांच्या कामांवर महापालिकेने अब्जावधी रुपयांचा खर्च केला […]

‘बेस्ट’ने नाकारले; ‘पीएमपी’ने स्वीकारले!


शहरबात : वारेमाप उधळपट्टीमुळे उत्पन्नवाढीच्या उद्देशाला हरताळ

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांवरील कारवाई रद्द करावी, असे साकडे घालण्यात आले.

#LanguageLab पुण्यात अनोखी भाषा प्रयोगशाळा

पुणे - आपल्याला कोणतीही नवीन भाषा शिकायची, तर शिक्षकाची गरज असते, पण आधुनिक काळात संगणक हाच भाषा शिकविणारा शिक्षक झाला तर... ही केवळ कल्पना नसून प्रत्यक्षात साकारली आहे ती आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेने. रागावून, ओरडून, मारून भाषा शिकविणाऱ्या काही शिक्षकांपेक्षा चिडचिड न करणारा संगणक विद्यार्थ्यांना मित्र वाटू लागला आहे. असा हा वेगळा शैक्षणिक प्रयोग पुण्यात सुरू आहे.   

“डास उत्पत्ती’ त सांगवी आघाडीवर

पिंपरी – शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण आढळू लागले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आजार पसरणाऱ्या डासांचा उपद्रव शहरात वाढू लागतो. परंतु यावर्षी जलपर्णीमुळे ऑक्‍टोबर महिन्यापासून डासांचा उपद्रव आणि आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने शहरातील प्रत्येक ठिकाणी निरीक्षण आणि परिक्षण केले. या परिक्षण अहवालानुसार नदी प्रदूषण, जलपर्णी आणि डास उत्पत्तीमध्ये सांगवी परिसर सर्वांत पुढे आहे.

Cops interact with hsg socs in Wakad

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad police has directed housing societies located in Wakad and surrounding areas to sign security contracts with ag.

Breaking traffic rules in Hinjewadi IT park: Traffic police to press IT firms for action against techies

बार्सिलोना दौऱ्याबाबत झालेली ‘एकजूट’ भविष्यकाळात कायम टिकावी – सचिन साठे

पिंपरी (Pclive7.com):- बार्सिलोना दौऱ्याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा करण्यासाठी महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते आणि आयुक्तांची झालेली ‘एकजूट’ भविष्यकाळात कायम टिकावी आणि पिंपरी चिंचवड शहरवासियांना भेडसावणारे सर्व प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदिंची एमएसएमई उद्योजकांसाठी 59 मिनीटात एक कोटी घोटाळेबाज कर्जयोजना – आप्पासाहेब शिंदे

पिंपरी (दि. ३ डिसें. ) :-  पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या ‘एम. एस. एम. ई. उद्योजकांसाठी ५९ मिनिटात १ कोटी कर्जयोजना’ ही फसवी, निराधार, घोटाळेबाज योजना असून, केवळ निवडणुकीत सहकार्य केलेल्या आपल्या जुन्या मित्रांना आर्थिक मदत करून अर्थसंबंध जपण्यासाठी चराऊ कुरण आहे. देशात अनेक राष्ट्रीयीकृत बँका या कामासाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे या कामाची जबाबदारी न देता मोदींनी गुजरातस्थित एका संस्थेस या कामाचे कंत्राट दिले आहे.  ‘उद्योजकांच्या हितासाठी’ या गोंडस नावाखाली एम. एस. एम. ई. चा आधार घेत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा हेतू हाणून पाडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा, पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमेर्स, सर्विसेस अँड अग्रीकल्चर या संस्थेचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

आयएमएच्या पिंपरी,चिंचवड भोसरी शाखेला मिळाले ४ पुरस्कार

एमपीसी न्युज – इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने मुंबई येथे आयोजित केलेल्या मॅस्ट्कॉन २०१८ या वैद्यकीय परिषदेत इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड -भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर यांना उत्कृष्ट अध्यक्ष , तर तर डॉ संजीव दात्ये यांना उत्कृष्ट सचिव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. तसेच पिंपरी-चिंचवड- भोसरी शाखेच्या वतीने सुरू केलेल्या स्पंदन त्रैमासिकाला मिळालेल […]

नवउद्योजकांना आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार

शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ’अ‍ॅटो हब’ म्हणून ओळख  : आयुक्त 
बीएनआयच्या ‘मिलान्ज एक्स्पो’ चे उद्घाटन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवउद्योजक, लघुउद्योजक, कंपन्यांना नेहमीच सहकार्य करते. महापालिकेकडून दिलेल्या पायाभूत सुविधा आणि एमआयडीसीचे भूखंड मागील कालावधीत विकसित झाल्यामुळे शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ’अ‍ॅटो हब’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी महापालिका अ‍ॅटो क्लस्टर तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारले आहेत. त्या माध्यमातून टोमोबॉईल, रोबोटिक्स, स्वयंचलित कार, इलेक्ट्रिक कार उद्योगात येणार्‍या नव उद्योजक, कंपन्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.