Tuesday, 5 May 2020

सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांची स्वेच्छानिवृत्ती प्रशासनाने नाकारली!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिका-यांवर होत असलेल्या अन्यामुळे विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज प्रशासनाने नाकारला आहे. तुपे यांची प्रशासनाला आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची स्वेच्छानिवृत्ती नाकारली आहे. दरम्यान, तुपे यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. यापुढील काळातील निव्वळ देय रकमेतून 50 टक्के रक्कम कोरोनाच्या जनजागृतीसाठी त्यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड […]

COVID-19 PCMC War Room | 4 May - City Dashboard


COVID-19 PCMC War Room | 4 May - Zone wise stats


वृत्तपत्रांचा कडेलोट, नव्हे पोपटाने मान टाकली का? | कोरोना आख्यान भाग ९ - अविनाश चिलेकर

मध्यमवर्गाची व्यथा, आई जेवू घालेना अन् बाप भीक मागू देईना | कोरोना आख्यान भाग ८ - अविनाश चिलेकर


वर्क फ्रॉम होम कल्चर अंगलट येऊ शकते | कोरोना आख्यान भाग ७ - अविनाश चिलेकर


हिंदूस्तान अँटीबायोटीक्स कंपनीने पालिकेला दिले 12500 लिटर हँड सॅनिटायजर

#PCMCUpdates
दिनांक ०४ मे २०२०- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपाय योजनेला सहाय्य म्हणून #HindustanAntibioticsLtd यांच्या वतीने रुग्नालयासाठी आवश्यक १२,५०० लिटर इतके #HandSanitizer मा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे कंपनीच्या प्रबंध निर्देशिका गिरिजा सराफ यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी हिंदूस्तान अँटीबायोटीक्स लि. सहाय्यक व्यवस्थापक निता घोष व जनसंपर्क अधिकारी अविनाश थोपटे उपस्थित होते.


सैन्य दलाकडून पिंपरी चिंचवड पोलिसांचा सत्कार; लष्कराकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना

एमपीसी न्यूज – भारतीय सैन्य दलाच्या वतीने कोरोना विषाणूशी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढाई लढणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांचा सत्कार करण्यात आला.  लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करत सर्व कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्त […]

महापालिका एक कोटी रुपयांचे जंतूनाशक खरेदी करणार; स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना कोविड १९ या प्रादुर्भाव नियंत्रणच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ब्याक्टोडेक्स हे जंतूंनाशक खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या १ कोटी ३७ लाख, वायसीएम रुग्णालयासाठी २ नग सोनोग्राफी कलर डापलर उपकरण खरेदीसाठी येणार्‍या ८८ लाख ६७ हजार खर्चासह शहरात करण्यात येणा-या इतर विविध विकास कामांसाठी येणार्‍या एकूण ९ कोटी […]

Video : आता पाच मिनिटांत कळणार ‘फिट की अनफिट’; कसे ते पहा?

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने भारतात प्रथमच तब्बल २२ आरोग्य तपासण्यांसाठी ‘हेल्थ एटीएम’ डिजिटल मशिनचा प्रयोग सुरू केला आहे. कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी प्राथमिक चाचण्यांसाठी विनाडॉक्‍टर असलेले हे मशिन उपयुक्त ठरणार आहे. अवघ्या पाच मिनिटांत तुम्ही ‘फिट आहात की अनफिट’ हे या एटीएमच्या माध्यमातून मिळणाऱ्या रिपोर्टने कळेल. यामुळे एचए कंपनीला नवसंजीवनी मिळणार आहे.b

DRDO नं बनवलं ‘Uv ब्लास्टर टॉवर’, 10 मिनिटांत संपुर्ण रूम होईल व्हायरस’फ्री’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोमवारी देशात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढून 42836 वर पोहोचली आहे. तसेच, देशात आतापर्यंत 1389 लोकांचा मृत्यू झाला आहे. देश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका पाहता लस, औषध आणि इतर आवश्यक उपकरणे वैज्ञानिक स्तरावर तयार करण्याचे काम चालू आहे. दरम्यान, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) एक खास उपकरण बनवल्याचा दावा केला आहे. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार यूव्ही (अल्ट्राव्हायोलेट) ब्लास्टर नावाचा यूव्ही ब्लास्टर टॉवर (UV blaster tower) तयार करण्यात यश मिळाले आहे. या मशीनमध्ये 12 x 12 ची खोली 10 मिनिटांत विषाणूमुक्त करण्याची क्षमता आहे.

डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मास्कची निर्मिती

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डीतील डॉ. डी. वाय पाटील फार्मसी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी ‘रासेयो’ अंतर्गत कोरोना महामारी निवारणासाठी मास्कची निर्मिती करून मोफत वाटप केले. या जनजागृती उपक्रमात 75 विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी 50 विद्यार्थ्यांनी 500 कुटुंबाना जनजागृतीसाठी दत्तक घेतलेले आहे. सरकारच्या आदेशानुसार आरोग्य सेतू आणि ‘आय गॉट दिशा ॲप’ डाउनलोड […] 

रुग्णवाहिका चालकाने वाढदिवसाचा खर्च वाचवून केले 1000 ‘मास्क’चे वाटप

एमपीसी न्यूज – वायसीएम रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या चिखली येथील चालकाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसानिमित्त 1000 मास्कचे वाटप केले आहे. मारुती जाधव असे या चालकाचे नाव आहे. आज (शनिवारी) त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे वाटप करण्यात आले. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विविध परिसरातील गरजू नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मास्कचे मोफत […] 

वाल्हेकरवाडीत पिंपळाच्या पाराखाली सुरू आहे मोफत दवाखाना

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे शहरातील बहुतांश दवाखाने बंद असताना भारतीय जैन संघटना व माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड वाल्हेकरवाडी येथे पिंपळाचे झाडाखाली मोफत दवाखाना सुरू केला आहे. या ठिकाणी दररोज किमान एक हजार नागरिकांना तपासून  मोफत उपचार व औषधे सुद्धा मोफत दिली जात आहेत. या ठिकाणी सर्दी, खोकल्यासारख्या किरकोळ आजारावर तपासणी करून औषध […] 

स्वयंस्पष्ट आदेश मिळेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दुकाने बंदच राहतील- फत्तेचंद रांका

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या तिघांनी काढलेल्या स्वतंत्र आदेशांमध्ये विसंगती असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांना भेटून एकच स्वयंस्पष्ट आदेश काढण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसा आदेश निघेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. पुणे व्यापारी महासंघाच्या […] 

पार्थ पवार सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांना अडीच हजार लीटर सॅनिटाईझरचे वाटप

कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आज पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका विभाग आणि पोलीस विभागातील विविध कार्यालयात सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ  नाना काटे, महिला अध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक मयुर कलाटे, उषाताई वाघेरे, सुलक्षणाताई धर, उषाताई काळे,  राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काळभोर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, श्याम जगताप , तानाजी जवळकर, पुणे ग्रामीण विध्यार्थी अध्यक्ष करण कोकणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

महापालिकेच्या अन्य रुग्णालयात सुध्दा नागरिकांना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळणार

कोरोना कोविड – 19 या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी व प्रतीबंधा साठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे इतर राज्यातील तसेच महाराष्ट्राचे बाहेर जिल्हयातील स्थलांतरीत मजूर, पर्यटक, विद्यर्थी अडकून पडलेले आहेत. या सर्वांना त्यांचे इच्छेनुसार मूळ गावी जाण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्या आलेली आहे. 

गावी जाण्याच्या परवानगीसाठी भली मोठी रांग

पिंपरी – गावी जाण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी घेण्यासाठी शहरातील पोलीस ठाण्याबाहेर भली मोठी रांग लागली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात “वाइन’साठी मोठी “लाइन’

पिंपरी – “बडे दिनों के बाद मिली है… दे दारु दे दारु…’ या हिंदी चित्रपटाला सार्थ करत पिंपरी-चिंचवड शहरामधील मद्यप्रेमी सोमवारी (दि. 4) वाइन शॉप्सवर अक्षरश: तुटून पडले. सकाळी सात वाजल्यापासूनच मद्यपींनी “वाइन शॉप’ बाहेर साधारण एक किलोमीटरहून अधिक लांबलचक रांगा लावत दारू विकत घेण्याचा आनंद दिसत होता.

Newspaper distribution should start in Pune and Pimpri-Chinchwad: Pune collector


भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम आढावा घेऊन सुरु करावे -सुमन पवळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम कोरोनामुळे महिन्याभरापासून बंद आहे. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार पुलाचे काम करता येईल काय़?, याचा आढावा घ्यावा. काम करता येत असल्यास तत्काळ सुरु करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे यांनी केली आहे. याबाबत महापालिका […]